londha Archives | News 24 Tass Marathi

लोंढा बाजारात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर : जंगलातून भरकटत गावात आलेल्या एका हरणाचा लोंढा बाजारात कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आज सकाळी खानापूर तालुक्यातील लोंढा शहरात हे हरीण अचानक बाजार परिसरात दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना हरीण गंभीर जखमी झाले.

घाबरलेल्या अवस्थेत पळत ते जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात शिरले. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हरणाला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार सुरू केले.

मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमा आणि भीतीमुळे झालेल्या धक्क्यामुळे उपचार सुरू असतानाच हरणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लोंढा परिसरातील नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

The post लोंढा बाजारात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा दुर्दैवी मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कुप्पटगिरी क्रॉसवर कारचा भीषण अपघात
कंग्राळी बी.के.येथील सहा जण गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजकाला धडक

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर–लोंढा महामार्गावरील कुप्पटगिरी क्रॉस येथील पुलावर रविवारी (दि. १५) सायंकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात कंग्राळी बी.के. (ता. बेळगाव) येथील सहा जण गंभीर जखमी झाले. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानक येथे नोंद करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कंग्राळी बी. के. येथील काही जण केए-२२ एम ए ६६०४ क्रमांकाच्या कारने दांडेली जवळील कवळे येथील शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बेळगावकडे परत येत असताना खानापूरजवळील कुप्पटगिरी क्रॉस पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले.नियंत्रण सुटताच कार प्रथम रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोराची होती की, त्यानंतर कारने तेथे उभारण्यात आलेल्या फलकावरही धडक दिली. या भीषण अपघातात नितीश हुरुडे, ओमकार पाटील, परशुराम अष्टेकर, कपिल पाटील, नागराज पाटील आणि कुणाल हेब्बाळकर (सर्व रा. कंग्राळी बी.के.) हे सहाही जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि तातडीने बेळगाव येथील विजय हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.

The post कुप्पटगिरी क्रॉसवर कारचा भीषण अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

लोंढा रेल्वे फाट्याजवळ भीषण दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
लोंढा : लोंढा रेल्वे फाट्याजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाऊ बाबू खरात (वय २३, रा. गवळीवाडा, वरकड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत नाऊ खरातच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बॅरिकेड्सला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. नाऊ खरात हा शुक्रवारी मावशीच्या घरी गेला होता. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास लोंढा रेल्वे गेटजवळ त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेड्सवर आदळली. धडक इतकी तीव्र होती की दोन बॅरिकेड्सच्या मधोमध तो अडकला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोंढा ओपीचे विवेक वडे, एफ. मुल्ला व प्रवीण करंबळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खानापूरचे पोलीस निरीक्षक लाडसाब गौंडी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

The post लोंढा रेल्वे फाट्याजवळ भीषण दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.