mes black day Archives | News 24 Tass Marathi

शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फीमुळे पोलीस निरीक्षकाची बदली
बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत घेतल्याचे सेल्फी प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले. या प्रकारामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बी. आर. गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शुभम शेळके यांच्यासोबत पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी कालीमिर्ची यांच्या विरोधात निदर्शने केली होती. या प्रकरणानंतर अखेर त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून, ही कारवाई त्या सेल्फी प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात जोरात सुरू आहे.

The post शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फीमुळे पोलीस निरीक्षकाची बदली appeared first on News 24 Tass Marathi.

परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका
म. ए. समिती नेत्यांसह १५० जणांवर एफआयआर दाखल

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या म. ए. समिती नेत्यांसह १५० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलिस स्थानकाकडून सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एक नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा आपला हक्क दाखविला होता. कार्यकर्त्यांनी शांततेत सायकल फेरी काढली होती. शनिवार सकाळी महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यानातून फेरीची सुरुवात झाली होती.

मार्केट पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली आहे. कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून परवानगी न घेता फेरी काढल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच मार्गावर अडथळा निर्माण करून उपद्रव केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. फेरीत कार्यकर्त्यांनी सरकार व कर्नाटक प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करणारे घोषवाक्य दिल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र बाजूने घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांच्या शांततेचा भंग झाला आहे. बेळगावसह सीमाभागातील गावे महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी केली असे सांगत कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे की, आम्ही शांततेत मूक फेरी काढली, तरी सरकारतर्फे एफआयआर दाखल करून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न होत आहे.”

या प्रकरणी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव, ॲड. अमर येळ्ळूरकर, प्रशांत भातकाडे, अंकुश केसरकर, मदन बामणे, किरण गावडे, महेश नाईक, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुसकर, प्रकाश शिरोळकर, वैशाली भातकाडे, गजानन पाटील, जयेश भातकाडे, किरण हुंदरे, संतोष कृष्णाचे, गुंडू कदम, हनुमंत मधुकर, शिवाजी मंडोळकर, ॲड. महेश बिर्जे, सुहास हुद्दार, उमेश कुर्याळकर, जोतिबा पालेकर, बाबुराव केरवाडकर, विश्वजित चौगुले, विशाल सिद्धार्थ भातकाडे, निहाल शहापूरकर, विठ्ठल पाटील, येल्लारी बिडकर आदी ३५ जणांच्या नावांचा उल्लेख आहे. एकूण १०० ते १५० मराठी कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८९ (२) १९२, २९२, २८५, २९३, १९० अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

The post परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषिकांचा ‘एल्गार’ महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा ‘वज्रनिर्धार’!
काळा दिनाच्या निषेध फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी ; जोरदार घोषणाबाजी

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारून हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या निषेध फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाच्या फेरीत आबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी चौथी पिढीही सज्ज असल्याचे दाखवून दिले. फेरीमध्ये हजारो मराठी भाषक सहभागी झाल्यामुळे सर्वत्र मराठी भाषकांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला. युवा पिढीत महाराष्ट्रात जाण्यासाठीची जिद्दही दिसून येत होती.

भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर करून घेण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निषेध फेरीचे आयोजन करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून काळा दिनाच्या निषेध फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते धर्मवीर संभाजी उद्यानात दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास फेरीला सुरुवात करण्यात आली. निषेध फेरीच्या अग्रभागी महिला होत्या. त्यानंतर कार्यकर्ते व युवावर्ग संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत निषेध करीत सहभागी झाला. चोन्नद स्टील, महाद्वार रोड, गजाननराव भातकांडे शाळा, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, अंबाभुवन रोड, शिवाजी रोड, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कलमार्गे मराठा मंदिर येथे फेरीची सांगता करण्यात आली. फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. फेरी महात्मा फुले रोड येथे पोहोचल्यानंतर पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाची तमा न बाळगता कार्यकर्ते मिरवणुकीची सांगता होईपर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत होते. काही ठिकाणी निषेध फेरी घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीला न घाबरता फेरीच्या मार्गावरून अत्यंत शांततेने सहभाग घेतला. त्यामुळे फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

फेरीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, नेताजी जाधव, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, विजय भोसले, राकेश पलंगे, माजी महापौर सरिता पाटील, आप्पासाहेब पुजारी, रेणू किल्लेकर, सुनील बाळेकुंद्री, महेश जुवेकर,आर. के. पाटील, रावजी पाटील, प्रकाश अष्टेकर, दुधाप्पा बागेवाडी, आर. आय. पाटील, वैशाली भातकांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरोळकर, बंडू केरवाडकर, मदन बामणे, सचिन गोरले, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सुधा भातकांडे, वैशाली भातकांडे, शिवानी पाटील, बी. डी. मोहनगेकर, अमित देसाई, राजू पावले, किरण हुद्दार, महादेव मंगनाकर, शिवाजी पट्टण, अनिल हेगडे, सिद्धार्थ चौगुले, शिवाजी हावळाणाचे, नागेश बोबाटे, राजू तुडयेकर, किरण गावडे, पुंडलिक चव्हाण, किरण बडवाणाचे, मोतेश बार्देसकर, शांताराम होसूरकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, विजय हलगेकर, डी. बी. पाटील, सागर पाटील, उमेश पाटील, गुणवंत पाटील, अनिल अमरोळे, बाबू कोले, सुरेश रेडेकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

क्षणचित्रे :

साडेआठ वाजल्यापासून संभाजी चौकात कार्यकर्ते येण्यास सुरू

दडपशाही करण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांची कुमक तैनात

काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करून कार्यकर्ते सहभागी महिला आणि तरुणींचाही मोठा सहभाग

फेरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याचे वाटप

निषेध फेरी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

संयुक्त महाराष्ट्रसह केंद्राविरोधात घोषणाबाजी

फेरीवेळी महात्मा फुले रोड परिसरात पावसाची हजेरी

निषेध फेरीत घुसण्याचा कन्नड संघटनांचा प्रयत्न

युवकांचा सहभाग उत्साह वाढविणारा

दडपशाही धुडकावून कार्यकर्त्यांचा सहभाग :

काळा दिनाच्या फेरीत सहभागी होण्यासाठी भालकी, निपाणी व खानापूर तालुक्यांच्या विविध भागांतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने बेळगावात दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांनीही निषेध फेरीत सहभागी होऊन सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत अखंडपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती, तरीही कार्यकर्ते विविध मार्गानि फेरीत सहभागी होत होते. त्यामुळे पोलिसांची दडपशाही कार्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याचे चित्र शहराच्या अनेक भागांत पाहावयास मिळत होते.

The post मराठी भाषिकांचा ‘एल्गार’ महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा ‘वज्रनिर्धार’! appeared first on News 24 Tass Marathi.

कोगनोळी टोलनाक्यावर खासदार धैर्यशील माने यांना रोखले
महामार्गावर ठिय्या आंदोलन

निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी हातकणंगलेचे खासदार आणि तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने १ नोव्हेंबरला बेळगावकडे निघाले होते. मात्र, महाराष्ट्र–कर्नाटक सीमेजवळील कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांना थांबवत प्रवेश नाकारला. यामुळे काही वेळ पुणे–बंगळूर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

प्रवेश बंदीचा निर्णय कळताच खासदार माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “मी लोकप्रतिनिधी असून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याचा माझा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला तो रोखण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत त्यांनी कर्नाटक प्रशासनावर दडपशाहीचा आरोप केला. तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणाही त्यांनी केली. “मराठी भाषिकांचा न्यायासाठीचा संघर्ष सुरू राहणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेऊन कागल पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला.

या घडामोडींमुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले असून, पुढील काही तासांत या प्रकरणावर राजकीय हालचाली वेग धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post कोगनोळी टोलनाक्यावर खासदार धैर्यशील माने यांना रोखले appeared first on News 24 Tass Marathi.

शिवसेना नेत्यांना पोलिसांनी ‘कोगनोळी’ चेकपोस्टवर अडवले
‘काळा दिवस’ आंदोलनात सहभागी होण्यास केला मज्जाव

कोगनोळी : बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा अडवून धरले. ‘काळा दिवस’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावकडे येत असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते विजय देवणे आणि संजय पवार यांना निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवरच थांबवण्यात आले.

कर्नाटक सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत महाराष्ट्रातील काही नेत्यांवर प्रवेशबंदी लागू केली असून, त्याच आदेशाच्या अंमलबजावणीत ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. मात्र, मराठी भाषिकांची वाढती एकजूट पाहून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आल्याची टीका मराठी संघटनांकडून होत आहे.

‘काळा दिवस’ निमित्त बेळगावमध्ये होणाऱ्या शांततामय मोर्चात सहभागी व्हावे आणि सीमावासीयांना नैतिक पाठिंबा द्यावा, या उद्देशाने दोन्ही नेते बेळगावकडे रवाना झाले होते. परंतु चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. या कारवाई विरोधातशिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनास्थळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाहीव्यवस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यासाठीही रोखणे हे लोकशाही मूल्यांच्या प्रतिकूल असल्याचा आरोप करण्यात आला.

मराठी संघटनांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक प्रशासनाने कितीही कठोर भूमिका घेतली तरीही सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत हा लढा कमी होणार नाही. मराठी जनतेची एकजूट आणि विरोध यामुळे दडपशाहीचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

The post शिवसेना नेत्यांना पोलिसांनी ‘कोगनोळी’ चेकपोस्टवर अडवले appeared first on News 24 Tass Marathi.

खासदार धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्योत्सव आणि त्याच दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘काळा दिन’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हातकणंगलेचे खासदार व तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विजय देवणे आणि संजय पवार यांना १ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय नागरी संरक्षण संहिता कलम 163 अंतर्गत ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावात भाषिक संवेदनशीलता वाढण्याची शक्यता आणि कायदा–सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना संबंधित सुमारे २५ कार्यकर्त्यांनाही हीच अट लागू केली असून, त्यांना १ नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या शिफारशीवरून हा आदेश काढण्यात आल्याचे सांगितले जाते.

शिवसेना नेते विजय देवणे यांनी सीमावासीयांना समर्थन देण्यासाठी निपाणीमार्गे बेळगावात येण्याची घोषणा केली होती. यानंतरच प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी हा प्रतिबंधात्मक आदेश दिला. राज्योत्सव, काळा दिन आणि सीमाभागातील परिस्थिती लक्षात घेता कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, हा निर्णयाचे प्रमुख कारण असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

The post खासदार धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी appeared first on News 24 Tass Marathi.

काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा
बेळगाव तालुका म. ए. समितीचे मराठी भाषिकांना आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिक गेली सहा दशके ‘१ नोव्हेंबर’ हा दिवस काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळत आहेत. राज्य पुनर्रचनेच्या वेळी १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठीबहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाविरोधात सीमाभागातील नागरिकांनी केंद्र सरकारकडे वारंवार न्यायाची मागणी केली, परंतु अद्याप तो मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२५ रोजी काळा दिन आणि कडकडीत हरताळ मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यात येणार आहे. या दिवशी मराठी भाषिकांनी काळे वस्त्र परिधान करून मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, तसेच सर्व व्यापारी, शासकीय आणि वैयक्तिक व्यवहार बंद ठेवून हरताळ पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही मूक सायकल फेरी धर्मवीर संभाजी उद्यानातून सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होईल.

या कार्यक्रमात सीमाभागातील सर्व मराठी भाषिक नागरिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, युवा आघाडी, महिला आघाडी तसेच विविध घटक समित्यांचे कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील आदींनी संयुक्तरीत्या केले आहे.

The post काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा appeared first on News 24 Tass Marathi.

पोलिसांच्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्याचा निर्धार
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्योत्सवाच्या तोंडावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नेत्यांना-मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व मालोजीराव अष्टेकर यांना पोलिसांनी बजावलेल्या खबरदारीच्या नोटीसीवरून मराठी जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. समितीने या नोटीसीला कायदेशीरदृष्ट्या आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून, “दडपशाही कितीही झाली तरी १ नोव्हेंबर रोजी काळा दिनाची सायकल फेरी निघणारच,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवाल क्रमांक ६१ / २०२५ नुसार, हे नेते संभाजी उद्यानातून १ नोव्हेंबर रोजी सायकल रॅली व आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याआधी २०२३-२४ मध्ये परवानगी नाकारूनही रॅली काढल्याचा दाखला देत, भारतीय हजर राहण्याचे आदेश नागरी सुरक्षा अधिनियम देण्यात आले होते. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी कलम २०२३ व १२६ नुसार प्रत्येकी ५ लाखांची मनोहर किणेकर, प्रकाश वैयक्तिक हमी व ५ लाखांच्या मरगाळे व मालोजीराव जामिनाची अट घालण्यात अष्टेकर यांनी मार्केट पोलीस आली. या अनुषंगाने २८ उपायुक्तांच्या वीरभद्र नगर ऑक्टोबर रोजी विशेष येथील कार्यालयात हजेरी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर लावली. समितीने पाच लाखांचे वैयक्तिक हमीपत्र आणि पाच लाखांचा जामीन प्रत्येकी सादर केला असला, तरी नोटीसीत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत, असा आरोप करण्यात आला. समितीचे वकील अॅड. महेश बिर्जे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “नोटीसीमधील काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. कायदा प्रक्रियेचे उल्लंघन करून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही ही नोटीस जिल्हा (सत्र) न्यायालयात आव्हान देणार आहोत. ” याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर केळेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले, “मराठी मन दडपता येणार नाही. कितीही दबाव आणला तरी आम्ही घाबरणार नाही. १ नोव्हेंबरला काळा दिनाची सायकल फेरी काढली जाणारच. मराठी जनतेचा आवाज पोलिसी नोटिसांनी थांबणार नाही.

The post पोलिसांच्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्याचा निर्धार appeared first on News 24 Tass Marathi.

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर समिती नेत्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस
बेळगाव / प्रतिनिधी

येत्या १ नोव्हेंबर रोजीच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पुन्हा एकदा मराठी कार्यकर्त्यांवर पोलिसी दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आणि मनोहर किणेकर यांना खबरदारीच्या नोटीसा बजावल्याने मराठी समाजात संताप व्यक्त होत आहे.

ही नोटीस मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी दाखल केलेल्या अहवालावरून देण्यात आली असून, अहवालात नमूद करण्यात आले आहे की हे तिचे मध्यवर्ती समितीचे नेते धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल रॅली काढून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या आधी २०२३ – २४ मध्येही अशा प्रकारे रॅली काढल्याचा उल्लेख पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसानी भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम कलम १२६ नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयाची वैयक्तिक हमी आणि दोन जामीनदारांची हमी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सोमवारी या तिन्ही मराठी नेत्यांनी व सोबत एम. जी. पाटील, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन १ नोव्हेंबर रोजी काळा दिन शांततेत पाळण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच सायंकाळी पोलिसांनी या तिघांनाच खबरदारीच्या नोटीसा पाठवल्या, यामुळे मराठी संघटनांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, “मराठी जनतेला दडपण्यासाठी प्रत्येक वर्षी राज्योत्सवाच्या आधी अशा प्रकारच्या नोटीसा देऊन धमकावण्याचे काम केले जाते. आम्ही नेहमी शांततेत आंदोलन केले आहे, तरीही पोलिस प्रशासन मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.”  राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बेळगावात मराठी विरुद्ध कन्नड तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, मराठी संघटनांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

The post राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर समिती नेत्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस appeared first on News 24 Tass Marathi.

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचीच्या बैठकीत मराठी भाषिकांना आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावची व्यापक बैठक कावळे संकुल येथील समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त मूक सायकल फेरीत मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

१९५६ साली भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी बहुल प्रदेश अन्यायाने म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आला. या अन्यायाचा निषेध म्हणून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून साजरा केला जातो. सीमाभागातील मराठी बांधवांचा महाराष्ट्रात विलीन होण्याचा निर्धार आजही कायम असल्याचे या दिवसाचे प्रतीक मानले जाते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर्षीच्या मूक सायकल फेरीत सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले असून, मराठी जनतेची एकजूट दाखविण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी या वेळी केले.

बैठकीत मराठी भाषिकांचा अपमान करणारे आणि सीमाप्रश्नावर भडकाऊ विधाने करणारे खासदार जगदीश शेट्टर तसेच काही कन्नड संघटनांच्या नेत्यांचा निषेध व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाने काळ्या दिनावरील याचिकेत मराठी भाषिकांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबद्दल ॲड. महेश बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी सांगितले की, “उच्च न्यायालयाच्या आदेशांचा मान राखत प्रशासनाने काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला कोणत्याही प्रकारे अडथळा आणू नये आणि संविधानिक अधिकारांचा भंग होऊ देऊ नये.”

या बैठकीस उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम, पदाधिकारी सुरज कुडुचकर, खजिनदार विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, महेश जाधव, आकाश भेकणे, सुरज चव्हाण, विकास भेकणे, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

The post काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे appeared first on News 24 Tass Marathi.