marathi sanman yatra Archives | News 24 Tass Marathi

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सन्मान यात्रा यशस्वी करणे काळाची गरज
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी, रविवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता राजहंसगड ते येळ्ळूर होणाऱ्या यात्रेमध्ये तसेच पुढील टप्प्यातील होणाऱ्या या यात्रेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मराठी सन्मान यात्रा यशस्वी करून केंद्र व कर्नाटक सरकारला जाग येऊन लवकरात लवकर सीमाप्रश्नाच्या सोडवण्यासाठी चालना मिळावी, यासाठी ही यात्रा यशस्वी करणे काळाची गरज आहे.

सीमाभागात मराठी भाषेवर भाषिक अत्याचार केले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मिळणारे हक्क डावलले जातात. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने वारंवार सूचना करूनही या सूचनेकडे कर्नाटक सरकारचे साप दुर्लक्ष झाले आहे. सीमाभागातील सर्व सार्वजनिक ठिकाणी असणारे फलक आता कानडीकरण केले जात आहेत. तसेच सरकारी सर्व कागदपत्रे कानडी भाषेत आहेत. यामुळे सीमाभागातील मराठी नागरिकावर भाषिक अत्याचार सुरूच आहेत.हा अत्याचार दूर व्हावा व हा सीमाभागातील मराठी मुलुख महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा म्हणून गेली ६९ वर्षे हा लढा सुरू आहे.लोकशाहीच्या मार्गाने अनेक लढे सीमाभागातील मराठी भाषिकांनी लढले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आता मराठी सन्मान यात्रा काढून सीमाभागातील मराठी भाषिकांना एकवटून लवकरात लवकर सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, यासाठी या मराठी सन्मान यात्रेमध्ये सर्व मराठी भाषिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे गरजेचे आहे.

रविवार दिनांक १५ मार्च पासून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर,मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

The post सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सन्मान यात्रा यशस्वी करणे काळाची गरज appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेची तारीख बदलली
नव्या तारखेनुसार १५ मार्चला होणार यात्रा

२७ फेब्रुवारीचा कार्यक्रम रद्द

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी सन्मान यात्रेला राजहंसगड येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे समाज माध्यम व येळ्ळूर,सुळगा,राजहंसगड, धामणे, हट्टी व सीमाभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. येळ्ळूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, संबोधन करण्यासाठी लेखक,दिग्दर्शक नंदकुमार गुरूले हे उपस्थित राहणार होते.पण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके यांच्या दिनांक २४ फेब्रुवारी रोजी आकस्मित निधन झाले, या आपल्या वैयक्तिक कारणामुळे लढा व यात्रा कुठेही थांबता कामा नये, असे आवाहन शुभम शेळके यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केली.

पण कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर,तसेच विनंती नंतर २७ फेब्रुवारी रोजी राजहंसगड येथून बाईक रॅलीसह निघणारी मराठी सन्मान यात्रा तसेच जाहीर सभा स्थगित करून आता रविवार दिनांक १५ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

त्याच २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन दुपारी ४ वाजता राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. या मराठी भाषा दिनाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

The post मराठी सन्मान यात्रेची तारीख बदलली appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा
बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दुपारी ३ वाजता राजहंसगड येथून प्रारंभ होणार असून विविध गावांतून मार्गक्रमण करत सायंकाळी येळ्ळूर येथे जाहीर सभेने तिचा समारोप होणार आहे.

यात्रा राजहंसगड, सुळगे (ये), येळ्ळूर, अवचारहट्टी मार्गे धामणे येथे जाऊन पुन्हा त्याच मार्गाने परत येळ्ळूर गावात फेरी काढेल. सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे यांचे निकटवर्तीय आणि १२ वर्षे त्यांची निष्ठेने सेवा केलेले शिवसैनिक नंदकुमार गोरुले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले गोरुले हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, दिग्दर्शक, कवी व कलाकार म्हणून परिचित आहेत. धर्मवीर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेते अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या जीवनाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती गोरुले यांच्याकडून घेतल्याचा उल्लेख आपल्या मुलाखतीत केला होता.

बेळगाव सीमाभागाशी गोरुले यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सीमावासीयांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आले आहे.

The post मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा appeared first on News 24 Tass Marathi.

राजहंसगड ते येळ्ळूर मराठी सन्मान यात्रेचा पहिला टप्पा
बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या संदर्भात पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते.

बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला व २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन २५० सीमावासीय कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.

येत्या शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून दुपारी ३.३० वाजता राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीला अभिवादन करून या मराठी सन्मान यात्रेला सुरुवात होणार असून तेथून बाईक रॅलीने सुळगा (ये.) व तेथून येळ्ळूर येथे आगमन होऊन गावात बाईक रॅली होणार आहे. त्या नंतर येळ्ळूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी सन्मान यात्रेची सभा होणार आहे. तर पुढील मराठी सन्मान यात्रा टप्प्या टप्प्याने होईल तसे माध्यमाद्वारे कळविण्यात येईल,असे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.

सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी या बैठकीतील खालील ठराव वाचून दाखविले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहून श्रध्दांजलीचा पहिला ठराव मांडण्यात आला, तर दुसऱ्या ठरावात किल्ले रायगड येथे सन्मान यात्रेचे दर्जेदार वृत्तांकन करणाऱ्या माणगाव रायगड येथील पत्रकार नरेश विठ्ठल पाटील व सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या अभिनंदनाचा व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात येत्या १६ फेब्रुवारी पासून त्रीसदस्यीय खंडपीठ पुन्हा उपलब्ध होणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने वारंवार महाराष्ट्र् सरकारकडे पाठपुरावा केला आहे, तरी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाकडे गांभिर्याने लक्ष देऊन चालना द्यावी, असा ठराव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रगतशील लेखक संघ साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागात एक लाख सह्यांची मोहिम राबवावी असे आवाहन केले. या आवाहनाला पाठिंबा देऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आशा उपक्रमात सहभागी होण्याचा ठराव संमत करण्यात आला.

या बैठकीला शिवाजी हावळानाचे,अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजीत धामणेकर, शशिकांत सडेकर,सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, अभिषेक कारेकर,निलेश काकतकर,रोहित जाधव, ओमकार जाधव, साईराज कुगजी,सविता राऊत, अभिजीत मजुकर,प्रतीक गुरव,रणजित हवळाणाचे, आदी उपस्थित होते, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार मानले.

The post राजहंसगड ते येळ्ळूर मराठी सन्मान यात्रेचा पहिला टप्पा appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजना संदर्भात म. ए. युवा समिती सीमाभागची उद्या बैठक
बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजनाबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा, पुढील दिशा, कार्यपद्धती तसेच संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी अस्मिता, हक्क आणि एकजुटीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तरी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले आहे.

The post मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजना संदर्भात म. ए. युवा समिती सीमाभागची उद्या बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार
येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील रायगड येथे निघणार्‍या मराठी सन्मान यात्रे त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते आणि भजनी मंडळ सहभागी होणार असून यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रारंभी महाराष्ट्र चौक येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वामनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवहिंद को-ऑप. सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर आणि इंजिनिअर हणमंत कुगजी, प्रशांत मजुकर यांच्याहस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आहे.

युवानेते शुभम शेळके यांनी येळ्ळूर गाव नेहमीच सीमालढ्याचा अग्रेसर भाग राहिला असून आजही शेकडो कार्यकर्त्यांनी या मराठी सन्मान यात्रेत सहभाग दर्शवून आपली सीमाप्रश्नी निष्ठा दाखवून दिली आहे, जो विश्वास येळ्ळूर गावाने आमच्यावर दाखवला आहे त्याला तडा न जाऊ देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करेन,असे संबोधले.

या बैठकीत दुद्दापा बागेवाडी यांनी मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देत सीमाप्रश्नी युवकांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग दर्शवून चळवळ बळकट करून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असावे, तर प्रकाश अष्टेकर यांनी ज्या प्रमाणे येळ्ळूर गावाने सीमालढ्यात अविरतपणे सहभाग दर्शवला आहे, त्याच प्रमाणे युवा वर्गाच्या पाठीशीही येळ्ळूर गाव सक्रिय सहभाग दर्शविल असे सांगितले.

खानापूर युवासमितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग सतत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आणि चळवळ सीमाप्रश्न सुटतोवर तेवत ठेवील असे आश्वासन देत देणगीदारांचे आभार मानले,अमोल जाधव, गणेश अष्टेकर, श्रीकांत नांदूरकर, आदिनी आपले विचार व्यक्त केले.

तर मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, छत्रपती विराट गड संवर्धन पथक,

छत्रपती विराट हलगी पथक, शेतकरी कामगार गणेशोत्सव,कलमेश्वर गल्ली, शिवसेना विराट गल्ली, गावातील सार्वजनिक गणेशोत्सव, मंडळ आणि दुर्गामाता मंडळ, उषा नारायण फाउंडेशन यांनी पाठिंबा जाहीर केला.

सेच या उपक्रमाला मराठी सन्मान यात्रेसाठी नितेश फकिरा काकतकर रु. 25000/-, श्रीकांत शिवाजी नांदुरकर रु. 10000/-, (दोन क्विंटल तांदूळ) सुनील वामनराव पाटील ,रु.10000/- हणमंत लु. कुगजी, रु. 5051/- अमित य. पाटील, रु. 5000/- परशराम निंगापा धामणेकर ,रु. 5000/- बाळासाहेब पावले, रु. 5000/- हिंदवी स्वराज्य संघटना , रु. 5000/- प्रभाकर मंगणाईक,  रु. 2500/- कलमेश्वर गल्ली कामगार संघटना कलमेश्वर गल्लीच्या वतीने देणगी रु., श्री. चांगळेश्वरी शिक्षण मंडळचे प्रसाद यल्लोजी मजुकर 20 बाॅक्स पाण्याच्या बाॅटल देणगी दिली. त्याचबरोबर मिलिंद अष्टेकर, महेश कुगजी, ऋषी मजुकर, प्रवीण मजुकर वैद्यकीय कीट दिले.

यावेळी उदय जाधव, राजू पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, अनिल हुंदरे, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू चौगुले, यल्लापा पाटील, सतीश देसुरकर, मनोज कुगजी,विनोद लोहार,संकल्प जाधव,सागर नायकोजी,ओमकार पाटील,सुमंत कुगजी,योगेश कदम,राहुल कुगजी,प्रविण मुचंडी, भावू हलगेकर,किरण उडकेकर,गजानन कुंडेकर,अवधूत लोहार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवा नेते दत्ता उघाडे यांनी केले तर आभार मांडले.

The post ‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार appeared first on News 24 Tass Marathi.