Kittur Archives | News 24 Tass Marathi

चिकबागेवाडी – एम. के. हुबळी मार्गावर भीषण अपघात
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कित्तूर : तालुक्यातील चिकबागेवाडी आणि एम. के. हुबळी दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावचे रहिवासी यासीन (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यासीन हे एम. के. हुबळी येथून चिकबागेवाडी गावाच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संबंधित वाहन त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी ‘हिट अँड रन’चा गुन्हा नोंदवला आहे. फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून पुढील तपास कित्तूर पोलीस करत आहेत.

The post चिकबागेवाडी – एम. के. हुबळी मार्गावर भीषण अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

कित्तूर देवगाव येथे क्षुल्लक वादातून एकाची निर्घृण हत्या
झोपण्याच्या जागेवरून वाद ; आरोपीला काही तासांत अटक

बेळगाव : कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथे घरासमोर झोपण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले.

बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी कित्तूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासांत अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के.रामराजन यांनी दिली.

बेळगावात येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक के.रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महांतेश निंगाप्पा हुच्चन्नावर (वय ५२) हे आरोपी प्रकाश कल्लप्पा कलार यांच्या घरासमोर झोपले होते. “माझ्या घरासमोर का झोपला?” या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्यानंतर आरोपी प्रकाश कलार याने महांतेश यांना खाली पाडून दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर ओढत नेल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक राजू पुंडलिक हुच्चन्नावर यांनी कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी प्रकाश कलार याला अटक केली.

या कारवाईत बैलहोंगलचे डीएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ, सीपीआय शिवानंद गुडेगनट्टी, पीएसआय प्रवीण गंगोळ आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांनी पथकाच्या जलद कारवाईचे कौतुक केले आहे.

The post कित्तूर देवगाव येथे क्षुल्लक वादातून एकाची निर्घृण हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
कित्तूर / वार्ताहर

कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही धक्कादायक घटना

घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, यल्लव्वा या महिलेच्या आईचे निधन होऊन अवघा आठवडा झाला होता. धार्मिक विधींसाठी ती माहेरी जाण्याच्या तयारीत होती. मात्र, पती शिवप्पा याने तिला घरी जाऊ नये, असा आग्रह धरल्याने दोघांत किरकोळ वाद झाला. हा वाद तीव्र झाल्यानंतर शिवप्पाने कुऱ्हाडीने यल्लव्वाच्या मानेवर व पाठीवर वार केले. गंभीर जखमांमुळे यल्लव्वाचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर शिवप्पानेही घरातच गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

The post कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक
अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातीत अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस. एस. ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने येत असलेल्या बसता ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेमुळे ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी कित्तूर पोलिसांनी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बस चालकाला वाचवते. ही घटना कित्तूर पोलीस ठाण्याजवळ घडली आहे.

The post कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक appeared first on News 24 Tass Marathi.

“हिट अँड रन” प्रकरणी फरार ट्रकचालकाला अवघ्या दोन तासांत अटक
हिरेबागेवाडी आणि कित्तूर पोलिसांची कारवाई

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडून कौतुक

बेळगाव / प्रतिनिधी

हिरेबागेवाडी आणि कित्तूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अवघ्या २ तासांत हिट अँड रन प्रकरणी आरोपीला अटक केली. हमीदखान (वय ३२ रा. हरियाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंप आणि माणिक्य हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असलेल्या उमेश देशनुरकर यांचा ट्रकची धडक बसून मृत्यू झाला.  या घटनेनंतर आरोपीने आपला ट्रक वेगाने पळवला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुंदरेश यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तिथे प्रत्यक्षदर्शी पेट्रोल पंप मालकाने दिलेली माहिती आणि अपघातस्थळी सापडलेला ट्रकच्या पुढील भागाचा तुटलेला तुकडा आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अंबडगट्टी क्रॉसजवळ निघालेला जेएच-05/डीएस-9944 या अशोक लेलँड ट्रकला कित्तूर ठाण्याच्या मुख्य कॉन्स्टेबलच्या मदतीने अडवण्यात आले. ट्रकच्या तुटलेल्या पुढील भागावरून अपघाताची खात्री करून आरोपी हमीदखान रुक्कुद्दीन  याला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून तपास सुरू आहे.

अपघात घडताच तात्काळ कारवाई करून आरोपीला अत्यंत कमी वेळेत अटक करणाऱ्या हिरेबागेवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर आणि त्यांच्या पथकातील पडकीमठ, श्री. शिंगण्णवर, गौराज, बाबण्णवर, कोटगी तसेच बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर ठाण्याचे मुख्य कॉन्स्टेबल व्ही. सी. कुरी यांच्या पथकाच्या कार्याची प्रशंसा करत, शहर  पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे  यांनी पथकातील सदस्यांना प्रशस्तिपत्र प्रदान केले आहे.

The post “हिट अँड रन” प्रकरणी फरार ट्रकचालकाला अवघ्या दोन तासांत अटक appeared first on News 24 Tass Marathi.

इटगी क्रॉसनजीक टँकर धडकल्याने तीन कामगार जागीच ठार
कित्तूर / वार्ताहर

कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसनजीक रविवारी दुपारी टँकरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन कामगार जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रामचंद्र महेश आणि रामण्णा अशी मृतांची नावे असून ते सर्वजण कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हे तिघेही कामगार महामार्गावर दुरुस्तीचे काम करत होते. या घटनेत भीमाबाई, लक्ष्मीबाई आणि अनुश्री या तिन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त टॅंकर नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून थेट सर्विस रोडवर कोसळला आणि त्याने कामगारांना धडक दिली. या अपघातात टॅंकर चालक ही गंभीर जखमी झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून तपास सुरू केला आहे.

The post इटगी क्रॉसनजीक टँकर धडकल्याने तीन कामगार जागीच ठार appeared first on News 24 Tass Marathi.