kartiki ekadashi Archives | News 24 Tass Marathi

पंढरीत भक्तीचा महासागर
कार्तिकी यात्रेसाठी ४ लाख भाविक दाखल

उद्या कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. राज्यातील विविध भागांतून वारकरी आणि भाविक पंढरीत दाखल होत असल्याने संपूर्ण शहराला भक्तीमय स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत सुमारे चार लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली होती.

भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातील दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. चंद्रभागा नदी परिसरासह मंदिराकडे जाणारे रस्ते, मठ, धर्मशाळा आणि भक्तनिवास वारकऱ्यांनी फुलून गेले आहेत. ‘विठ्ठल-विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ या जयघोषाने पंढरीचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. चंद्रभागेतील पवित्र स्नान, नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी लगबग सुरू आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त विविध दिंड्यांसह खासगी वाहनांतूनही मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात पोहोचत आहेत. चंद्रभागेच्या पलीकडील तीरावर असलेल्या ६५ एकर भक्तीसागर परिसरातील ७२५ प्लॉटपैकी ३५० प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. यात्रेसाठी आलेल्या दीड लाखांहून अधिक भाविकांनी या परिसरात तंबू आणि राहुट्या उभारून मुक्काम केला आहे.

रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्याने दर्शन व्यवस्थेत पर्यायी बदल करण्यात आले आहेत. मंदिर समितीने गोपाळपूर ते स्वेरी कॉलेज मार्गावरील खासगी जागेत १५ तात्पुरते पत्राशेड उभारले असून, त्याठिकाणी दर्शन रांगेची सोय केली आहे. सध्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना सुमारे १० ते १२ तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

शनिवारी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा

कार्तिकी शुद्ध एकादशीचा मुख्य धार्मिक सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्नीसमवेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी महापूजेचा विधी होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. यावेळी परंपरेनुसार मानाच्या वारकरी दाम्पत्यालाही महापूजेत सहभागी होण्याचा सन्मान मिळणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज

कार्तिकी यात्रेसाठी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्शन रांगेच्या मार्गावर पत्राशेड उभारण्याबरोबरच पिण्याचे शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, विश्रांतीची ठिकाणे, पंखे, कुलर आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सुमारे दोन हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत.

यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. चंद्रभागा नदीच्या घाटांवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

The post पंढरीत भक्तीचा महासागर appeared first on News 24 Tass Marathi.