Savadatti Archives | News 24 Tass Marathi

सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिराला वर्षभरात ३१.३१ कोटींचे उत्पन्न
मंदिराकडे ८९ किलो ८४२ ग्रॅम सोने ; ३७४ किलोहून अधिक चांदीची नोंद

बेळगाव : धर्मादाय खात्याच्या अखत्यारितील जिल्ह्यातील मंदिरांचे उत्पन्न, खर्च, बचत तसेच सोने-चांदी आणि मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमुळे अनेक मंदिरांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लमा मंदिर उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंदिराला तब्बल ३१.३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापैकी १८.६५ कोटी रुपये विविध कामांसाठी खर्च झाले असून, मंदिराकडे १२.६५ कोटी रुपयांची निव्वळ बचत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिराच्या सोने-चांदीच्या साठ्याचाही तपशील नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार मंदिराकडे सुमारे ८९ किलो ८४२ ग्रॅम १५ मिलिग्रॅम सोने, तर ३७४ किलो ५८७ ग्रॅम १७५ मिलिग्रॅम चांदी असल्याची नोंद आहे.

भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिराला दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. त्यामुळे मंदिराचे उत्पन्न आणि धार्मिक संस्थांकडील मालमत्तेचा तपशील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिराला वर्षभरात ३१.३१ कोटींचे उत्पन्न appeared first on News 24 Tass Marathi.

जमिनीच्या वादातून नुग्गानट्टीत दुहेरी हत्याकांड ; आठ आरोपी अटकेत
मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून घरात घुसून दोन भावांची निर्घृण हत्या

पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती (यरगट्टी) तालुक्यातील नुग्गानट्टी गावात मालमत्तेची विभागणी आणि जमिनीच्या भूमापनाच्या वादातून भीषण दुहेरी हत्याकांड घडले आहे. घरात घुसून दगड, काठ्या, लोखंडी सळ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुग्गानट्टी गावात जमिनीची विभागणी आणि मालमत्तेच्या हक्कावरून संबंधित कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. नुकतेच जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. मध्यरात्री अण्णव्वा आणि तिचे पती यल्लाप्पा यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाद सुरू असतानाच आरोपी काठ्या, लोखंडी सळ्या, दगड आणि धारदार शस्त्रे घेऊन घरात घुसले. त्यांनी घरातील सदस्यांवर बेछूट हल्ला चढवला. या हल्ल्यात लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) या दोन्ही भावांचा गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच फकिरप्पा नीलप्पा रामण्णवर आणि घरातील दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आठ मुख्य आरोपींना अटक केली आहे.

या दुहेरी हत्येची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि पोलीस उपअधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पुरावे संकलित करून आरोपींविरुद्ध कारवाईला गती दिली आहे.

या गुन्ह्यामागे केवळ मालमत्तेचा वाद होता की इतर काही कारणेही आहेत, याचा तपास सुरू असून, या हल्ल्यात आणखी कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, आरोपींना बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची मदत मिळाली होती का, याचाही सर्वंकष तपास मुरगोड पोलीस करत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

The post जमिनीच्या वादातून नुग्गानट्टीत दुहेरी हत्याकांड ; आठ आरोपी अटकेत appeared first on News 24 Tass Marathi.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे सहकुटूंब यल्लम्मा देवी दर्शन
यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी २१५ कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ

बेळगाव :  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह सौंदत्ती येथील पवित्र श्री यल्लम्मा देवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

यल्लम्मा डोंगरावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियेलाही मान्यता प्राप्त झाली आहे. लवकरच विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असून ती ११ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

यल्लम्मा गडाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला असून तो निश्चित कालमर्यादेत राबवून भाविकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कन्या रूहीच्या जन्मानिमित्त कुटुंबासह यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. श्रीक्षेत्र यल्लम्मा हे जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्या पत्नी अंकिता, यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी सचिव प्रभावती फकीरपूर, अयान, रूही, मडू, सवदत्ती नगरपालिकेचे आयुक्त संगनबसय्या, मल्लू जकाती, अल्लमप्रभू प्रभुनवर, मंजुनाथ अंगडी, अमीन गोरिनाई, प्रभू हंजगी, सदानंद इटी, जगदनगौडा पोलेशी, मंजुनाथगौडा संधिमनी, पंडित यडूरय्या तसेच मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते.

The post जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे सहकुटूंब यल्लम्मा देवी दर्शन appeared first on News 24 Tass Marathi.

असुंडीतील दारूचे दुकान स्थलांतरित करा
महिलांसह नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मद्यपींच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बेळगाव : जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील असुंडी गावात सुरू असलेल्या एमएसआयएल (MSIL) दारूच्या दुकानामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत दुकान तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. मद्यपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या महिला आणि विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

सौंदत्ती तालुक्यातील असुंडी आणि करकट्टी गावांदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर हे एमएसआयएल दारूचे दुकान कार्यरत आहे. या ठिकाणाजवळच श्री सद्गुरू आत्मानंद आश्रम आणि श्री सिद्धलिंगेश्वर मंदिर असून, भाविकांसह नागरिकांची या मार्गावरून सतत ये-जा सुरू असते. मात्र, दारूच्या नशेत असलेले काही समाजकंटक या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांची छेड काढत असल्याने परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यामुळे असुंडी गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपली व्यथा मांडली. हे दारूचे दुकान तातडीने अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ग्रामस्थ गंगाप्पा ज्ञानप्पा ईनामती यांनी सांगितले की, दारूच्या दुकानामुळे रस्त्यावर वाहतूक आणि गर्दी वाढत असून महिलांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत आहेत. या गंभीर समस्येबाबत तालुका प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन दारूचे दुकान लवकरात लवकर स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी गावातील नेते, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

The post असुंडीतील दारूचे दुकान स्थलांतरित करा appeared first on News 24 Tass Marathi.

अधिक मासात सौंदत्ती रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सौंदत्ती : अधिक मासात सौंदत्ती डोंगरावर उद गं…आई उदं चार गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सौंदत्ती श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या आठ सप्ताह भरात तब्बल १ लाखांहून अधिक भाविकांनी रेणुका देवीचे दर्शन घेतले. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यल्लमा डोंगर गर्दीने फुलून गेलेला पाहायला मिळत आहे.मंगळवार आणि शुक्रवारी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. डोंगरावर देवी दर्शनाला येण्यापूर्वी जोगनभावी कुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

The post अधिक मासात सौंदत्ती रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी appeared first on News 24 Tass Marathi.

मुनवळ्ळीतील अमानवीय प्रकाराची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून गंभीर दखल
वृद्ध महिलेला तातडीने उपचार व संरक्षण देण्याचे प्रशासनाला निर्देश

बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे एका वृद्ध महिलेला निर्जन ठिकाणी सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलेला आवश्यक वैद्यकीय उपचार, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मुनवळ्ळी गावाबाहेरील निर्जन परिसरात आजारी अवस्थेतील वृद्ध महिलेला सोडून दिल्याच्या घटनेची प्रसारमाध्यमांतून माहिती मिळताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

या महिलेला योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देताना मंत्री हेब्बाळकर यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. वृद्ध महिलेला मदत मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.

The post मुनवळ्ळीतील अमानवीय प्रकाराची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून गंभीर दखल appeared first on News 24 Tass Marathi.

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकासासाठी २१५ कोटींचा निधी मंजूर
भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात

बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणूका यल्लम्मा मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यासंदर्भात बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार विश्वास वैद्य यांनी प्रस्तावित विकास आराखड्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत भूमिपूजनाची तारीख निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये भव्य क्यू कॉम्प्लेक्स, सुसज्ज अन्नदान भवन, नवीन प्रशासकीय कार्यालय तसेच वॉकर्स झोन उभारण्याचा समावेश आहे. मंजूर निधीपैकी सुमारे १८० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ३५ कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

या विकासकामांमुळे यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात पावसाळ्यात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. पुढील पावसाळ्यापासून गाभाऱ्यात पाणी जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यल्लम्मा डोंगरावरील विद्यमान दुकानदारांना लिलाव प्रक्रियेद्वारे पुन्हा जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, एक जुने व्यापारी संकुल पाडण्यात येणार असून संबंधित दुकानदारांना पर्यायी जागा देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे सांगण्यात आले.

The post सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकासासाठी २१५ कोटींचा निधी मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

सौंदत्तीच्या श्री रेणुका मंदिराला ३१ कोटींचे विक्रमी दान
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ३१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. या विक्रमी देणगीमुळे कर्नाटकातील सर्वाधिक देणगी प्राप्त करणाऱ्या मंदिरांच्या यादीत या मंदिराने पाचवे स्थान मिळवले आहे.

कर्नाटक धर्मादाय विभाग यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील प्रमुख मंदिरांच्या वार्षिक देणगी अहवालात सौंदत्तीच्या रेणुका मंदिराने उल्लेखनीय स्थान पटकावले आहे.

या यादीत कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे मंदिर प्रथम क्रमांकावर असून, भाविकांकडून वर्षभरात सुमारे १६८ कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य प्रमुख देवस्थानांचा क्रम लागतो.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला मिळालेल्या मोठ्या देणगीतून या मंदिरावरील भाविकांची श्रद्धा आणि वाढती लोकप्रियता अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे.

The post सौंदत्तीच्या श्री रेणुका मंदिराला ३१ कोटींचे विक्रमी दान appeared first on News 24 Tass Marathi.

कौटुंबिक वादातून जावयाचा सासूवर चाकू हल्ला
सौंदत्ती : तालुक्यातील अलडकट्टी गावात कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.जखमी महिलेची ओळख महादेवी कारीगार (वय ४५) अशी असून आरोपी अरविंद गवळी (वय २६) याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी महादेवी यांच्या मुलीचे लग्न अरविंद गवळी याच्यासोबत झाले होते. दोन महिन्यांपूर्वी मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर ती माहेरी राहत होती. या दरम्यान आरोपी वारंवार व्हिडिओ कॉल करून बाळ दाखवण्याची मागणी करत होता. मात्र घरकामामुळे सतत मोबाईल वापरणे शक्य नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला.

या वादातूनच संतप्त झालेल्या अरविंदने अलडकट्टी येथील महादेवी यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला करून पसार झाला.घटनेनंतर जखमी महादेवी यांना तातडीने बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.माहिती मिळताच मुरुगोड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post कौटुंबिक वादातून जावयाचा सासूवर चाकू हल्ला appeared first on News 24 Tass Marathi.

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्षपदी तानाजी चव्हाण
उपाध्यक्षपदी सुशांत पाटील यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्षपदी तानाजी चव्हाण (दर्याचे वडगाव) व उपाध्यक्षपदी सुशांत राजेंद्र पाटील (लक्षतीर्थ वसाहत) यांची निवड करण्यात आली आहे.

कार्याध्यक्ष सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत 2026-27 सालाकरिता नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस सरदार जाधव, चिटणीस भाऊसो ठोंबरे, खजिनदार शिवाजी इंगवले यांची निवड करण्यात आली. मासिक बैठकीला अध्यक्ष अच्युत साळोखे यांच्यासह संचालक केशव माने, दयानंद घबाडे, युवराज मोळे, आनंदराव पाटील, गजानन विभुते, मोहन साळोखे, रमेश बनसोडे, चेतन पवळ, सतीश डावरे, आकाश पाटील, शालिनी सरनाईक,लता सोमवंशी आदी उपस्थित होते.

The post कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्षपदी तानाजी चव्हाण appeared first on News 24 Tass Marathi.