ksrctc Archives | News 24 Tass Marathi

मच्छे गावातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी
ग्रामस्थांचे महामंडळ उपाध्यक्षांना निवेदन

बेळगाव : तालुक्यातील मच्छे गावातील अपुऱ्या बससेवेमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गावातून शहराकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही बस थांबा व फेऱ्यांची पुरेशी सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमन्नावर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

मच्छे गावाची लोकसंख्या सुमारे १५ ते २० हजार असून, दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि नागरिक विविध कामांसाठी बेळगाव शहरात ये-जा करतात. मात्र या मार्गावरून धावणाऱ्या अनेक बसेस गावात थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना ऑटो आणि टेम्पोचा वापर करावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

अलिकडेच बस पकडण्याच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा पडून अपघात झाला आणि ती जखमी झाली. या घटनेनंतर गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुनील हणमन्नावर यांची भेट घेऊन मच्छे गावासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात, तसेच धावणाऱ्या बसेसना गावात नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सोमवारपर्यंत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन सुनील हणमन्नावर यांनी दिले. मात्र, निर्धारित वेळेत बससेवेचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

The post मच्छे गावातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरू
उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्याहस्ते लोकार्पण

एनडब्ल्यूकेएसआरटीसीचा उपक्रम

बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज विश्रामगृह सुरू करण्यात आले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्या हस्ते या नव्या विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कर्तव्यावर आलेल्या चालक-वाहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना सुनील हणमण्णावर यांनी सांगितले की, चालक-वाहकांना विश्रांतीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याबाबत माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन हे विश्रामगृह उभारण्यात आले आहे.

या विश्रामगृहात एकाच वेळी २० ते २५ कर्मचाऱ्यांना विश्रांती घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून गाद्या, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्वतंत्र भोजनगृह (डायनिंग) अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरासारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांना आतापर्यंत विश्रांतीसाठी योग्य जागेचा अभाव जाणवत होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत हे हायटेक विश्रामगृह उभारण्यात आल्याने चालक-वाहकांनी मंडळ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला बेळगाव विभागाचे नियंत्रक शशिधर मडीदेवरमठ यांच्यासह मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरू appeared first on News 24 Tass Marathi.

गणेशपूर – महालक्ष्मी लेआउट बससेवा सुरू करण्याची मागणी
मल्लेश चौगुले यांचे एनडब्ल्यूकेएसआरटीसी उपाध्यक्षांना निवेदन

लवकरच निर्णयाचे आश्वासन

बेळगाव : गणेशपूर आणि महालक्ष्मी लेआउट परिसरात सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर मल्लेश चौगुले आणि स्थानिक नागरिकांनी नैऋत्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेएसआरटीसी)चे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नवर यांची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशपूर ते बेळगाव सेंट्रल बस टर्मिनस (सीबीटी) दरम्यानची बससेवा पुढील दोन दिवसांत पुन्हा सुरू करावी, तसेच सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

गणेशपूर आणि महालक्ष्मी लेआउट परिसरात सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सुविधा असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर एनडब्ल्यूकेएसआरटीसीचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नवर यांनी गणेशपूरच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत, गणेशपूर–महालक्ष्मी लेआउट या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही बससेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ही बससेवा सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

The post गणेशपूर – महालक्ष्मी लेआउट बससेवा सुरू करण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात बस कर्मचाऱ्यांचा संताप
मध्यवर्ती बस स्थानकावर आंदोलन

विश्रामगृह आणि स्वच्छतागृहांची मागणी रखडली

बसमध्येच रात्र काढण्याची वेळ, परिवहन प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी

बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या बस चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात आंदोलन छेडत परिवहन विभागाच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्रामगृह, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने बसमध्येच रात्र काढण्याची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

यादगीर, म्हैसूर, कलबुर्गी, बळ्ळारी, बसवकल्याणसह २० हून अधिक जिल्ह्यांतून कर्तव्यासाठी बेळगावात येणाऱ्या चालक आणि कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी योग्य खोल्या, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोजच गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे दीड वर्षांपासून परिवहन विभागाकडे सातत्याने मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, बेळगावमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सुविधांच्या अभावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बसमध्येच विश्रांती घ्यावी लागत असून, डासांचा त्रास, उकाडा, पाऊस आणि अपुऱ्या सुविधांमुळे रात्रभर झोप न लागता दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवेत रुजू व्हावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

“रात्रभर धावल्यानंतर बसला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर अपघाताची शक्यता वाढते. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बेळगाव जिल्ह्याचे असूनही येथील कर्मचाऱ्यांना किमान सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की चालक आणि कमर्चाऱ्यांना विश्रामगृहे आणि शौचालये यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि एक सुरक्षित व मानवी कामाचे वातावरण निर्माण करण्यात यावे.

The post मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात बस कर्मचाऱ्यांचा संताप appeared first on News 24 Tass Marathi.

शेतकरी महिलांच्या आक्रमक पवित्र्याला यश
येळ्ळूर रोडवरील सर्व अधिकृत थांब्यांवर थांबणार बस

शेतकरी महिलांच्या संतापाची प्रशासनाने घेतली दखल

वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

बेळगाव : येळ्ळूर मार्गावरील अधिकृत बसथांब्यांवर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसेस न थांबविल्याने संतप्त झालेल्या शेतकरी महिला आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आले आहे. परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येळ्ळूर मार्गावरील बसथांब्यांची प्रत्यक्ष पाहणी करून उद्यापासून सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबविण्याचे लेखी आश्वासन दिले.

वडगाव, शहापूर, अनगोळ, देसूर आणि राजहंसगड परिसरातील शेकडो महिला दररोज खरीप हंगामातील शेतीकामासाठी येळ्ळूर शिवारात ये-जा करतात. मात्र, सायंकाळी परतीच्या वेळी बसमध्ये जागा उपलब्ध असूनही चालकांकडून अधिकृत थांब्यांवर बस न थांबविल्याने महिलांना तासन्‌तास रस्त्यावर उभे राहावे लागत होते. अनेकदा रात्री सात वाजेपर्यंत त्यांची प्रतीक्षा सुरू राहत असल्याने तीव्र नाराजी पसरली होती. गेल्या वर्षी याच मार्गावर बस न थांबल्यामुळे धावत बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत गेला. या प्रश्नावर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ आणि शेतकरी महिलांसह परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी आणले. मार्गावरील सर्व अधिकृत बसथांबे प्रत्यक्ष दाखवून, यापुढेही बसेस न थांबल्यास रस्ता रोको व चाकाजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचा इशारा आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेत सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबविण्याचे चालकांना सक्त आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट केले. यावेळी सतीश पाटील म्हणाले, “शेतकरी महिलांची रोजची होणारी फरफट असह्य झाली होती. न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घेतला. हा शेतकरी महिलांच्या एकजुटीचा विजय आहे.” परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे येळ्ळूर मार्गावरील शेकडो शेतकरी महिलांचा वेळेवर, सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

The post शेतकरी महिलांच्या आक्रमक पवित्र्याला यश appeared first on News 24 Tass Marathi.

वायव्य परिवहन मंडळाचे लवकरचं नामांतर
‘कित्तूर राणी चन्नम्मा’ नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांचे आश्वासन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे नाव बदलून ‘कित्तूर राणी चन्नम्मा परिवहन’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले.

वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी केंद्रीय बसस्थानकावर हा सोहळा पार पडला. यावेळी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

बेळगाव शहरासाठी १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, सध्या ५ कोटी रुपये खर्चून ११ नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या आहेत. तसेच २४ वातानुकूलित व विना-वातानुकूलित स्लीपर कोच बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावला २५० नवीन बसेस देऊन जनतेचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी परिवहन सेवेला ‘ईश्वरी कार्य’ संबोधले आणि भाजपवर टीका करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने ७,८०० नवीन बसेसची खरेदी केली असून १० हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियेत आहे. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगावच्या हक्काच्या सुविधा मिळवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. यावेळी अपघातरहित सेवा देणाऱ्या ६८ चालकांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले आणि १८८ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

The post वायव्य परिवहन मंडळाचे लवकरचं नामांतर appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहर आगारसाठी ६ कोटी ७५ लाख मंजूर
बेळगाव / प्रतिनिधी

वायव्य परिवहन महामंडळाने बेळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत बेळगाव येथील पहिल्या आगाराच्या नव्या बांधकामासाठी ६ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानाअंतर्गत आगार उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, १३ फेब्रुवारी ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे बेळगावमधील बस व्यवस्थापन अधिक सुसूत्र व आधुनिक होणार असून विशेषतः आंतरराज्य आणि लांब पल्ल्याच्या बसच्या संचालनाला मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात पहिले आगार कार्यरत होते, आता वाढती वाहतूक, जागेची कमतरता आणि आधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन नव्या ठिकाणी स्वतंत्र व सुसज्ज मात्र आगार उभारण्यात येणार आहे. १०० केव्ही क्षमतेचा नवीन वायव्य परिवहन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार दरम्यान, मंडळाने चिकोडी येथील नूतन विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी पाच कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या इमारतीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार असून, कर्मचारी तसेच प्रवाशांना सुधारित सेवा मिळणार आहेत. याशिवाय बैलहोंगल बसस्थानकातील ट्रान्सफॉर्मर स्थलांतर व नवीन वाणिज्य गाळ्यांसाठी वीज जोडणी करण्यासाठी आहे. यासाठीही स्वतंत्रपणे निविदा मागविली असून, प्रथम दर्जा पात्र कंत्राटदारांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. या सर्व कामांसंबंधीची सविस्तर माहिती परिवहन महामंडळातर्फे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. एकूणच या प्रकल्पांमुळे बेळगाव, चिक्कोडी आणि बैलहोंगल परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास चालना मिळणार आहे.

The post बेळगाव शहर आगारसाठी ६ कोटी ७५ लाख मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

सुरळीत बससेवेसाठी अतिवाड ग्रामस्थांचा परिवहन विभागावर मोर्चा
बेळगाव / प्रतिनिधी

मागील दोन वर्षांपासून अतिवाड गावाला पुरवण्यात येणारी अपुरी बससेवा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिवहन विभागाविरोधात मोर्चा काढत रास्तारोको आंदोलन केले. या दरम्यान, परिवहन विभागाच्या प्रतिनिधींना जाब विचारल्यावर गावात शौचालयांची योग्य सुविधा नसल्याचे कारण देत बस चालवा सेवा नियमित करता येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. अपुरी सेवा आणि अनियमित वेळापत्रकामुळे अतिवाडच्या रहिवाशांना ही गैरसोय सहन करावी लागत आहे.

मोर्चादरम्यान परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जबाब विचारण्यात आला असता, बस कर्मचाऱ्यांकडून पाणी आणि शौचालयांच्या अभावाचे कारण देण्यात आले. तरी ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावातील ग्रामपंचायतीनेदेखील शौचालयांसाठी निधी मंजूर केला आहे. परंतु परिवहन विभाग निव्वळ कारणे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. समस्येचे निराकरण त्वरित न झाल्यास उचगावचा रस्ता बंद करण्याचा इशारा व्यंकटेश हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

बेकिनकेरे येथील आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, बससेवा नियमित नसल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सुट्टीच्या वेळांनाही बस वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

परिवहन विभागाकडे वारंवार निवेदने दिल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आज रास्ता रोको करत विभागाकडून उत्तर मागितले. आंदोलक आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. समस्या त्वरित सोडवली नाही तर उद्यापासून उचगावचा रस्ता बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

The post सुरळीत बससेवेसाठी अतिवाड ग्रामस्थांचा परिवहन विभागावर मोर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल सेवेसाठी सज्ज
बेळगाव / प्रतिनिधी

अनेक वर्षांच्या विलंबानंतर, बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल अखेर प्रवाशांसाठी सेवेसाठी सज्ज झाले आहे. मागील अनेक अडथळ्यांनंतर, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. या सुविधेचे उद्घाटन aj शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते होणार आहे.

भूमिपूजन २०१६ मध्ये झालेल्या या प्रकल्पाला जवळजवळ दहा वर्षांचा विलंब झाला. मुख्य अडथळा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाशी असलेले मतभेद होते. टर्मिनल नियोजनात २.०७ एकर क्षेत्रात काम होते, त्यापैकी काही जागा कॅन्टोन्मेंटच्या अधिकाराखाली येत होत्या. कॅन्टोन्मेंटच्या अडचणींमुळे काम थांबले, पुनर्रचना आणि वाटाघाटी कराव्या लागल्या.

नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी प्रतीक्षा क्षेत्रे, बस बे, बोर्डिंग सुविधा, दुकाने आणि वरच्या मजल्यावर उभे परिसंचरण व व्यवसायिक क्षेत्र यांचा समावेश आहे. खालच्या मजल्यावर बस व बोर्डिंग सुविधा आहेत, तर वरच्या मजल्यावर प्रवाशांसाठी आरामदायी जागा उपलब्ध आहे. एस्केलेटर आणि पार्किंग सुविधेमुळे प्रवाशांना सोयीसुविधा अधिक सुलभ होणार आहेत.

The post बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल सेवेसाठी सज्ज appeared first on News 24 Tass Marathi.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प
बेळगावलाही फटका

प्रवाशांचे हाल ; अनेकांकडून खासगी वाहनांचा अवलंब

बेळगाव / प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. बेळगाव शहरातही संपाचा परिणाम झाला असून बहुतेक कर्मचाऱ्यांनी आज कामाला दांडी मारणेच पसंत केले आहे. दुसरीकडे संपामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.बसेसविना अनेक प्रवाशांवर सकाळपासून मध्यवर्ती बस स्थानकावर ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे.

नियमित बससेवेमध्ये बेळगाव विभागात दररोज ७०० तर चिक्कोडी विभागात ६६८ बसेस धावतात, दोन्ही विभागात दररोज ४३०० हून अधिक कर्मचारी काम करतात. मात्र संपामुळे आतापर्यंत आगारामधून एकही बस बाहेर पडलेली नाही. फक्त लांब पल्ल्याच्या शहरांमधून येणाऱ्या बसेस बसस्थानकावर आल्या आहेत.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलिस बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाले आहेत. मार्केट पोलीस स्थानकातील एक सीपीआय आणि तीन पीएसआयसह कर्मचारी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सेवांवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी सहकाऱ्यांच्या मदतीने मध्यवर्ती बस स्थानकावरील प्रवाशांना खाजगी बसेस आणि इतर वाहनांद्वारे त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.

एकंदरीत या संपामुळे जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी अनेकजण खासगी वाहनांचा अवलंब करताना दिसत आहेत.

The post राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प appeared first on News 24 Tass Marathi.