Udupi Archives | News 24 Tass Marathi

राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत राव युवा ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
२७ पदकांची कमाई

बेळगाव : करावळी तायक्वांडो चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्न राज्य तायक्वांडो संघटनेतर्फे करण्यात आले होते. कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशन आणि इंडिया तायक्वांदोशी यांच्याशी संलग्न असलेल्या कर्नाटक तायक्वांदो यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच यक्षित युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने १ फेब्रुवारी २०२५ रोजी उडुपी येथील महात्मा गांधी जिल्हा स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडली. आयोजनाची जबाबदारी उडुपी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनने यशस्वीपणे सांभाळली.

कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ३५० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. किनारपट्टी भागात ऑलिंपिक क्रीडा प्रकार असलेल्या तायक्वांडोला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे सरचिटणीस सी. जी. शशिवर्धन यांनी दिली. उद्घाटन सोहळा उडुपीचे आमदार यशपाल सुवर्ण यांच्या हस्ते झाला.

बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राव युवा ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण २७ पदकांची कमाई केली. शिस्तबद्ध खेळ, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढवला.

सब-ज्युनियर मुलांमध्ये घगन प्रेम शिवपुजीमठ (५० किलोखालील), वेदांत विनायक खडबडी (२५ किलोखालील), सिद्धार्थगौडा विरनगौडा गौरी (२७ किलोखालील), मोहम्मद सोहेब लतीफशाह चाँदशाह (३२ किलोखालील), ईशान सागर पाटील (२७ किलोखालील) आणि तक्श विजयमहंतेश गबसावळगी (२१ किलोखालील) यांनी सुवर्णपदके जिंकली. श्रेयसगौडा गौरी, स्मिथ नवखंडकर, अद्वित गोंड आणि दीप पाटील यांनी रौप्यपदके मिळवली; तर हर्ष वैष्णव आणि शौर्य पोटे यांनी कांस्यपदके पटकावली.

सब-ज्युनियर मुलींमध्ये श्राव्या शानभाग, सान्वी पाटील, निर्वी गाबसवलगी आणि सान्वी पोतदार यांनी सुवर्णपदके मिळवली. स्पूर्ती तालुकार आणि अनिका मुनवळी यांनी रौप्यपदके जिंकली; तर स्तुती टूमरी, सान्वी अन्वेकर, मन्श्विनी प्रजापती, झारा पीरजादे आणि अनन्या लोहार यांनी कांस्यपदके मिळवली.

कॅडेट गटात मोहम्मद शाफी चांदशाहा आणि आरुष टूमरी यांनी सुवर्णपदके जिंकली, तर प्रज्वल गूडस याने रौप्यपदक पटकावले. कॅडेट मुलींमध्ये मानवि पाटोले हिने सुवर्णपदकाची कमाई केली. या सर्व खेळाडूंना भारतीय वायू सेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद आर. राव यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असून यक्षित युवा फाउंडेशन कडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत राव युवा ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

डॉ. स्फुर्ती मस्तीहोळी जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ ने सन्मानित
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव टोस्टमास्टर्स शताब्दी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्फुर्ती मस्तीहोली यांना सामुदायिक सेवेसाठी प्रतिष्ठित जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सन्मान उडुपी लायन्स भवन येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना देण्यात आला.

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन – फेडरेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये बेलागावीची शान ठरलेल्या डॉ. स्फुर्ती मस्तीहोली यांचा विशेष समावेश होता. सामुदायिक आरोग्य, सामाजिक कल्याण आणि लोकजागृतीसाठी त्यांनी केलेल्या सेवा व उपक्रमांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समारंभाला प्रख्यात नेते, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी डॉ. स्फुर्ती यांच्या समर्पणाची, सेवा वृत्तीची आणि समाजउत्थान विषयीच्या योगदानाची प्रशंसनीय नोंद घेतली.

पुरस्कार स्वीकारताना, डॉ. स्फुर्ती यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “हा सन्मान माझ्या मार्गदर्शक, कुटुंब आणि समाजातील सर्वांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला. हा पुरस्कार मला आणखी जोमाने सामाजिक उन्नतीसाठी काम करण्याची प्रेरणा देतो.”

कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. उदंड उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप सामूहिक जबाबदारी आणि समाजनिर्मितीच्या संदेशाने करण्यात आला.

The post डॉ. स्फुर्ती मस्तीहोळी जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ ने सन्मानित appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांची बदली
भूषण बोरसे नूतन आयुक्त…!

बेळगाव / प्रतिनिधी

पोलिस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले असून बेळगाव, मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी असलेले ईडा मार्टिन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी भूषण गुलबाराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान ईदा मार्टिन यांना कोणतेही पद न देता बदली करण्यात आली आहे.

The post बेळगाव शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांची बदली appeared first on News 24 Tass Marathi.