land surveyors Archives | News 24 Tass Marathi

कायमस्वरूपी नोकरी आणि समान वेतनाच्या मागणीसाठी बेळगावात भूमापकांचे आंदोलन
बेळगाव : बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे परवानाधारक (लायसन्स) सर्वेअरांनी त्यांच्या कायमस्वरूपी नोकरीसाठी, समान वेतन व सेवा सुरक्षेसाठी रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कडक उन्हातही आंदोलन करताना सर्वेअरांनी सरकारने तातडीने मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने सर्वेअर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांची मुख्य मागणी आहे की, परवानाधारक सर्वेअरांना सरकारी सर्वेअरप्रमाणे कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी. तसेच, समान कामासाठी समान वेतन, आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी (PF) आणि सामाजिक सन्मान देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ते सरकारी सर्वेअरप्रमाणेच सर्व कामे पार पाडतात, परंतु त्यांना नियमित वेतन व मूलभूत सुविधा मिळत नाहीत. सध्या “फाईलप्रमाणे मानधन” पद्धत लागू आहे, ज्यामुळे अनेकदा दोन-तीन महिन्यांनी पैसे मिळतात आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. याशिवाय, कामासाठी आवश्यक सुविधा, बसण्याची सोय आणि सहाय्यक कर्मचारी यांचा अभाव असल्याचेही त्यांनी सांगितले.

अखिल कर्नाटक सरकारी परवानाधारक भू-मापक संघाने नवीन भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून विद्यमान सर्वेअरांना प्राधान्य देण्याचे आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे सरकारकडे आवाहन केले आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनामुळे चन्नम्मा चौक आणि आरटीओ सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रमुख मागण्या :

परवानाधारक भू-मापकांना कायमस्वरूपी सरकारी सर्वेअर म्हणून नियुक्ती

समान कामासाठी समान वेतन, सुविधा व सेवा सुरक्षा

आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्ती वेतन यांसारख्या सुविधा

“फाईलप्रमाणे पैसे” पद्धत रद्द करून नियमित वेतन प्रणाली लागू करणे

नवीन भरती प्रक्रिया रद्द करून विद्यमान सर्वेअरांना प्राधान्य

The post कायमस्वरूपी नोकरी आणि समान वेतनाच्या मागणीसाठी बेळगावात भूमापकांचे आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.