marathi bhasha din Archives | News 24 Tass Marathi

खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर
मराठी भाषा गौरव दिन व जागतिक महिला दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ संघाचा उपक्रम

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाच्या दुहेरी औचित्य साधत शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे आयोजित खुले कवी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात भरलेल्या या काव्यमहोत्सवात मराठी भाषेचा गौरव आणि स्त्रीमनातील विविध भावछटा कवींनी आपल्या आशयघन कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यामुळे सभागृहात मराठीच्या गोडीचा आणि स्त्रीसंवेदनांच्या सामर्थ्याचा एक अनोखा जागर अनुभवायला मिळाला.

कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना बी. जी. पाटील, प्रा. अशोक आलगोंडी, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, उर्मिला शहा, रेखा गद्रे, श्री हसबे

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतनचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर गावडे यांनी कुसुमाग्रजांची प्रेरणादायी “प्रेम कर” ही कविता सादर केली, तर रेखा गद्रे यांनी सावित्रीबाईंची समाजजागृतीची जाज्वल्य कविता “याला मानव म्हणावे का?” प्रभावी स्वरात सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले. त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत या कवी संमेलनाच्या उद्देशाची मांडणी केली.

या कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या हृदयस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत गुरुनाथ किरमटे यांच्या “अनन्य तुझ्या उपकारांचे फेडू कसे मी पांग, गे मातृभाषे मराठी फक्त एवढे सांग…” या ओळींनी सभागृह भारावून गेले.

स्त्रीस्वातंत्र्याचा विचार मांडताना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत सुधाकर गावडे यांनी “तीला हवे ते तीने करावे त्याला हवे ते त्याने, मनाप्रमाणे स्वैर आपल्या वागावे ज्याने त्याने…” अशा अर्थबोध ओळी सादर केल्या.

प्रा. महादेव खोत यांनी “बेळगावात मराठीला मान कुठे आहे हो? अन् सांगा मराठी मर्द मावळा बाणा कुठे आहे हो?” असे म्हणत बेळगावच्या सांस्कृतिक वास्तवावर भाष्य करत त्यांनी मराठी अस्मितेचा सवाल उपस्थित केला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सभागृहात चिंतनशील वातावरण निर्माण झाले. कवितेतील ओळींनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला.

स्त्रीच्या वेदना आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करत रोशनी हुंद्रे यांच्या “गोंदण” कवितेतील “बाईनेच गोंदवून घ्याव का गोंदन, गोंदन तरी असत कुठं तिच्या मालकीचे…तेही देत असत असह्य वेदना.” ओळींनी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला.

तर उर्मिला शहा यांनी “बाई, तुझं जगणंच मुळी कठपुतळीचं. दोरी तीच रहाते, फक्त नाचवण्याचे प्रकार वेगळे असतात.” असे म्हणत स्त्रीजीवनाचे मार्मिक चित्रण केले.

“धन्य त्यांची साधना,धन्य ते सारे साधक, धन्य माझी माय मराठीआणि धन्य तिचे उपासक.” मराठी भाषेचा गौरव व्यक्त करत आनंद मेणशी यांनी सादर केलेल्या या ओळींनी उपस्थितांना अभिमानाची जाणीव करून दिली.

समाजातील बदलत्या भाषिक प्रवाहांवर भाष्य करत जोतिबा नागवडेकर यांनी हलक्या-फुलक्या शैलीत म्हणाले – “इकडे तिकडे हॅलो हाय, जाताना म्हणतात बाय बाय,हे ऐकून पाहून तंग झालो, बिन तालाचा मृदंग झालो.”

यांच्यासह या कवी संमेलनात किरण पाटील यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या कवितेतून स्त्रीजीवनातील संघर्ष आणि जिद्दीचे चित्रण केले. सौ. स्नेहल बर्डे यांनी “स्त्री तुझी रूपे” या कवितेतून स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव केला. प्रा संजय बंड यांनी “लळा माय मराठीचा” या कवितेतून मायमराठीप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. प्रा. शुभदा प्रभू खानोलकर यांनी “सावित्रींच्या लेकी” हा पोवाडा सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी “रंग स्त्रीत्वाचा” या कवितेतून स्त्रीत्वाच्या विविध छटा उलगडल्या.

अक्षता यळ्ळूरकर यांनी “दुरावलेली छकुली” या कवितेतून सामाजिक वास्तव अधोरेखित केले. डॉ. प्रेमा मेणशी यांनी “प्रिय मराठी” या कवितेतून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले, तर सौ. नेहा जोशी यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीशक्तीचा गौरव केला. श्री. निलेश शिंदे यांनी “तीच ती स्त्री संघर्षाची रागिणी” या कवितेतून स्त्रीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्रण केले. सीमा कणबरकर यांनी “शेतकऱ्यांची बायको” या कवितेतून ग्रामीण स्त्रीचे कष्टमय जीवन उलगडले. सौ. रेखा गद्रे यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा संदेश दिला.

परशुराम खेमणे यांनी “शब्दांनो तुम्ही माणसांना जिवंत ठेवा” या कवितेतून शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. व्ही. एस. वाळवेकर यांनी “द्रौपदीचे वस्त्र” या कवितेतून स्त्रीअवमानाच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केले. बसवंत शहापूरकर यांनी “झोप आता बाई” या कवितेतून स्त्रीजीवनातील वेदना व्यक्त केल्या. कु. अनुजा लोहार यांनी “जगात भारी माझी मराठी” या कवितेतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला.

अस्मिता देशपांडे यांनी “मलाही अभिमान आहे मराठी असल्याचा” या कवितेतून मराठी अस्मितेचा अभिमान व्यक्त केला. श्री. मधु पाटील यांनी “मायबोली” या कवितेतून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मयुरी जाधव यांनी “स्त्री सामर्थाची कहाणी” या कवितेतून स्त्रीच्या जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रा. अशोक आलगोंडी यांनी सादर केलेल्या “बेळगाव अभिमान गीत” या कवितेने कार्यक्रमाचा समारोप अभिमानाच्या सुरावटीत झाला.

कवींच्या ओजस्वी सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशुराम खेमणे यांनी केले.

मराठी भाषेच्या गौरवाची आणि स्त्रीशक्तीच्या संवेदनशील जाणिवांची सुंदर सांगड घालणारे हे खुले कवी संमेलन साहित्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरले.

The post खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर appeared first on News 24 Tass Marathi.

वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड
शिवानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा

मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे आयोजन

कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. परंतु त्या दुःखाला केवळ कवटाळून बसण्याला काही अर्थ नाही. सुखाचा त्याग आणि दुःखाचा भोग ही कोणत्याही प्रतिभेची प्रेरणा ठरायला हवी. मराठी भाषा गौरव दिवस हा प्रतिभा जागवायचा दिवस आहे. कुसुमाग्रजानी ज्या अंतप्रेरणेने प्रगल्भ असे साहित्य लिहून मराठी भाषेची सेवा केली; तशी आजच्या पिढीने, विद्यार्थ्याने लिहिले पाहिजे. सगळे पुन्हा मिळू शकेल पण वेळ गेलेली कधीच पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही चांगले वाचा, चांगले लिहा. हे काम इथल्या मराठी विभागात होतं आहे याचे मला प्रचंड समाधान वाटते आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विनोद गायकवाड बोलत होते.

बोलताना पुढे डॉ. गायकवाड म्हणाले, तारुण्याचा काळ हा फार महत्वाचा आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणायचे सगळ्यात विषेश काळ आयुष्यातला कोणता तर तो तारुण्याचा काळ असतो. तो काळ तरुणांकडे असतो पण दुर्दैवाने ते त्यांनाच माहीत नसते. शिरवाडकर यांनी अशा तारुण्यात कितीतरी कविता लिहिल्या. विनायक सावरकरांनी याच वयेत मराठीला असंख्य नवीन शब्द देऊन मराठी भाषेची समृध्दी वाढविली. असे काहीतरी आपल्याला करता आले पाहिजे. बहिणाबाई चौधरी तर निरक्षर असतानाही किती प्रतिभावान काव्य लेखन त्यांनी केलं. चांगलं वाचलं की चांगलं लिहिता येते. रोजची वर्तमानपत्रे मासिके वाचा. तूम्ही समृध्द व्हाल. असे ते म्हणाले.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सभामांचावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर गोंधळी, महाविद्यालयातील गुणवत्ता मानांकन केंद्राचे समन्वय अधिकारी प्रा. बी. डी. दामन्नवर, मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मनोज कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. एस. पी. तळवार यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोणतीही भाषा माणूस जोडण्याचे काम करते. भाषेच्या विकासात साहित्यिक योगदान देत असतात. शिरवाडकर यांनी मराठी भाषेला फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. गायकवाड यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आपला सृजनात्मक आविष्कार साहित्य लेखनातून करावा.

उपस्थितांचे स्वागत प्रा. मनोज कोरे यांनी केले तर प्रास्ताविक आणि परिचय प्रा. अशोक आलगोंडी यांनी करून दिला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कविता लेखन, निबंध लेखन व पोस्टर बनवणे स्पर्धा घेतल्या होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु शुभम बोरगावे, व्दितीय क्रमांक श्वेता बाबर, तृतीय क्रमांक अनन्या कुलकर्णी आणि उत्तेजनार्थ प्रतीक्षा पाटील, अश्विनी माळी, प्रीती मुळीक यांना मिळाला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम स्नेहा करव, व्दितीय वैष्णवी माळी, तृतीय महेक अपराज आणि उत्तेजनार्थ पूजा भगत, निर्जरा पाटील, अक्काताई पाटील यांना मिळाले. पोस्टर बनवणे स्पर्धेत प्रथम सानिया गायकवाड, व्दितीय माधुरी माने, तृतीय शुभम बोरगावे आणि उत्तेजनार्थ वैष्णवी माळी, साक्षी पाटील, स्नेहल पाटील यांनी मिळवले.

यावेळी डॉ. अमोल पाटील, प्रा. साजिद इनामदार, प्रा. शिवानंद आवटी, प्रा. अशोक पाटील, प्रा. सोनाली फडतरे, मराठी पत्रकार संघाचे पत्रकार लक्ष्मण सुर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु शुभम बोरगावे व सानिया बिलगी यांनी केले तर आभार गणित विषयाच्या प्रा. जास्मिन राजापूरे यांनी केले.

The post वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे होणार आहे.

या कवी संमेलनात मराठी भाषा तसेच महिला विषयावर आधारित कविता सादर केल्या जाणार आहेत. परिसरातील कवींनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व कवींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

The post मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

बेकिनकेरे मराठी शाळेत भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात
मातृभाषेतून विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे श्रद्धा असली पाहिजे

‘मराठी आणि आधुनिक तंत्रज्ञान’ विषयावर एस. जी. बाळेकुंद्री यांचे मार्गदर्शन

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषा ही केवळ संस्कृतीची ओळख नसून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान, संशोधन आणि संवादाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक एस. जी. बाळेकुंद्री यांनी केले. बेकिनकेरे येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी डिजिटल युगात संगणक, मोबाईल अ‍ॅप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-लर्निंग आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये मराठीचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. मातृभाषेतून विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांची समज अधिक भक्कम होते आणि संशोधनवृत्ती विकसित होते, असे त्यांनी सांगितले. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वीकारताना श्रद्धा असावी; मात्र अंधश्रद्धेला स्थान नसावे, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रभाकर फडके होते. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्वागतगीत व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रांगणातील वृक्षांना पाणी घालून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वागत नारायण पाटील यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापिका वासंती लोखंडी यांनी मांडले. परिचय जी. डी. पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्रेया पाटील यांनी केले तर आभार अपूर्वा भोगण यांनी मानले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेकिनकेरे मराठी शाळेत भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू”
हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

​बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण, ज्ञानज्योती पुरस्कार वितरण, ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार वितरण आणि मागील शैक्षणिक वर्षात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम मराठा मंदिर येथे संपन्न झाला.

​त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार श्री. हेमंत ढोमे उपस्थित होते. त्यांनी ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ या विषयावर आपले विचार मांडले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “मातृभाषेतून शिकले तर प्रगतीचे घोडे कुठेच अडत नाही. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली आहे आणि ते इंग्रजी भाषाही चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. सध्या महाराष्ट्रात मराठी शाळांना वाईट दिवस आले असून पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे ; हीच परिस्थिती सीमाभागातही दिसत आहे. देशातील तुळू भाषा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही , त्यामुळे मराठी संपू नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्याकडून मराठी भाषेसाठी आणि शाळांसाठी जे काही करता येईल, त्यासाठी मी सदैव तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदीर्घ काळापासून चाललेला सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू आणि आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या सोबत आहोत , अशी ग्वाही त्यांनी दिली.

​बेळगावातील युवा कलाकार शिवराज चव्हाण यांनी परिसंवादात हेमंत ढोमे यांची मुलाखत घेतली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर आणि युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. हेमंत ढोमे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

​बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सामान्यज्ञान परीक्षेत यश मिळवलेल्या लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगावसह खानापूर तालुक्यातील एकूण पाच शाळांना ‘श्रीनिवास केशवराव म्हणपसेकर’ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

​यावर्षी प्रथमच, प्रतिकूल परिस्थितीत मराठी शाळा टिकवणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानज्योती पुरस्काराची’ घोषणा करण्यात आली होती; हा पुरस्कार सरकारी मराठी शाळा, जामगाव (ता. खानापूर) या शाळेला देण्यात आला. तर मागील काही वर्षांपासून शैक्षणिक उपक्रमात सातत्य आणि परिपूर्णतेसाठी धडपडणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. त्यान्वये मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

​या कार्यक्रमाला म. ए. समितीचे व युवा समितीचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. स्वागत सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी, तर प्रास्ताविक चिटणीस प्रतीक पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले यांनी मानले.

The post “सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” appeared first on News 24 Tass Marathi.

‘भाषा व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी साधन’
प्रा. निलेश शिंदे यांचे प्रतिपादन

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विशेष व्याख्यानमाला उत्साहात

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी साहित्य हे केवळ भाषेचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक घडामोडींचा सखोल वेध मराठी साहित्य घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, संवेदनशीलता आणि तर्कबुद्धीच्या विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. निलेश शिंदे यांनी केले.

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत ‘मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि आजच्या काळातील आपली जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रा. शिंदे यांनी मराठी भाषेचा इतिहास, भक्ती चळवळीपासून ते शिवकालीन प्रशासनातील वापर, तसेच आधुनिक काळातील सामाजिक सुधारणांमधील योगदान यांचा आढावा घेतला. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंग-ओवींमधून मराठीला लोकभाषेचा दर्जा मिळाला, तर पुढील काळात पत्रकारिता, शिक्षण व साहित्य चळवळीमुळे भाषा अधिक समृद्ध झाली, असे त्यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास बौद्धिक विकास अधिक परिणामकारक होतो, यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या ममता पवार होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थी प्रा. लता कणबरकर यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत डिजिटल युगात भाषेची उपस्थिती मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. धनश्री पाटील-कंग्राळकर यांनी मराठी ही आपल्या संस्कृती व अस्मितेची ओळख असल्याचे नमूद करत तिच्या जतन-संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. धनश्री गाडे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. विजया डिचोलकर यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रेणुका चलवेटकर यांनी केले. या व्याख्यानमालेस प्राध्यापक, माजी विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post ‘भाषा व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी साधन’ appeared first on News 24 Tass Marathi.

राजहंस गडावर मराठी भाषादिन सोहळा उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी

मराठी राजभाषा दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक राजहंस गडावर मराठीचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठी भाषेचा जयजयकार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा आणि आरतीने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पदपूजन करण्यात आले. यावेळी वामनराव पाटील, गोपाळ पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधीवत पूजन केले.

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोपाळराव देसाई, शिवाजी मंडोळकर आणि पांडुरंग सावंत यांच्यासह मान्यवरांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यातील योगदानाचे स्मरण केले.

भाषा टिकली तरच आपली संस्कृती आणि अस्मिता जिवंत राहील, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. बेळगाव सीमाभागातील मराठी बांधवांची जिद्द आणि मराठी भाषेची अभिजात परंपरा हीच आपली खरी ओळख असल्याचे रवींद्र पाटील यांनी म्हटले.

सीमाभागातील मराठी भाषिक अन्यायाविरुद्ध लढत असून, येथील मराठी भाषा दिन हा महाराष्ट्रापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात साजरा होतो, असे साहित्यिक गुणवंत पाटील यांनी सांगितले. मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र असून आपल्या हक्कासाठी सर्वांनी वज्रमुठ आवळली पाहिजे, असे आवाहन गुणवंत पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोश तयार करून प्रशासकीय व्यवहार मराठीत सुरू केले, याचा आम्हा सर्व मराठी भाषिकांना अभिमान आहे, असे शिवसंत संजय मोरे यांनी नमूद केले. मराठी भाषा ही वैज्ञानिक भाषा बनली पाहिजे, अशी अपेक्षा संजय मोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रे’ला शुभेच्छा देण्यात आल्या. या यात्रेत सीमावासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर मनोहर हुंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला बेळगाव आणि परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून मराठी भाषेच्या संवर्धनाचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

The post राजहंस गडावर मराठी भाषादिन सोहळा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा
सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना एक लाख सह्यांचे निवेदन देणार

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली २२ वर्षे प्रलंबित आहे. त्याची सलग सुनावणी करुन त्वरित निर्णय द्यावा, अशी विनंती सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. या समारंभात हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य ॲड. महेश बिर्जे उपस्थित होते.

“लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी” या सुरेश भट यांच्या गौरव गीताने समारंभास प्रारंभ झाला. सुरुवातीस महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, म. ए. समिती युवा आघाडी सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके, सामाजिक कार्यकर्ते अनंत जांगळे या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मनोहर किणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. पत्रकार संघ प्रारंभापासून सीमावासीय मराठी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही संघाची बांधिलकी आहे. या बांधिलकीतूनच सरन्यायाधिशांना सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, राजेंद्र पोवार, विलास अध्यापक, जितेंद्र शिंदे, शिवराज पाटील व शिवानी पाटील या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर सर्वश्री मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, अंकुश केसरकर, सौ. रेणू किल्लेकर, धनंजय पाटील, ॲड. महेश बिर्जे यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात त्यांनी सीमा लढ्याला बेळगांवबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबईच्या मराठी पत्रकारांनी पाठबळ दिले आहे. मराठी पत्रकार संघाने सीमा प्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना सह्यांचे निवेदन देण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.

शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व कार्यवाह महेश काशीद यांनी आभार मानले. मराठी पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण तालुका समिती उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, उमेश पाटील, किरण हुद्दार, सतीश देसाई, ॲड. अश्वजित चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

The post मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांची मैफल !
बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून ज्योती सेंट्रल स्कूल येथे उत्साहात कवी संमेलन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जागर घडवून आणला.

या काव्यमैफलीत कु. राशी यल्लाप्पा पाटील, कु. पल्लवी राजकुमार पाखरे, कु. श्रवण महेश बेन्नाळकर यांनी आपल्या कल्पनाशक्तीने सजवलेल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कविवर्य कुसुमाग्रज यांची गाजलेली ‘कणा’ ही कविता कु. आदिनाथ पाटील याने प्रभावीपणे सादर केली.

विद्यार्थ्यांसह शिक्षिकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. श्रीमती पद्मश्री भेंडीगीरी, श्रीमती अनुपमा शिंदे, श्रीमती अश्विनी चकडे, श्रीमती आरती आणि श्रीमती शिल्पा अंगडी यांनी कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांचे वाचन करून कार्यक्रमाची उंची वाढवली.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी स्वतः रचलेली बडबडगीते सादर करत चिमुकल्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले. संगीत शिक्षिका अक्षता मोरे यांच्या मराठी भाषा गौरव गीताने संमेलनाची सांगता झाली.

मराठी भाषेचा वारसा जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक व शिक्षणप्रेमींनी कौतुक केले.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांची मैफल ! appeared first on News 24 Tass Marathi.

अभिजात मराठी संस्थेतर्फे वाचक महोत्सवाचे आयोजन
बेळगाव : येथील अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने “वाचक महोत्सवाचे ” आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहाहून अधिक वाचक “आपल्याला आवडलेले पुस्तक” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चैतन्य हलगेकर हे राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे अध्यक्ष डॉ सध्या देशपांडे व कार्यवाह अनंत लाड यांनी कळविले आहे.

The post अभिजात मराठी संस्थेतर्फे वाचक महोत्सवाचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.