Pune Archives | News 24 Tass Marathi

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान
अंकली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान २७ जून रोजी होणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात हा पारंपरिक सोहळा पार पडणार आहे.

आळंदी ते पंढरपूर वारीतील मानाच्या अश्वांची परंपरा शितोळे घराण्याकडे असून, अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदाचे वारीचे १९४ वे वर्ष असून त्यानिमित्त आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. शनिवार, २७ जून रोजी सकाळी दहा वाजता अंकली येथील शितोळे सरकार राजवाड्यातून मानाच्या अश्वांचे प्रस्थान होणार आहे. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अंकली ते आळंदी हा प्रवास सुमारे अकरा दिवसांचा असणार असून अश्वांसोबत २० ते २५ जणांचा लवाजमा सहभागी होणार आहे. ७ जुलै रोजी हे अश्व आळंदी येथे पोहोचतील.

The post माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा सत्कार
पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व कला दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामधे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची देशभरातील नामवंत चित्रकारांनी आपापल्या शैलीतून रेखाटलेली चित्रे व अर्कचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सोबतच ठाकरे यांनी रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रे रसिकांना पाहायला मिळतील.

या दिनाचे औचित्य साधून काही ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यात बेळगावच्या जगदीश कुंटे यांच्या खेरीज वैजनाथ दुलंगे, श्रीनिवास प्रभुदेसाई, अवि जाधव, राजीव गायकवाड, रवींद्र बाळापुरे आणि खलील खान यांचा समावेश आहे.

याशिवाय दोन दिवसात नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने, छोट्यांसाठी कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला गेला. या दोन दिवसाच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप, कार्टून कट्टा आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.

The post जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय
२.१४ लाख मताधिक्याने विरोधकांवर मात

अजित पवारांचा विक्रम मोडला

बारामती : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर विरोधातील २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना मिळून केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. त्यावेळी त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न झाले होते. मात्र २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान झाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्य मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मतदानात सुमारे ५८.२७ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर राहिल्या. पहिल्या फेरीत ६५०० मते मिळवत त्यांनी आघाडी घेतली, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी वाढतच गेली. अखेर २४ व्या फेरीअखेर त्या विक्रमी मतांनी विजयी घोषित झाल्या.

या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत पक्ष व अपक्ष मिळून एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये विविध अपक्ष उमेदवारांसह काही लहान पक्षांचे उमेदवार होते.

‘अजित पवारांच्या स्मृतींना विजय समर्पित’ :

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन केले. “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित आहे. कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये आणि संयम राखावा,” असे त्यांनी नमूद केले.

The post बारामतीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय appeared first on News 24 Tass Marathi.

कडोली मराठी साहित्य संघाचा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मान
कडोली : येथील कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (जि. पुणे) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेने ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. संघाच्या साहित्य क्षेत्रातील रचनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.

शिवांजली साहित्यपिठातर्फे ३३ वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव दि. १ ते ३ मे दरम्यान चाळकवाडी येथे उत्साहात झाला. या महोत्सवात डॉ. पंडित विद्यासागर व डॉ. केशव देशमुख यांच्याहस्ते संघाचा सन्मान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथ व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते.

साहित्य संघाचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, कार्यकर्ते किरण पवार व सुनील पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.यावेळी शिवांजली संस्थेचे प्रवर्तक शिवाजी चाळक, लेखक डॉ. ला. रा. लामखडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवाजी चाळक यांनी प्रास्ताविकात कडोली मराठी साहित्य संघाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी शिवांजली संस्थेचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील विविध भागातील लेखक, कवी व साहित्य रसिक उपस्थित होते.

The post कडोली मराठी साहित्य संघाचा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मान appeared first on News 24 Tass Marathi.

संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान
पुणे : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निगडी येथे संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगावचे प्रख्यात संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि हार्मोनियमच्या परंपरेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कै. पं. अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार प्रख्यात व्हायोलिनवादक पं. अतुल कुमार उपाध्ये यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम रसिकांना हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव देणारा ठरला. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने झाली. यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे तर तबल्यावर पार्थ ताराबादकर यांनी समर्थ साथसंगत दिली.

त्यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन रंगले. त्यांच्या वादनाला तबल्यावर श्री. विनायक गुरव यांनी प्रभावी साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधिका जोशी, राकेश श्रीवास्तव, डॉ. अवंतिका सिन्हा, संतोष घंटे, डॉ. सुधांशु कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

‘या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली हे माझे भाग्य समजतो. मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि साधक म्हणून हा प्रवास असाच पुढे होत राहील” अशा शब्दात पं. सुधांशु कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

The post संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

संगीत विश्वातील ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘सूरसम्राज्ञी’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत लोअर परळ या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही आनंद भोसले यांनी सांगितले.

आशाताईंची कारकीर्द :

आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. १९५० च्या दशकात त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले. ओ. पी. नाय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचे गाणे कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.

The post संगीत विश्वातील ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत appeared first on News 24 Tass Marathi.

ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची एक ठळक ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले. गायक, संगीतकार, वादक, गीतकार तसेच तांत्रिक क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करून इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात शास्त्रीय अजित कडकडे संगीत आणि भजनासाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बासरीवादनातील उत्कृष्टतेसाठी अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर तांत्रिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला. ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला, तर अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून गौरविण्यात आले. विशेष कामगिरीची दखल घेत आकाश देशमुख (टेंभुर्णी) यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर परदेशात मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या व्ही. रमेश (सौदी अरब) यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

The post ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २०२६ सालासाठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली असून, यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सादर करण्यात आली.

पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, २४ जुलै रोजी ती पंढरपूर येथे पोहोचेल. प्रस्थानाची वेळ दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली आहे. या कालावधीत १७ दिवसांचे मुक्काम, ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण पार पडणार आहेत. तसेच आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे हजारो वारकरी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. जसे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे वारकऱ्यांनाही आषाढी यात्रेची ओढ लागलेली असते. चैत्र दशमीपासूनच वारीच्या नियोजनासाठी आळंदी देवस्थानमध्ये बैठका घेतल्या जातात. या बैठकीला संस्थेचे विश्वस्त आणि दिंडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

८ जुलै (ज्येष्ठ वद्य अष्टमी) : आळंदी येथून प्रस्थान

९ व १० जुलै : पुणे मुक्काम

११ व १२ जुलै : सासवड मुक्काम

१३ जुलै : जेजुरी

१४ जुलै : वाल्हे मुक्काम

१५ जुलै : नीरा येथे स्नान, नंतर लोणंद मुक्काम

१६ जुलै : चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण, तरडगाव मुक्काम

१७ जुलै : फलटण मुक्काम

१८ जुलै : बरड मुक्काम

१९ जुलै : नातेपुते मुक्काम

२० जुलै : पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, माळशिरस मुक्काम

२१ जुलै : खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, वेळापूर मुक्काम

२२ जुलै : ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट, भंडीशेगाव मुक्काम

२३ जुलै : बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण, वाखरी मुक्काम

२४ जुलै : आषाढ दशमी, पंढरपूर येथे आगमन व मुक्काम

२५ जुलै : आषाढी एकादशी सोहळा

बैठकी दरम्यान वारीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी शासनस्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भाविकांमध्ये पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूर (बेळगाव) मित्रमंडळ, पुणे तर्फे शनिवारी महिला दिन – स्नेहमेळावा
विविध पुरस्कारांचे होणार वितरण

पुणे : पुण्यात स्थायिक खानापूर (बेळगाव) तालुक्यातील नागरिकांसाठी मातृसंस्था म्हणून कार्यरत ‘खानापूर (बेळगाव) मित्रमंडळ, पुणे’ तर्फे येत्या शनिवार,२१ मार्च २०२६ रोजी भव्य महिला दिन व वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुणे शहरातील वडगाव-धायरी येथील मुक्ताई गार्डन मध्ये दुपारी ३ वाजता सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय पाटील यांनी दिली.

कार्यक्रमाचा उद्देश पुण्यात स्थायिक खानापूरवासीयांना एकत्र आणणे आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणे हा आहे. यासाठी कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष श्री. रामचंद्र बाळेकुंद्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार असून, मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन देतील. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती राहणार असून, स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांसाठी मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘KBMM पुरस्कार’ सोहळा. यामध्ये समाजासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या व्यक्तीला ‘KBMM जीवनगौरव पुरस्कार’. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘KBMM ज्ञानरत्न पुरस्कार’. व्यापार आणि उद्योगात भरारी घेणाऱ्या उद्योजकांसाठी ‘KBMM उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

खानापूर (बेळगाव) परिसरातील जे नागरिक सध्या पुणे आणि परिसरात वास्तव्यास आहेत, त्यांनी या कौटुंबिक स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या भागातील लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांनी अगत्याने यावे, असे आवाहन आयोजक खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

The post खानापूर (बेळगाव) मित्रमंडळ, पुणे तर्फे शनिवारी महिला दिन – स्नेहमेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. खबरदारी म्हणून त्यांना सलाईन लावण्यात येणार असून, अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

अलीकडेच ते पाच दिवस उपचार घेऊन घरी परतले होते. त्याआधी बारामती येथील निवासस्थानी असताना त्यांना खोकला आणि कफाचा त्रास जाणवू लागला होता. छातीत कंजेशनची लक्षणे दिसल्याने वैद्यकीय पथकाने तपासणी करून त्यांना तातडीने पुण्यात हलवले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

The post राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल appeared first on News 24 Tass Marathi.