legislative council Archives | News 24 Tass Marathi

कर्नाटक विधान परिषदेवर ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांची नियुक्ती
बसवराज होरट्टींचा राजीनामा ; सभापतीपदासाठी हालचालींना वेग

बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांनी शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्या दालनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

शपथविधी कार्यक्रमाला केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, मंत्री नरेंद्रस्वामी, विधान परिषदेचे सरकारी मुख्य सचेतक सलीम अहमद, आमदार प्रकाश कोळीवाड, तसेच सदस्य एस. रवी, आयव्हन डिसूझा, एच. पी. सुधामदास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुरुवातीला त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली होती.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होरट्टी यांनी यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तत्काळ राजीनामा सादर केला. आपल्या राजीनामा पत्रात हा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नवीन सभापतीची निवड होईपर्यंत बसवराज होरट्टी हंगामी सभापती म्हणून कामकाज पाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post कर्नाटक विधान परिषदेवर ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांची नियुक्ती appeared first on News 24 Tass Marathi.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी
भाजपला दोन जागांवर यश

बेंगळुरू : राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून सत्ताधारी काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. भाजप आणि जेडीएसमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील क्रॉस-व्होटिंगचा फटका बसत जेडीएसला मोठा पराभव सहन करावा लागला, तर काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी झाले.

एकूण सात जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने पाच, तर भाजपने दोन जागा जिंकल्या. निकालांमध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी दिसून आल्या. विरोधी गोटातील क्रॉस-व्होटिंग हे या निकालांचे प्रमुख कारण ठरले. एकूण २२२ मतांपैकी एका मतपत्रिकेत चुकीचा क्रमांक लिहिल्यामुळे एक मत अवैध ठरले.

काँग्रेसच्या उमेदवारांनी चुरशीच्या लढतीत आघाडी घेत विजय मिळवला. बी.के. हरिप्रसाद, थिप्पनप्पा कामकानूर आणि बी.एस. शिवण्णा या तिघांना प्रत्येकी ३० मते मिळाली. पी.व्ही. मोहन यांनी २९ मते मिळवत विजय निश्चित केला, तर पाचवे उमेदवार विनय कार्तिक यांनी ३२ मते मिळवत सहज यश मिळवले.

दुसरीकडे, जेडीएससाठी हा निकाल धक्कादायक ठरला. बीसी प्रवर्गातील क्रॉस-व्होटिंगमुळे जेडीएसचे एकमेव उमेदवार गोविंदराजू यांना केवळ १४ मते मिळाली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा ११ मते अधिक मिळाल्याचे स्पष्ट झाले असून भाजपच्या चार आणि जेडीएसच्या सात आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २७.६३ मतांचा कोटा आवश्यक होता.

भाजपचे उमेदवार आर. रघु यांनी २९ मते मिळवत थेट विजय मिळवला, तर दुसरे उमेदवार लिंगराजू पाटील यांना २७ मते मिळाली. मात्र कोटा पूर्ण न झाल्यामुळे निकाल प्रक्रियेत एलिमिनेशन राऊंडचा आधार घेण्यात आला आणि अंतिम टप्प्यात लिंगराजू पाटील यांचा विजय निश्चित झाला.

The post विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी appeared first on News 24 Tass Marathi.

विधान परिषदेच्या सात जागांसाठी विधानसौधमध्ये गुप्त मतदान
माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी होतील व्यक्त केला विश्वास

बेंगळूरू : विधान परिषदेच्या सात जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसौधच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या या गुप्त मतदान प्रक्रियेत माजी मंत्री आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला.

विधान परिषदेवरील सात सदस्यांच्या निवडीसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून, काँग्रेस पक्षाच्या पाचव्या उमेदवाराच्या विजयासाठी पक्षाने विशेष रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या आमदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

यापूर्वी दोन दिवस एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक आणि विचारविनिमय सत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी त्या बिदादी येथील रिसॉर्टमधून थेट विधानसौध येथे दाखल झाल्या आणि त्यांनी मतदान केले.

मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षातील सर्व आमदार एकसंघ असून पक्षाच्या रणनीतीनुसार मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या २२२ सदस्यांकडून विधान परिषदेवरील सात सदस्यांची निवड करण्यात येत असून, या निवडणुकीच्या निकालाकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

The post विधान परिषदेच्या सात जागांसाठी विधानसौधमध्ये गुप्त मतदान appeared first on News 24 Tass Marathi.