Hubli Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव – गोवा आणि बेंगळूरू – मुंबई नवीन रेल्वे सेवांच्या मागणीला गती द्या
खासदार जगदीश शेट्टर यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

बेळगाव : लोकसभा मतदारसंघातील विविध रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी हुबळी येथे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक के. अनंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

बैठकीत बेळगाव – कित्तूर – धारवाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अद्याप रेल्वेकडे हस्तांतरित न झाल्यामुळे काम रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुमारे १,४३० एकर जमिनीचे भूसंपादन निश्चित झाले असले, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जमीन रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया थांबली आहे.

या संदर्भात जिल्हास्तरावर यापूर्वी चर्चा झाल्याचे सांगून, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करू, असे शेट्टर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत बेळगाव–पारकनट्टी–गोकाक–यादवाड या प्रस्तावित रेल्वेमार्गावरही चर्चा झाली. या परिसरात सिमेंट उद्योग आणि साखर कारखान्यांची मोठी संख्या असल्याने या मार्गाला औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक गरज आणि औद्योगिक मागणी लक्षात घेऊन हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकपूर–रामदुर्ग–सौंदत्ती –धारवाड या नव्या रेल्वेमार्गाचाही बैठकीत उल्लेख झाला. सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देत असल्याने या मार्गाची आवश्यकता असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. प्रारंभी या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. या सर्वेक्षणासाठी सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, रेल्वे मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रस्ताव सध्या रेल्वे मंडळाच्या विचाराधीन असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

‘पंतप्रधान अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या बेळगाव आणि घटप्रभा रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचा वेग कमी असल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी सांब्रा आणि देसूर स्थानकांचा पर्यायी टर्मिनल म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.

बैठकीत बेळगाव – मनुगुरू रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावावरही विचारविनिमय झाला. सिकंदराबाद, हैदराबाद आणि चार्लापल्ली या शहरांशी जोडल्या जाणाऱ्या सेवा बेळगावीहून सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याशिवाय, बेळगाव मार्गे प्रस्तावित बेंगळूरू – मुंबई रेल्वे सेवेचाही आढावा घेण्यात आला. हा प्रस्ताव सध्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून, लवकरच त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर बेंगळूरू आणि मुंबई दरम्यानचा प्रवास बेळगावमार्गे सुमारे २३ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

बेळगाव – लोंढा – गोवा या नव्या रेल्वे सेवेची मागणीही शेट्टर यांनी बैठकीत लावून धरली. प्रादेशिक संपर्क सुधारण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

The post बेळगाव – गोवा आणि बेंगळूरू – मुंबई नवीन रेल्वे सेवांच्या मागणीला गती द्या appeared first on News 24 Tass Marathi.

हैदराबाद – बेळगाव विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ
अतिरिक्त फेरीची घोषणा

हुबळी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद–बेळगाव–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक दिशेने एक अतिरिक्त फेरी चालवण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०७०४३ हैदराबाद–बेळगाव विशेष, जी पूर्वी ३० एप्रिल २०२६ पर्यंत धावणार होती, ती आता ७ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०७०४४ बेळगाव–हैदराबाद विशेष, जी १ मे २०२६ पर्यंत नियोजित होती, ती ८ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी चालवली जाणार आहे.

या निर्णयामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

The post हैदराबाद – बेळगाव विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ appeared first on News 24 Tass Marathi.

केएससीए धारवाड विभागातर्फे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा सत्कार
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) धारवाड विभागातर्फे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे आज शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांच्या हस्ते आज मंगळवारी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे म्हैसूरी पगडी व शाल घालण्यासह विभागाचे शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अविनाश वैद्य, वीरण्णा सवदी, अल्ताफ कित्तूर, दयानंद शेट्टी, वसंत मुर्डेश्वर आदी उपस्थित होते.

The post केएससीए धारवाड विभागातर्फे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

हुबळी-पंढरपूर रेल्वे तातडीने पूर्ववत सुरू करा
माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांची मागणी

हल्याळ : कोविडनंतर बंद पडलेली हुबळी–लोंढा–मिरज–पंढरपूर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे केली आहे.

दांडेली दौऱ्यावर आलेल्या मंत्री सोमण्णा यांना दिलेल्या निवेदनात देशपांडे यांनी नमूद केले की, या मार्गावरील रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच विठ्ठल भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. कोविडपूर्व काळात ही रेल्वे नियमित धावत होती आणि दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत होती.

पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यात्रा व उत्सव काळात विशेषतः हजारो भक्त या सेवेचा लाभ घेत असत. सेवा बंद झाल्याने धार्मिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक हालचालींवर परिणाम झाला आहे.

ही रेल्वे पुन्हा सुरू झाल्यास कर्नाटक–महाराष्ट्र संपर्क अधिक सक्षम होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि लघुउद्योग व व्यापारालाही फायदा होईल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

The post हुबळी-पंढरपूर रेल्वे तातडीने पूर्ववत सुरू करा appeared first on News 24 Tass Marathi.

पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
हुबळी / वार्ताहर

अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघातात धारवाड लोकायुक्त विभागाचे पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता गदग – हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ ही घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना सालीमठ यांची कार नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या धडकेनंतर पेट्रोल टाकीला गळती होऊन ठिणगी लागल्यामुळे कारने क्षणार्धात पेट घेतला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आग इतकी भयानक होती की सालीमठ यांना कारच्या बाहेर पडण्याचा मार्गच मिळाला नाही. काही क्षणांतच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर वाहन पूर्णपणे भस्मसात झाले आहे. त्या दिवशी ते स्वतः कार चालवत हावेरीतील लोकायुक्त कार्यालयातील कामकाजातून गदग येथे कुटुंबीयांना भेटून परतत होते. मात्र वाटेतच नियतीने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

The post पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

मि. कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल मेहरवाडे विजेता
बेळगावच्या रोनक गवसला उपविजेतेपद

बेळगाव : हुबळी येथे धारवाड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना पंचमुखी हनुमान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मि.कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला. बेळगावच्या रोनक गवसला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. तर बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर ठरला. हुबळी येथील बजरंगी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास ११० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

The post मि. कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल मेहरवाडे विजेता appeared first on News 24 Tass Marathi.

गोकाकमधील घरफोडी प्रकरणाचा छडा
हुबळीच्या तिघांना अटक : सोन्या-चांदीचे दागिने जप्त

काही दागिने गहाण ठेवल्याचे उघडकीस

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या २० दिवसांपूर्वी गोकाक येथे झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा गोकाक पोलिसांनी छडा लावला आहे. केशवापूर, हुबळी येथील तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी हुबळी येथील सोने तारणावर कर्ज देणाऱ्या एका कंपनीत ३९ ग्रॅम दागिने गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

३१ ऑक्टोबर २०२५ च्या सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबरच्या रात्री ८ या वेळेत लक्ष्मी वसाहत, गोकाक येथील सचिन अशोक गोंधळी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील ३३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ९०० ग्रॅम चांदी व दीड लाख रुपये रोख रक्कम पळविली होती.सोन्याच्या दागिन्यांची किंमतच १९ लाख ८० हजार रुपये इतकी होते. तर ८० हजाराची चांदी चोरट्यांनी पळविली आहे.

गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, उपनिरीक्षक निखिल कांबळे, के. एन. इळगेर, जे. एच. गुडली, ए. सी. कापसी, एम. एल. हुच्चगौडर, एस. एस. कुरबेट, तांत्रिक विभागाचे सचिन पाटील व विनोद ठक्कन्नावर आदींनी चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

१२ नोव्हेंबर रोजी नंदीश हणमंतप्पा सक्रेप्पन्नावर (वय १९) याला तर १३ नोव्हेंबर रोजी नवीन अशोक मुंडरगी (वय २६) व रमेश शंकऱ्याप्पा अगडी वय २७) तिघेही राहणार केशवापूर हुबळी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्र, चार बांगड्या असे ६४ ग्रॅम सोने, ५९० ग्रॅम चांदी व दागिने विक्रीतून आलेले ५ लाख ६ हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. या त्रिकुटाने ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने हुबळी येथील एका सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपनीत ठेवले असून त्याची किंमत ६ लाख ६८ हजार इतकी होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते दागिने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

The post गोकाकमधील घरफोडी प्रकरणाचा छडा appeared first on News 24 Tass Marathi.

कार्तिकी एकादशीनिमित्त हुबळी – पंढरपूर विशेष रेल्वेसेवा
वारकऱ्यांना मोठा दिलासा

बेळगाव / प्रतिनिधी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर २९ ऑक्टोबरपासून ३ नोव्हेंबरपर्यंत या विशेष रेल्वे धावणार आहेत. या निर्णयामुळे बेळगाव, खानापूर, लोंडा आणि परिसरातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या विशेष रेल्वेत स्लीपर आणि जनरल अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांचा समावेश असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होणार आहे.

रेल्वेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :  दि. २९, ३०, ३१ ऑक्टोबर तसेच १, २ आणि ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.१० वाजता रेल्वे हुबळी स्थानकातून सुटेल आणि सायंकाळी ४.०० वाजता पंढरपूरला पोहोचेल. त्याच दिवशी सायंकाळी ६.०० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल आणि रेल्वे पुढील दिवशी पहाटे ४.०० वाजता हुबळी येथे परत येईल.

प्रमुख थांबे : धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड आणि सांगोला.

या विशेष रेल्वेमुळे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत.

The post कार्तिकी एकादशीनिमित्त हुबळी – पंढरपूर विशेष रेल्वेसेवा appeared first on News 24 Tass Marathi.

हुबळी – दादर – हुबळी एक्स्प्रेसला उद्यापासून खानापूर येथे एक मिनिटाचा थांबा
हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने नवा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी – दादर -एसएसएस हुबळी एक्स्प्रेस गाड्यांना खानापूर स्थानकावर एक मिनिट थांबण्याची सुविधा दिली जाणार आहे.

१७३१७ (एसएसएस हुबळी–दादर) ही गाडी संध्याकाळी ५:५९ वाजता खानापूर येथे पोहोचून ६:०० वाजता पुढे निघेल. तर १६ सप्टेंबर २०२५ रोजी, १७३१८ (दादर–एसएसएस हुबळी) सकाळी ८:४० वाजता खानापूरला येईल व ८:४१ वाजता सुटेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या नव्या थांब्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वे राज्यमंत्री बेळगाव, अनगोळ आणि खानापूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी करतील. त्यानंतर खानापूर रेल्वे फाटकाच्या मार्गाचे भूमिपूजन झाल्यावर ते या थांब्याचा औपचारिक शुभारंभ आणि हुबळी – दादर – हुबळी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुढे रवाना करतील.

The post हुबळी – दादर – हुबळी एक्स्प्रेसला उद्यापासून खानापूर येथे एक मिनिटाचा थांबा appeared first on News 24 Tass Marathi.

पुणे – बेळगाव आणखी एक वंदे भारत रेल्वे सुरू होणार
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव ते पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार असून, यामुळे पुण्याची हाय स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे, या चारही ट्रेन वेगवेगळ्या दिशांना धावणार असून प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

या वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या चार महत्वाच्या ठिकाणांशी पुण्याची नवी नॉन-स्टॉप रेल्वे कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. थांबा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच पुणे- नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेनही सुरु होणार आहे, ज्याचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार आहे.

पुणे – बेळगाव वंदे भारत : ही वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातून प्रवास करेल.सातारा, सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर या ट्रेनला या एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते. या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे. सध्या पुणे शहरातुन २ वंदे भारत ट्रेन धावतात. आता आणखी ४ वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत होईल.

The post पुणे – बेळगाव आणखी एक वंदे भारत रेल्वे सुरू होणार appeared first on News 24 Tass Marathi.