message Archives | News 24 Tass Marathi

आंदोलन – मोर्चासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक
परवानगीशिवाय सोशल मीडियावर आवाहन केल्यास कायदेशीर कारवाई

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा इशारा

बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चा किंवा निदर्शनांसाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यापूर्वी बेळगाव शहर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे. परवानगी न घेता अशा प्रकारचे आवाहन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात भूषण बोरसे यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात सोशल मीडियावरून विशिष्ट ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारच्या मोर्चांमुळे आणि आंदोलनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. काही वेळा कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा आयोजित करणाऱ्या व्यक्तींनी प्रथम पोलीस विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच सोशल मीडियावर नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

परवानगीशिवाय सोशल मीडियावरून नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस बजावली जाईल. तसेच अशा आवाहनामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आयोजकावर राहील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी बेळगाव शहर पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

The post आंदोलन – मोर्चासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक appeared first on News 24 Tass Marathi.