kdp meeting Archives | News 24 Tass Marathi

ईएसआय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीला गती देण्याची मागणी
केडीपी बैठकीत चर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील सुवर्णसौध येथे झालेल्या केडीपी बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीच्या प्रारंभी विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. “प्रकल्प सुरू करूनही काम थांबलेले आहे, अशा परिस्थितीत शाळांचे आणि इतर सुविधांचे विकास कसा होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्व समस्यांची सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले. तर यादव यांनी मुख्यमंत्रीस्तरावर प्रश्न नेण्याचा सल्ला दिला.

जमीन संपादनाच्या कामात अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण केल्याबद्दल कागवाडचे आमदार व डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष राजू कागे यांनी नाराजी व्यक्त केली. “केंद्र सरकार मदतीस तयार आहे. अधिकाऱ्यांनी योग्य अहवाल दिल्यास आम्ही शिष्टमंडळासह केंद्र मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देऊ,” असे त्यांनी सांगितले.

ईएसआय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुढे आला असता उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी लवकरात लवकर नवीन इमारत बांधण्याची गरज व्यक्त केली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले “या प्रकल्पासाठी १५२ कोटी मंजूर आहेत. जुने रुग्णालय रिकामे केल्याशिवाय बांधकाम सुरू होऊ शकत नाही. एकदा निधी परत गेला तर पुन्हा मंजुरी मिळणे कठीण आहे.”

बैठकीला चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

The post ईएसआय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीला गती देण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

केडीपी बैठकीत शिक्षकांच्या समस्या आणि सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यावर महत्त्वपूर्ण चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या केडीपीच्या प्रगती आढावा बैठकीत सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे तसेच शिक्षकांच्या समस्या या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.

यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य तो प्रतिसाद न दिल्याबद्दल बीईओंवर टीका केली. तर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी त्यांच्या मतदारसंघातील सरकारी शाळांना अत्याधुनिक (स्मार्ट) स्वरूप देण्याबाबत सरकारकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर क्षेत्रीय शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडळाकडून आलेल्या सूचनेनुसार मागितलेली माहिती तातडीने पाठवण्यात आली आहे. ५७ शाळांचे अपग्रेडेशन आधीच पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमदार आसिफ सेठ व आमदार गणेश हुक्केरी यांनीही ही बाब वेळेवर आमदारांच्या लक्षात न आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना शाळांची यादी तयार करून आमदारांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी पुन्हा एकदा सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या किरकोळ पण महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. डीडीपीआयने समाधानकारक उत्तर न दिल्याने, बीईओंनी परिस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांनी मागणी केली.

या बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, आमदार प्रकाश हुक्केरी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

The post केडीपी बैठकीत शिक्षकांच्या समस्या आणि सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यावर महत्त्वपूर्ण चर्चा appeared first on News 24 Tass Marathi.