Gadhinglaj Archives | News 24 Tass Marathi

जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी ३३ ठिकाणी पार्किंगची सोय
कोल्हापूर / प्रतिनिधी

श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे ४०० पोलीस आणि ४०० होमगार्ड तैनात करण्यात आले असून शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन व जुने एस.टी. स्टँड परिसर, तोरणाई कडा, पिराचा कडा, एमटीडीसी परिसर, सेंट्रल प्लाझा, ग्रामपंचायत परिसर, यमाई मंदिर परिसर, निलगिरी बाग, दानेवाडी फाटा आदी ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान वाहतुकीवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहने, मालवाहतूक ट्रक, रिक्षा आणि ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास बंदी असेल. तसेच मुख्य यात्रेच्या दिवशी १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांनाही काही मार्गांवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

The post जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी ३३ ठिकाणी पार्किंगची सोय appeared first on News 24 Tass Marathi.

गडहिंग्लज येथे १५ मार्चला मराठा समाजाचा वधू-वर महामेळावा
शिवराज विद्या संकुल हॉलमध्ये आयोजन ; युवक-युवतींना सुवर्णसंधी

गडहिंग्लज : मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी गडहिंग्लज येथे वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वडरगे रोडवरील शिवराज विद्या संकुल हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन बालाजी वधू-वर सूचक केंद्र, भडकल गल्ली, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून मराठा समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना एकमेकांना भेटण्याची आणि योग्य जोडीदार शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मेळाव्यासाठी ४०० रुपये स्वागत शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच इतर सर्व जातींची नोंदणीही मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ९००८९६६९४१ आणि ६३६४७७५५१३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The post गडहिंग्लज येथे १५ मार्चला मराठा समाजाचा वधू-वर महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

चंदगडसाठी तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचारसभा

चंदगड / प्रतिनिधी

जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १५० किमी अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यासाठी तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार असून, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखडाही लवकरच मंजूर केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजय घाडगे, अंबरिश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे चंदगडसाठी कोरा बेरर चेक” :

चंदगड विधानसभेचा शाश्वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासाठी एक ‘कोरा बेरर चेक’ असून त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम नक्की होणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चंदगड नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंदगडसाठी हवा तितका निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.चंदगड हे गोवा आणि कर्नाटक सीमेवरचे शेवटचे टोक असले तरी ते महाराष्ट्राचे प्रवेशद्वार देखील आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करणे आमची जबाबदारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज शहरांचा चेहरा मोहरा बदलणारं :

विकास व्हायचा असेल तर सत्तेत आपल्या विचारांचे लोक असावे लागतात. त्यासाठी चंदगड, आजरा नगरपंचायत व गडहिंग्लज नगरपरिषदेवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करून चंदगड,आजरा नगरपंचायत व गडहिंग्लज नगरपरिषदेवर आमच्या महायुती आणि आघाडीला सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.  विकास निधी मिळवण्यासाठी मी सदैव उभा आहे, चंदगडसह आजरा, गडहिंग्लज शहरांचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘शक्तीपीठ’चे महत्त्व फक्त आमदार शिवाजीराव पाटील यांनाच समजले :

महामार्ग आणि रस्त्याचे महत्त्व खूप कमी लोकांना समजते. त्यात आमदार शिवाजीराव पाटील आहेत, ज्यांना त्याचे महत्व समजले. त्यामुळेच त्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चाचं काढला. त्यामुळे शक्तीपीठ चंदगडमधून वळवून घेतला. त्या माध्यमातून चंदगडमध्ये लॉजिस्टि्क पार्क निर्माण करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाबळेश्वर आणि माथेरानपेक्षा चंदगडची निसर्गसंपन्नता अधिक असल्याचे सांगून येथील पर्यटन क्षेत्राला सरकारी पातळीवर विशेष चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजना जोपर्यंत आपण मुख्यमंत्री आहोत तोपर्यंत बंद होणार नाही, तसेच हेरे सरंजामी प्रश्न मार्गी लावून ५० गावांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या सभेत आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की चंदगड नगरपंचायतीसाठी १९३ कोटींचा निधी मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. चंदगडच्या तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, आयुष्यमान आरोग्य सेवा, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज व क्रीडा संकुल उभारण्याचे प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठबळाने हे सर्व प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की देशातील ८० कोटी जनतेला मोफत अन्न, १० कोटींना शौचालय, १२ कोटींना मोफत गॅस, २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजना – भाजप सरकारने कुठेही जातीयता पाहिली नाही, भ्रष्टाचार केला नाही. विकास हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या या स्वच्छ सरकारच्या पाठीशी जनतेने ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या सभेला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रास्ताविक दिग्विजय देसाई यांनी केले.

The post चंदगडसाठी तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय appeared first on News 24 Tass Marathi.