Raigad Archives | News 24 Tass Marathi

रायगड जिल्ह्यातून बेळगाव सीमाप्रश्नासाठी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पत्रकारांनी एकजूट दाखवत दिला पाठिंबा

रायगड : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नावर न्याय मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी सक्रिय सहभाग नोंदवून या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही भेट देऊन मोहिमेला अधिक बळ दिले जाणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार नरेश पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सीमाभागातील पत्रकारांना उद्देशून आवाहन केले होते की, माध्यमांनी पुढाकार घेऊन हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित मुद्दा लवकर निकाली निघावा यासाठी प्रयत्न करावे. सुमारे ७० वर्षांपासून ४० लाखाहून अधिक मराठी भाषिक नागरिक या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकारांनी १ लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेऊन मोहीम राबविण्याचे ठरविले.

माणगाव शहरातून सुरू झालेल्या मोहिमेत आता म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील पत्रकारही सहभागी झाले आहेत. माणगाव तालुका प्रेस क्लबच्या ज्येष्ठ पत्रकार पद्माकर उभारे यांच्या निवासस्थानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गौतम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार एकत्र येऊन स्वाक्षरी करून मोहिमेला अधिक बळ देत आहेत.

यासोबतच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) मराठी हक्क आणि सीमावादाच्या न्याय मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नैतिक आणि ठोस पाठिंबा दर्शविला. पत्रकार नरेश पाटील यांनी उपस्थितांना मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली आणि मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. उपस्थित पत्रकारांनी त्याचे पालन करत स्वाक्षरी केली आणि मराठी अस्मिता व हक्कांसाठी ठाम संदेश दिला.

ही स्वाक्षरी मोहीम रायगड जिल्ह्यात वेगाने बळ घेत असून, तिचा संदेश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. लोकही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवत आहेत. लवकरच लातूर जिल्ह्यातही ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सीमावादाचा प्रश्न आता फक्त सीमाभागापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरत असून, माणगावातील पत्रकारांनी दाखविलेली एकजूट मराठी हक्कांच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरत आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पत्रकारांनी स्वाक्षरी करून एमईएसच्या मागणीला पाठिंबा दिला व मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट असल्याचा ठाम संदेश दिला. यावेळी सर्वांनी एकमुखाने या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविलेल्या सर्व पत्रकारांचे नरेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. मराठी अस्मिता आणि हक्कांच्या लढ्यात माणगावातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे, ही स्वाक्षरी मोहीम आता रायगड जिल्ह्यात वेगाने बळ घेत असून तिचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने पुढे येत आपला पाठिंबा दर्शवत आहेत. तसेच या चळवळीचा विस्तार होत असून लातूर जिल्ह्यातही लवकरच स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच सीमावादाचा मुद्दा आता व्यापक पातळीवर पसरत असून त्याला वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकूणच, सीमावादाचा प्रश्न आता केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. माणगावातील पत्रकारांनी दाखविलेली ही एकजूट आणि लढाऊ भूमिका मराठी हक्कांच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरत असून, रायगड ते लातूर असा विस्तार घेत असलेली ही स्वाक्षरी मोहीम येत्या काळात अधिक व्यापक होऊन जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

The post रायगड जिल्ह्यातून बेळगाव सीमाप्रश्नासाठी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन !
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने मराठी अस्मितेची जागृती आणि महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी २५ जानेवारी २०२६ रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व क्रांतीभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

महाड शहराच्या मध्यभागी असलेल्या चवदार तळ्याला सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. एकेकाळी अस्पृश्यांना या तळ्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून समाजातील सर्व घटकांसाठी पाण्याचा हक्क मिळवून दिला आणि २० मार्च १९२७ रोजी हे तळे सर्वांसाठी खुले झाले.

याच पवित्र स्थळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला तसेच सीमाप्रश्नी सीमावासीयांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. स्मारक समितीचे प्रशांत जाधव, दीपक घाडगे आणि प्रदीप सकपाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, “ज्या बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली, त्याच संविधानावर विश्वास ठेवून सीमावासीय गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी नक्कीच न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

कार्यकर्त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ तसेच ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील, शिवाजी हवळाणाचे, मोतेश बारदेशकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर, सुरज जाधव, सचिन दळवी, ॲड. वैभव कुट्रे, रायगड जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार नरेश पाटील, रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव, सुशांत देसाई, निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते.

दरम्यान, सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी सुमारे २०० ते २२५ कार्यकर्ते किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मराठी सन्मान यात्रेची औपचारिक सुरुवात करणार आहेत.

The post मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन ! appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून
बेळगाव : मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्या नंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व प्रत्येक मराठी माणूस ज्याला स्वराज्याची राजधानी मानतो त्या किल्ले रायगडावरून 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे.

26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस मानला जातो व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा संविधान दिवस मानला जातो. याच संविधानाची सीमाभागात कर्नाटक सरकारने पायमल्ली गेली 70 वर्षे सुरू केलेली असून त्याची परिसीमा गाठलेली आहे.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या दिनांक 12 जानेवारीच्या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ज्या कोणी कार्यकर्त्यांना या सन्मान यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील – (7899094108) , सरचिटणीस मनोहर हुंदरे – (9945346640), उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर – (9741289806)

या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे,मोतेश बारदेशकर,सागर सांगावकर अभिजीत मजुकर, इंद्रजीत धामणेकर,सुधीर शिरोळे, रमेश माळवी,सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी, आदी उपस्थित होते.

The post मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून appeared first on News 24 Tass Marathi.