law Archives | News 24 Tass Marathi

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल संरक्षण कायदा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथे ‘बाल संरक्षण कायदे’ या विषयावर विशेष माहिती कार्यक्रम उत्साहात पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सौदामिनी सावंत यांनी केले. यावेळी शालेय शिक्षकांनीच ‘संसाधन व्यक्ती’ (Resource Persons) म्हणून जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांना कायद्याची सखोल माहिती दिली.

यामध्ये श्रीमती मुक्ता लोहार यांनी ‘बाल तस्करी’ (Child Trafficking), श्रीमती आरती चिंगळी यांनी ‘पोक्सो कायदा’ (POCSO Act), श्रीमती अश्विनी चकडे यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि श्रीमती शीला गेज्जी यांनी ‘बालकामगार प्रतिबंध’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बालवाटिका शिक्षिका श्रीमती काजल बांदेकर, संगीत शिक्षिका श्रीमती अक्षता मोरे तसेच शालेय क्लर्क श्रीमती राजश्री पागा यांचे सहकार्य लाभले.

केवळ व्याख्यानेच नव्हे तर, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विशेष व्हिडिओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सौदामिनी सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल मोठी जागृती निर्माण झाली आहे.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल संरक्षण कायदा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

बाल हक्क आणि कायद्याविषयी ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती
सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांची माहिती

एकाचवेळी १२०० शाळांत राबविणार मोहीम

बेळगाव / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव शालेय वयातच व्हावी आणि कायद्याविषयी भीतीऐवजी समज निर्माण व्हावी, या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यात ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १२०० माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी बाल हक्क आणि संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, टिळकवाडी येथील केएलएस संस्थेत या उपक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती जयंत बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिल्हाभरातील शाळांमध्ये पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध आणि बालकामगारविरोधी कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाईल.

या मोहिमेसाठी ६५ न्यायाधीश, ज्येष्ठ वकील व स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली असून ते प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कायद्याविषयी मूलभूत समज वाढवणे आणि तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती देणे, यावर विशेष भर राहणार आहे.

याशिवाय १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असून सुमारे २८ हजार प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ८५ पीठे कार्यरत राहतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ९० दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सामंजस्यातून प्रलंबित खटले कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले.

The post बाल हक्क आणि कायद्याविषयी ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत आर. एल. लॉ कॉलेजचे घवघवीत यश
आठ विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील नामांकित केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत दिवाणी न्यायाधीशपदी मजल मारली आहे. या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिवाणी न्यायाधीशपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मौनेश बडिगेर, नवीन कोपार्डे, हळ्याळप्पा, प्रियांका राजगोळकर, जगदीश कित्तूर, श्रेया उत्तूरे, विजयकुमार बुद्री आणि नागराज तळवार यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन कारणीभूत असल्याची भावना महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली. भविष्यात सक्षम व नैतिक मूल्ये जपणारे कायदेतज्ज्ञ घडवण्याच्या ध्येयाशी संस्था कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या यशाबद्दलकर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष पी. एस. साहुकार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ए. के. तगारे, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार तसेच सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

The post कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत आर. एल. लॉ कॉलेजचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.