Makar Sankrantri Archives | News 24 Tass Marathi

युवा समिती महिला विभागातर्फे हळदीकुंकू व कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ
बेळगाव : युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने नुकताच कावळे संकुल बेळगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने बेळगावातील कर्तबगार महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या.

सदर कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सुधा भातकांडे , समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील, प्रा.मधुरा गुरव उपस्थित होत्या.

सौ. श्वेता कुडूचकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आणि कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्या म्हणाल्या की चूल आणि मूल यापलीकडे महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून आपलं वेगळं अस्तित्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच घरातील पुरुष मंडळींच्या सारखेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत झाले पाहिजे, त्यासाठी भविष्यात सगळ्या जणीं एकत्र याव्यात त्यांच्या भेटीगाठी व्हाव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

त्यानंतर नुकतीच मध्यप्रदेश येथील मालवांचल विद्यापीठ इंदौर येथून मेडिकल सर्जिकल नर्सिंग विषयात (पी. एच. डी.) डॉक्टरेट पदवी संपादित केल्या बद्दल डॉ. प्रा. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांचा तसेच मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ज्यांनी राणी चन्नमा विद्यापीठातून मराठी विभागातून २०१८ साली पहिली पी. एच. डी. “बेळगाव जिल्ह्यातील लोक साहित्याचा अभ्यास” या विषयात संपादित केली होती. अशा डॉ.सौ. वृषाली कदम दड्डीकर यांचा आणि बेळगाव जायंटस ग्रुप सखीच्या अध्यक्षपदी नुकतीच सामजिक कार्यकर्त्या सौ.सुलक्षणा सदानंद शिन्नोळकर यांची निवड झाली याबद्दल या तिघींचा जाहीर सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्या तसेच प्राजक्ता केसरकर,गौरी केळवेकर, तनुजा कावळे, श्वेता कुडूचकर, वृषाली पाटील, वैष्णवी चौगुले, विना केळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना सौ. शिवानी पाटील म्हणाल्या इतर पक्षात महिला जशा पुढाकार घेतात तशा समितीच्या कार्यात सुद्धा महिलांनी पुढे आले पाहिजेत, आणि प्रत्येकीने मराठी भाषा आणि बाणा जपण्यासाठी कार्य केले पाहिजे.

डॉ. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. डॉ. वृषाली कदम-दड्डीकर यांनी जातीवरची गाणी, ओव्या आणि लोकसाहित्यामध्ये जुन्या काळात महिला कशाप्रकारे जीवन जगत होत्या त्याची माहिती उलगडून सांगितली. तसेच महिलांनी महिलांसोबत भेदभाव करू नये तर प्रत्येकीने घराच्या बाहेर पडत समाजात आपले योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रा. मधुरा गुरव यांनी महिलांनी आपल्या कठीण काळात लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता काळानुरूप धीट झाले पाहिजे आणि घरात बसून न राहता बाहेरच्या जगात मुक्तपणे वावरले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते त्यात सर्व महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला आणि बक्षिसे मिळविली. हळदीकुंकू आणि वाण (भेटवस्तू) देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाला सौ.सविता चंदगडकर, वृषाली घाडी,पल्लवी इनामदार, प्रतिभा अष्टेकर, गायत्री जाधव, राजश्री जाधव, स्नेहल कदम, कोमल हुद्दार, अंकिता देसाई,मालन शिंदे,वर्षा कदम, पुनम मोरे, लक्ष्मी केळवेकर, स्नेहल पाटील, काजल पाटील, अंकिता चव्हाण,पूजा निलजकर, नेहा मोरे, संगीता अणवेकर, नेहा बोकडे, सोनाली राम किरमटे, सोनाली शाम किरमटे आदी महिला उपस्थित होत्या, साक्षी गोरल हिने सूत्रसंचालन केले तर सौ.तनुजा कावळे यांनी आभार मानले.

The post युवा समिती महिला विभागातर्फे हळदीकुंकू व कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा समाजसेवा मंडळ महिला विभागातर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात
बेळगाव : मराठा समाजसेवा मंडळ, बेळगावच्या महिला विभागातर्फे सुवासिनींसाठी हळदी–कुंकू समारंभ शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या सभागृहात पार पडला. या समारंभात सौ. शीतल सुनील पाटील यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित सुवासिनींचे मनःपूर्वक स्वागत केले. परंपरेनुसार हळदी–कुंकू लावून सुवासिनींना भेटवस्तू, तिळगूळ व अन्य वाण देण्यात आले. आनंदी आणि स्नेहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी सुशिला शिवाजी पाटील, विद्या गोविंद पाटील, कल्पना रावजी पाटील, नीता नारायण पाटील, क्षितिजा विशाल पाटील, सुमन पाटील (कोल्हापूर), कल्पना दत्तात्रय पाटील, नीना देसाई, स्मिता बंडू देसाई, छाया निंगोजी पाटील, कांचन रवळनाथ पाटील, प्रतिक्षा सावंत, माया नाईक, रेश्मा बेळगावकर, रेणुका असूकर, लक्ष्मी पोतदार, सुनीता नेसरकर, सुरेखा वसंत पाटील यांच्यासह अनेक सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चहापाण्यानंतर सौ. माया प्रशांत नाईक यांच्या आभारप्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली.

The post मराठा समाजसेवा मंडळ महिला विभागातर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

मैत्रेयी कलामंच मंडळाचे नाविन्यपूर्ण हळदीकुंकू
सुळगा (हिं.) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू मैत्रेयी कलामंच मंडळाने अनोख्या पद्धतीने केले.नवरात्री क्विन स्पर्धेमुळे स्मार्ट बनलेल्या सुळगा (हिं.) येथील आगळ्यावेगळ्या “सासू-सून” या समूहाला एक आदर्श म्हणून भेट देऊन त्यांंच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.

अचानक भेट दिल्यावर सासू – सून समूहाला आनंद झाला व मैत्रेयी कलामंच समूहाचे कौतुकही वाटले. थोड्या गप्पाटप्पा, कवितांची मैफिल तिळगुळ व वाणाची देवाणघेवाण अशा आयोजनाने कार्यक्रम रंगत गेला.घरची शेतीची जबाबदारी अंगावर असल्याने त्या महिला कुठे बाहेर पडू शकत नाहीत.काहीतरी विरंगूळा हवा म्हणून सुळग्यातीलच स्मिता पाटील यांच्या पुढाकारातून हा समूह तयार झाला आणि बघता बघता त्यांच्या कलागुणांना वाव मिळून चर्चेत आला.या महिला गाव सोडून शहरातील कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मैत्रेयी कलामंच मंडळ त्यांच्या भेटीला आले.त्यांनीही खुप आनंदाने या मंंडळाचे स्वागत केले.

प्रारंभी प्रा. डाॅ. मनिषा नाडगौडा यांनी प्रास्ताविक करताना मैत्रेयी कलामंच मंडळाचा उद्देश, कार्याचा आढावा घेतला. प्रतिभा सडेकर यांनी मकर संक्रांत का साजरी करतात, हळदी – कुंकूचे महत्व याविषयावर सुंदर माहिती सांगितली.रोशनी हुंद्रे यांनी स्त्रियांवर आधारित कविता सादर केली.मंडळातील इतर सदस्यांनी सासू – सून समूहाशी संवाद साधत त्यांच्या नात्यांतील जिव्हाळा जाणून घेतला. अडीच – तीन तासांच्या या कार्यक्रमातून तिथले वातावरण अगदी हसतेखेळते झाले होते.वाण म्हणून मैत्रेयी कलामंच मंडळातर्फे टिफिन बॅग देण्यात आल्या. समारोपात स्मिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. स्मिता पाटील यांनी अल्पोपहाराची उत्तम सोय केली होती.

The post मैत्रेयी कलामंच मंडळाचे नाविन्यपूर्ण हळदीकुंकू appeared first on News 24 Tass Marathi.

तिळगुळाच्या गोडव्याने संक्रांत साजरी
बेळगाव / प्रतिनिधी

तिळगुळाच्या गोडव्याने, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत बेळगाव शहर व परिसरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना तिळगुळाची देवाण-घेवाण, लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सोशल मीडियावरील शुभेच्छांच्या वर्षावाने संक्रांतीचा आनंद द्विगुणित झाला.

शहरातील अनेक देवस्थानांमध्ये देवांच्या मूर्तींना तिळगुळाचे दागिने व अलंकार घालून आकर्षक सजावट करण्यात आली होती. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान तसेच नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात जोतिबा देवाला तिळगुळाचा पोशाख व दागिने अर्पण करण्यात आले. भोगी दिवशी नैवेद्य, तर मकरसंक्रांतीदिवशी अभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भोगीच्या निमित्ताने घरोघरी भाकरी, चटण्या व विविध भाज्यांची देवाण-घेवाण झाली. सुवासिनी महिलांनी वाण देत सण साजरा केला. बाजारपेठेत तिळगूळ, भाकरी, चटण्या आणि इतर पारंपरिक पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. चौकाचौकांबरोबरच उपनगरांमध्येही तिळगुळाची रेलचेल दिसून आली.

बालचमूपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेश देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पहाटेपासूनच सोशल मीडियावर भोगी व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. गोडवा, आपुलकी आणि आनंद यांचे प्रतीक असलेली संक्रांत बेळगावकरांनी पारंपरिक उत्साहात साजरी केली.

The post तिळगुळाच्या गोडव्याने संक्रांत साजरी appeared first on News 24 Tass Marathi.