Vijaypur Archives | News 24 Tass Marathi

विजापूरजवळ भीषण कार अपघात ; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
दुभाजकावर कार आदळली ; एक जण गंभीर जखमी

विजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर विजापूर जिल्ह्यातील मनगुळीजवळ झालेल्या भीषण कार अपघातात आईसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघातात सत्यवेणी (३८), हरीव्यंकटराम (२०) आणि जशवंत (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राघवेंद्र (४१) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारटगी येथील हे कुटुंब कार (क्र. KA-33 N-4689) घेऊन शिर्डी यात्रेसाठी रवाना झाले होते. प्राथमिक तपासात प्रवासाच्या तयारीमुळे कुटुंब रात्रभर जागे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चालकाला झोपेची डुलकी लागल्याने आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच मनगुळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मनगुळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.

The post विजापूरजवळ भीषण कार अपघात ; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

विजापूर हत्याकांडानंतर आयजीपी संदीप पाटील यांची घटनास्थळी पाहणी
विजापूर : चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर बेळगाव विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

शुक्रवारी दुपारी गोविंदपूर येथील शेत परिसरात हा रक्तरंजित प्रकार घडला. या घटनेत दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रकांत निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर अत्तार यांचा मृत्यू झाला आहे. तर अरविंद कटगे आणि जेसीबी चालक संदीप माने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आयजीपी संदीप पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. त्यांनी तपासाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेऊन प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.

या घटनेमागे जुन्या जमिनीच्या वादाचे कारण असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चडचण परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून डीएआर आणि केएसआरपीच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या सामूहिक हत्याकांडामुळे विजापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेनंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

The post विजापूर हत्याकांडानंतर आयजीपी संदीप पाटील यांची घटनास्थळी पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.

विजयपूर तालुक्यात जमिनीच्या वादातून सहा जणांची गोळ्या झाडून हत्या
जिल्हा हादरला

विजयपूर : चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबारात सहाजणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण भिमातीर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा सामूहिक हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वैमनस्यातूनच अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे.

The post विजयपूर तालुक्यात जमिनीच्या वादातून सहा जणांची गोळ्या झाडून हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

आलमट्टी जलाशयाच्या पाणी पातळीत घट
फक्त १२ टीएमसी पाणी शिल्लक

विजयपूर – बागलकोटमध्ये भीषण पाणीटंचाई

विजयपूर : उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या कडक उन्हामुळे आलमट्टी जलाशयातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे.

सध्या जलाशयात केवळ १२ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उष्ण हवामानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने साठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांवर स्पष्टपणे जाणवत असून दोन्ही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

The post आलमट्टी जलाशयाच्या पाणी पातळीत घट appeared first on News 24 Tass Marathi.

आयएएस अधिकाऱ्यासह तिघांचा अपघाती मृत्यू
कलबुर्गी जिल्ह्यात जेवर्गीनजीक कारला अपघात

बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्या कारला मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत महांतेश बिळगी, त्यांचे बंधू शंकर बिळगी आणि इराण्णा शिरसंगी यांचा मृत्यू झाला आहे. एका नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी विजापूरहून कलबुर्गीला जात असताना कलबुर्गी जिल्ह्याच्या जेवर्गी तालुक्यातील. गौनळ्ळी क्रॉसजवळ हा अपघात झाला. महांतेश बिळगी यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी इनोव्हा कारने (केए ०४, एनसी ७९८२) विजापूरहून कलबुर्गीला जात असताना हा अपघात घडला. जेवर्गी तालुक्यातील गौनळ्ळी येथे कारच्यासमोर कुत्रा आल्याने त्याला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली.

अपघातात शंकर बिळगी व इराण्णा शिरसंगी जागीच ठार झाले. तर महांतेश बिळंगी यांचा कलबुर्गी येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महांतेश यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच आयजीपी शंतनू सिन्हा, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी व इतरांनी इस्पितळाकडे धाव घेतली. २७ मार्च १९७४ रोजी जन्मलेले महांतेश बिळगी हे २०१२ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालकपदही सांभाळले होते.

The post आयएएस अधिकाऱ्यासह तिघांचा अपघाती मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्हा बंदी कायम
सर्वोच्च न्यायालयाचा विजयपूर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा

विजयपूर / वार्ताहर

कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्ह्यातील प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही मंजूर केला आहे, त्यामुळे कणेरी श्रींना आणखी एक झटका बसला आहे.

विजयपूर जिल्हा प्रशासनाने १६ ऑक्टोबरपासून १४ डिसेंबरपर्यंत, म्हणजेच दोन महिन्यांच्या कालावधीसाठी, बीएनएस कायद्याच्या कलम १६३(३) अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून कणेरी श्रींना जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली होती.

या आदेशाविरोधात कणेरी श्रींच्या वकिलांनी प्रथम कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयानेही प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, परंतु तेथेही विजयपूर प्रशासनाच्या भूमिकेला न्यायालयाने मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल अबाधित ठेवत कणेरी श्रींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशावर असलेली बंदी कायम ठेवली आहे.

या निर्णयामुळे विजयपूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अधिक बळकट ठरला असून, कणेरी श्रींना सध्या विजयपूर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

The post कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्हा बंदी कायम appeared first on News 24 Tass Marathi.

विजयपूर तालुक्यात पोलिसांच्या कारवाईत कुख्यात गुन्हेगार ठार
विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील रामपूर परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक रेकॉर्डवरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव युनूस इक्लास पटेल (वय ३५) असे असून, तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड होता.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, युनूसने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीस चाकू दाखवून २५ हजार रुपये लुटले आणि त्याच्याकडील स्कूटर घेऊन फरार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली होती.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की युनूस आपल्या देवनगाव (ता. आलमेल) या गावाकडे जात आहे. त्यावरून पोलिसांनी रामपूरजवळ सापळा रचला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, युनूसने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन पोलीस कर्मचारी आणि इन्स्पेक्टर प्रदीप तळकेरी यांच्यावर झेप घेतली.

स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रथम हवेत गोळी झाडली. मात्र, तो न थांबल्याने इन्स्पेक्टर तळकेरी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या युनूसला सिंदगी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

युनूस पटेलवर दोन खून, एक खुनाचा प्रयत्न आणि इतर मिळून १२ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

The post विजयपूर तालुक्यात पोलिसांच्या कारवाईत कुख्यात गुन्हेगार ठार appeared first on News 24 Tass Marathi.

शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
विजयपूर तालुक्यातील घटना

विजयपूर / वार्ताहर

विजयपूर तालुक्यातील मिंचनाळ तांडा (मादेव नगर) येथे खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवम्मा राजू राठोड (वय ८), कार्तिक विश्वा राठोड (वय ७) आणि स्वप्ना राजू राठोड (वय १२) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.दुपारच्या सुमारास मुले मेंढ्यांसोबत खेळत शेताच्या दिशेने गेली होती. खेळण्याच्या ओघात त्यांचा तोल जाऊन तिन्ही मुले शेततळ्यात पडली आणि बुडाली.

दरम्यान या घटनेनंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता काही वेळानंतर तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चेनगोंडा तसेच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी करीत आहेत.

The post शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत appeared first on News 24 Tass Marathi.

चडचण एसबीआय दरोड्यातील दागिने आणि रोकड पोलिसांच्या ताब्यात
विजयपूर / प्रतिनिधी

विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवरील मोठ्या दरोड्याच्या तपासात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दरोडेखोरांनी लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हुलजंती गावातील एका जुन्या घराच्या छतावर ठेवलेल्या बॅगेतून जप्त करण्यात आले.

माहितीनुसार, एका दरोडेखोराने चोरीचा माल असलेली बॅग घराच्या छतावर ठेवून पलायन केले होते. स्थानिक रहिवाशांच्या लक्षात ही बॅग आल्यावर त्यांनी लगेचच महाराष्ट्रातील मंगळवेढा पोलिसांना याबाबत कळवले. मंगळवेढा पोलिसांनी विजापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने ती बॅग ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी सांगितले की, “या बॅगेतून ६.५५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४१.४ लाख रुपयांची रोकड मिळाली. या दागिन्यांचे १३६ छोटे पॅकेट्स होते. बँकेतून एकूण १.४ कोटी रुपये किंमतीचे जवळपास २० किलो सोने लुटले गेले होते. त्यापैकी २१ पॅकेट्समधील दागिने आणि १.३० लाख रुपये रोख आम्हाला सापडले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “१६ सप्टेंबर रोजी दरोड्याच्या दिवशीच दरोडेखोरांनी वापरलेली इको गाडी हुलजंती परिसरात सापडली होती. या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडीतून उतरलेल्या आरोपीने पिस्तूल दाखवत पळ काढला. पळताना त्यानेच सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग एका घराच्या छतावर ठेवून दिली होती.”

निंबरगी यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा तपास आमच्या आठ पथकांकडून वेगवेगळ्या दिशांनी सुरू आहे. लवकरच संपूर्ण दरोडा उघडकीस येईल आणि आरोपींना अटक केली जाईल.”

The post चडचण एसबीआय दरोड्यातील दागिने आणि रोकड पोलिसांच्या ताब्यात appeared first on News 24 Tass Marathi.

चडचणमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियावर सशस्त्र दरोडा
८ कोटींची रोकड व सुमारे ५० किलो सोने लंपास

७-८ दरोडेखोरांकडून कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक

विजयपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजता मोठा सशस्त्र दरोडा घालण्यात आला. बुरखाधारी सात ते आठ दरोडेखोरांनी देशी पिस्तुलं व धारदार हत्यारे दाखवत बँकेतील कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधले आणि अंदाजे आठ कोटी रुपयांची रोकड तसेच पन्नास किलोच्या आसपास सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, नेमक्या लुटीबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चडचण येथील पंढरपूर मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या भागात असलेल्या एसबीआय शाखेत कर्मचारी दिवसाचे काम संपवून निघण्याच्या तयारीत असताना लष्करी गणवेशातील दरोडेखोरांनी मुख्य दरवाजातून प्रवेश केला. त्यांनी पिस्तुलं व शस्त्रांचा धाक दाखवत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाखोची रोकड व सुमारे पन्नास किलो सोने लंपास केले.

दरोडेखोरांनी चोरीचा माल घेऊन वाहनाद्वारे महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. दरोड्याची बातमी समजताच मोठ्या संख्येने नागरिक बँकेपुढे जमले. पोलीस तपासाला गती देण्यात आली असून राज्य व सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे.

The post चडचणमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियावर सशस्त्र दरोडा appeared first on News 24 Tass Marathi.