Maha-Shivratri Archives | News 24 Tass Marathi

महाशिवरात्रीच्या भक्तिमय पर्वाची महाप्रसादाने सांगता
शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी

बेळगाव / प्रतिनिधी

शहर परिसरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळल्याने संपूर्ण शहर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या उत्सवानंतर सोमवारी विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत मंदिर परिसर फुलून गेला.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने गर्दी होणार याची दखल घेत देवस्थान समित्यांनी भाविकांसाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था केली होती. पहाटेपासूनच शिवभक्त फळे, फुले आणि पूजा साहित्य घेऊन मंदिरांकडे जाताना दिसत होते. “ओम नमः शिवाय”च्या घोषात आणि मंत्रोच्चारात मंदिर परिसर दुमदुमला होता.

शहरातील विविध मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, होमहवन, महापूजा व आरती यांसारखे धार्मिक विधी पार पडले. पूजा साहित्याच्या स्टॉल्समुळे भाविकांची सोय झाली होती. अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ६ वाजता तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत रुद्राभिषेक पार पडला. रात्री पालखी सोहळा आणि महापूजा झाली. सोमवारी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.

याशिवाय मिलिटरी महादेव मंदिर, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर, टिळकवाडी महर्षी रोडवरील श्री शिवलिंग मंदिर, गोवावेस येथील ओंकारेश्वर मंदिर, आनंदनगर, शाहूनगर, शहापूर मुक्तिधाम, आयोध्यानगर गणेशपूर तसेच तालुक्यातील कणबर्गी, कडोली, मुचंडी, हंडिभडंगनाथ, मुक्तीमठ आदी ठिकाणीही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अनेक मंदिरांत ओम नमः शिवाय जप, रामनाम जप, प्रवचन, भजन यांचे आयोजन करण्यात आले. टिळकवाडीतील श्री शिवलिंग मंदिरात दोन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हिंदू धर्म संमेलन समितीच्या वतीने मंदिराला २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. समितीचे सचिव सुनील नाडगौडा यांनी देणगी मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते.

महाशिवरात्रीच्या या भक्तिमय पर्वाची सांगता महाप्रसादाने झाली असून, हजारो भाविकांनी श्रद्धाभावाने सहभाग नोंदविला.

The post महाशिवरात्रीच्या भक्तिमय पर्वाची महाप्रसादाने सांगता appeared first on News 24 Tass Marathi.

शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्र भक्तीभावाने साजरी
हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी ; उपवास फराळाचे दिवसभर वाटप

बेळगाव / प्रतिनिधी

सालाबादाप्रमाणे यंदाही शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्र भक्तीभावात साजरी करण्यात आली. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

गेल्या २८ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून येथे महाशिवरात्र उत्सव साजरा केला जात असून यंदाही मध्यरात्री व पहाटे अभिषेक, पूजा आणि आरती विधीवत पार पडले. भारतनगर येथील भक्ती महिला मंडळाच्या भजन कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले.

दुपारी अकरा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत भाविकांसाठी उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला. उपासाची खिचडी, केळी, द्राक्षे, राजगिराचे लाडू आदी पदार्थांचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने महापौर मंगेश पवार, वाणी जोशी, नितीन जाधव, स्मशानभूमीतील महापालिकेचे रखवालदार राजेश बंस, राजन अनगोळकर तसेच विजय सावंत आणि शंकर पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

The post शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्र भक्तीभावाने साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

शिवगिरी शिवमंदिरात रविवारी महारुद्राभिषेक
बेळगाव : पाईपलाईन रोड विजयनगर येथील शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता रुद्राभिषेक,सकाळी 11.30 पासून महारुद्राभिषेक तर रात्री 12 वाजता नामस्मरण व यामपूजा होणार आहे. यावेळी फळांच्या रसाचा अभिषेक करण्याची संधी भाग घेणाऱ्या भक्तांना देण्यात येणार आहे. तसेच महारुद्राभिषेक प्रारंभ झाल्यापासून उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक श्री. पी. सी. कोकितकर यांनी केले आहे.

The post शिवगिरी शिवमंदिरात रविवारी महारुद्राभिषेक appeared first on News 24 Tass Marathi.

चलवेनहट्टीत १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन
चलवेनहट्टी : येथील ब्रम्हलिंग देवस्थानात रविवारी दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे देवाची विधीवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनार्थ खुले करण्यात येणार आहे. रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उत्सवानिमित्त सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ वाजल्यापासून महाप्रसादास प्रारंभ होईल. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरात्र उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

The post चलवेनहट्टीत १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

श्री महाशिवरात्री महोत्सवाच्या पूर्वतयारीची अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री महाशिवरात्री महोत्सवाच्या पूर्वतयारीची आज पोलीस अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने यंदाच्या श्री महाशिवरात्री महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवभक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून केल्या जाणाऱ्या या पूर्व तयारीचा आज पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक महांतेश द्यामणावर आणि एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई यांच्या समवेत महापालिकेचे आनंद पिंपळे, श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे, संतोष देवर आदींचा सहभाग होता.

The post श्री महाशिवरात्री महोत्सवाच्या पूर्वतयारीची अधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.