Karnataka Archives | News 24 Tass Marathi

मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात युवा समितीच्यावतीने आज जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मराठी शाळांमध्ये सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात तसेच मराठी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आज, मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनात्मक निवेदनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.

युवा समितीने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव आणि खानापूर येथील प्रत्येकी एका मराठी शाळेला कर्नाटक पब्लिक स्कूल (केपीएस)चा दर्जा देण्यात आला आहे. या शाळांमध्ये द्विभाषिक शिक्षणपद्धती लागू करण्याची तरतूद असली तरी मराठी-इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्याऐवजी कन्नड-इंग्रजी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरण्यास शिक्षकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.

संबंधित शाळांना तातडीने मराठी-इंग्रजी माध्यमाची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत तसेच अभ्यासक्रमाबाबत पारदर्शकता राखावी, अशी मागणी समितीने केली आहे. याशिवाय, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये द्विभाषिक शिक्षणपद्धती लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्यामुळे मराठी भाषा, विद्यार्थी आणि मराठी भाषिक शिक्षकांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पहिली ते पाचवीपर्यंत मातृभाषा आणि इंग्रजी तसेच त्यानंतर पूर्णपणे इंग्रजी माध्यम अशी रचना असलेल्या शिक्षणपद्धतीमुळे मराठी शाळांचे मूळ स्वरूप धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांवर इतर भाषांचे अतिक्रमण होऊ नये आणि त्यांची स्वतंत्र ओळख कायम राखावी, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ‘मूल्य शिक्षण’ हा नवीन विषय सुरू केला आहे. मात्र, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी या विषयाची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून न देता केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे हे उल्लंघन असल्याचे सांगत, मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध होईपर्यंत हा विषय मराठी शाळांमध्ये शिकवू नये तसेच लवकरात लवकर मराठी आवृत्तीची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

या सर्व मागण्यांसह विविध शैक्षणिक आणि भाषिक प्रश्नांवर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने स्पष्ट केले आहे.

The post मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात युवा समितीच्यावतीने आज जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालवणे पडले महागात
वाहन मालकाला २५ हजारांचा दंड

बेळगाव : शहरात अल्पवयीन मुलाकडून कार चालविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहन मालकाविरुद्ध कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चन्नम्मा सर्कल परिसरातील गणेश मंदिराजवळ वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा कार चालविताना आढळला. यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले तसेच मुलाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना बोलावून घेतले.

या वेळी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती पालकांना देण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली असून वाहन मालकाला न्यायालयामार्फत २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

वाहतूक पोलिसांनी पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनांची चावी देऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगून नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

The post बेळगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालवणे पडले महागात appeared first on News 24 Tass Marathi.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा
बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सात जणांसह बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुळभावी–मोदगा रस्त्यावर खुल्या जागेत मद्यप्राशन करताना आढळून आलेल्या दुंडय्या हिरेमठ आणि रेवस्त्था पाटील यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने जुन्या भाजी मार्केट परिसरात कारवाई करून राहुल जाधव आणि आकाश लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

काकती पोलिसांनी अलतगा खडी मशीन परिसरात दोन स्वतंत्र कारवाया करत अबुबकर शाहपूरकर, समीर शेख आणि बसवंत दोंडे यांना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना रंगेहात पकडले.

हिरेबागेवाडी पोलिसांनी बस्तवाड गावाजवळ लोकांना मद्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या परशुराम हणमतांचे याला अटक केली. तसेच हुलगवी गावात बेकायदेशीररीत्या दारू साठवून ठेवणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या यशस्वी कारवाया करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

The post सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा appeared first on News 24 Tass Marathi.

प्रेमळ व कणखर माता – कै. मोनाका गोरल
एक सत्वशील, सोशिक, प्रेमळ व कणखर अशा स्वभावाच्या मोनाका महादेव गोरल यांचे गुरुवार (ता. २८) रोजी अकस्मिक निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी दिवस कार्यविधी होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे..

येळ्ळूर : माणसाच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी दिसायला साधी सोपी असली तरी त्यांच्या अंतकरणातील कणखरता आणि करुणेची खोल ऊब सर्व समाजाला कवटाळून टाकते, अशाच शांत, प्रसन्न व निर्मळ स्वभावाच्या माझ्या आईचा जन्म सिद्धेश्वर गल्ली मधील चिट्टी घराण्यात सामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. आईचे शिक्षण जेमतेमच झाले होते. बालपणापासूनच शेती कामाची आवड असणारी माझी आई. शेवटपर्यंत काळ्या आईची सेवा करत राहिली. एकत्र कुटुंबात वावरत असताना आईची दिनचर्या पहाटे पाच वाजल्यापासूनच सुरू होत होती. उठल्याबरोबर डोकीवरून गोड्या विहिरीचे पाणी आणणे, गोठ्यात जाऊन,जनावरांची सेवा करणे, शेण काढणे, याचबरोबर एकत्र कुटुंबातील सदस्या करिता शंभर एक भाकऱ्या करणे. नंतर मजूर माणसासोबत दिवसभर शेतावर जाणे. संध्याकाळी परत घरी आल्यावर जनावरांची देखभाल करत स्वयंपाक करणे. दूध काढणे असा तिचा दिनक्रम असायचा. घरची कामे करत असतानाच आम्हा सात भावंडांच्या कडे सुद्धा जातीने ती लक्ष घालत होती. सर्वच मुलावर तिने समान प्रेम, काळजी आणि संस्काराची छाया पसरविली. आपल्या तिन्ही सुनाना तिने लेकी सारखीच वागणूक दिली. जावयांना सुद्धा ती मुलाप्रमाणेच मानीत असे. मुलांनी शिकावे मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती. आईचा स्वभाव विलक्षण असा होता. ती कधीही रागावलेली किंवा कधी कोणाशी भांडलेली मी आजवर पाहिलेच नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे, आपल्याला जमेल तितकी दुसऱ्यांना मदत करावी अशी तिची भावना होती. गल्लीतील प्रत्येक व्यक्तीला आऊ व आप्पा अशीच ती हाक मारीत असे. घरी आलेल्या व्यक्ती, पै पाहुण्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ न देणारी ती एक अन्नपूर्णाच होती. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणारी कधीही न चिडणारी माझी आई शेती आणि जनावरे यांच्यामध्येच शेवटपर्यंत रमली होती. वडिलांच्या प्रत्येक सुख दुःखात आई खंबीरपणे उभी राहिली. नातवंडे व पणतवंडे यांच्यावर ती निर्भेळ प्रेम करीत असे. आयुष्यात कधीही स्वतःचा मोठेपणा न मिरवता शांतपणे प्रत्येकाचे नाते जपत, अगदी चांगले आयुष्य माझी आई जगली अन अचानक 28 मे 2026 रोजी अनंतात विलीन झाली.

आई, तू आमच्यात नसलीस तरी तुझे संस्कार व प्रेम आमच्या प्रत्येक श्वासात आहे. तू आमच्यासाठी केवळ एक व्यक्ती नव्हतीस तर जगण्यासाठीची एक प्रेरणा होतीस. तू नजरेआड झाली आहेस पण तुझ्या प्रेमाचा सुगंध कायम आमच्या हृदयात दरवळत राहील. तुझ्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

तुझाच मुलगा – प्रा. सी. एम. गोरल – येळ्ळूर

The post प्रेमळ व कणखर माता – कै. मोनाका गोरल appeared first on News 24 Tass Marathi.

जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वन महोत्सव साजरा
बेळगाव / प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये वन महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये बालचमुने उत्साहाने सहभाग घेऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच संपूर्ण परिसर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कथन केले. यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी विविध स्वरूपातील फलकांची मांडणी करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण रक्षणाबाबत प्राचार्य डॉ.अरुण जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील समस्त शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.

The post जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वन महोत्सव साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना ; परिसरात हळहळ

मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी घडली. एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोघे भाऊ गावाजवळील ओढ्याकडे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी धाकटा भाऊ पाण्यात उतरला असता तो अचानक बुडू लागला.

भावाला संकटात पाहून मोठ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाले. काही वेळातच दोघेही पाण्याखाली गेल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

The post पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.

कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार साहेबांची भेट घेऊन सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने सीमाभागातील विविध प्रश्न तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आयोजित धरणे आंदोलनाची माहितीही शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. यावर पवार साहेब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तत्काळ चर्चा करून उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्तीच्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही यावेळी चर्चा झाली. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीची माहिती शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा युक्तिवाद प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या भेटी दरम्यान समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह सुहास हुद्दार, उमेश पाटील आणि विनोद अंबेवाडीकर उपस्थित होते.

The post ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक
४,५०० कोटींच्या घोटाळ्याचे खळबळजनक रहस्य उघड

डीआयजीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

बेळगाव : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात सीआयडी पोलिसांनी बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’चे मालक शिवानंद नीलन्नवर यांना अटक केली आहे. तपासादरम्यान, हा घोटाळा झाल्याचे पुराव्यांसह सिद्ध झाले. बेळगावमध्ये एक महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद घेतलेल्या सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या प्रकरणातील खळबळजनक माहिती माध्यमांसमोर उघड केली.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे शिवम असोसिएट्सवर छापा टाकून एफआयआर दाखल केल्यानंतरही, जनतेने शिवम असोसिएट्समध्ये आणखी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे, जनतेला माहिती देण्यासाठी सीआयडीने ही पत्रकार परिषद घेतली आहे, जेणेकरून ते सतर्क राहतील आणि अशा फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर व्याज : सीआयडीने ‘पोंजी योजने’चे गुपित उघड केले

सीआयडी डीआयजीपीच्या म्हणण्यानुसार, शिवानंद नीलण्णवर यांनी आतापर्यंत सुमारे ४०,७०० गुंतवणूकदारांकडून एकूण २,४०० कोटी रुपये जमा केले आहेत. त्यांनी यातील बहुतांश रक्कम जनतेला परत केली आहे. नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटण्यात आले. मात्र, जेव्हा जुन्या गुंतवणूकदारांना द्यायच्या व्याजाची रक्कम नव्याने जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त झाली, तेव्हा संपूर्ण यंत्रणा कोलमडली आणि या फसवणुकीचे गुपित उघड झाले.

शेअर बाजारातील तोटा, वैयक्तिक वापर :

जमा केलेल्या रकमेपैकी ५४० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले गेले, त्यापैकी १७० कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्याच्या तपासात ६६० कोटी रुपयांची तूट आढळून आली आहे, त्यापैकी ३३० कोटी रुपये वसूल होऊ शकतील असा अंदाज आहे. मालक नीलण्णवर यांनी कंपनीतून ५५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे त्यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केले असून, या प्रकरणात आणखी एका भागीदाराचाही सहभाग आहे.

आलिशान गाड्यांची जप्ती आणि चित्रपट कलाकारांना नोटीसची भीती :

आरोपींकडून ५ आलिशान गाड्या आधीच जप्त करण्यात आल्या असून, कंपनीच्या पैशाने खरेदी केलेल्या उर्वरित ११ व्होल्वो एक्ससी९० (Volvo XC90) आलिशान गाड्या लवकरच जप्त केल्या जातील, असे सीआयडीने सांगितले. तपासादरम्यान एकूण ३० बँक खाती आढळून आली, त्यापैकी ७ खात्यांचा वापर मोठ्या रकमेच्या हस्तांतरणासाठी केला जात होता. केवळ एका बँक खात्यात ३६,२०० पानांची दीर्घकालीन व्यवहारांची नोंद सापडली असून, सीआयडी याचा तपास करत आहे. या कंपनीतून चित्रपट कलाकारांना पैसे दिले गेल्याचा संशय असून, पुरावे सापडल्यास चित्रपट कलाकारांनाही नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले जाईल, असा इशारा डीआयजीपींनी दिला आहे.

महाराष्ट्र संबंध आणि पैसे कसे परत करायचे? :

फसवणुकीचे हे जाळे शेजारच्या महाराष्ट्र राज्यातही पसरले असून, त्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने तपास तीव्र करण्यात आला आहे. कंपनी पूर्णपणे बुडण्यापूर्वी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पूर्वी गुंतवणूकदारांना बेकायदेशीरपणे देण्यात आलेले ४०० कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय सीआयडीने घेतला आहे. ही अतिरिक्त रक्कम उर्वरित गुंतवणूकदारांना वितरित केली जाईल.

वसूल करण्यात येणारी रक्कम ‘बड्स’ कायद्याचे प्रमुख आदित्य अमलान बिस्वास यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर ते कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही रक्कम जनतेला परत करतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

The post शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक appeared first on News 24 Tass Marathi.

“विकास हे आमचे स्वप्न ; सिद्धरामय्या कधीही एकटे नाहीत”
मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून बेळगावच्या विकासकामांना गती देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कधीही एकटे नाहीत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार याच महिन्यात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे अशी त्यांनी कोणतीही मागणी केली नव्हती. मात्र, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांनी त्यांच्याकडे हेच खाते कायम ठेवले आहे. राज्यात नवीन रस्ते, पूल आणि बेळगाव उड्डाणपुलासह विविध विकासकामे पूर्ण करणे हे आमचे स्वप्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेळगावच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्याला लवकरच आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात सुमारे २० जागा रिक्त असून जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर याच महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केपीसीसी अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वाचे पालन करत आहे. विविध समाजघटक आणि विशेषतः मुस्लिम नेत्यांच्या मागण्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “सिद्धरामय्या कधीही एकटे नसतात. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. खातेवाटपाबाबत निर्माण झालेले किरकोळ गैरसमजही ते दूर करतील.” अहिंद विचारसरणी आणि संघटनेला आपला कायम पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव महानगरपालिकेत ‘महाजन अहवाल अंतिम’ ठराव मंजूर होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत प्रतिक्रिया देताना जारकीहोळी यांनी भाजप आमदारांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे सांगितले. तसेच या विषयावर आपण जिल्हाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

The post “विकास हे आमचे स्वप्न ; सिद्धरामय्या कधीही एकटे नाहीत” appeared first on News 24 Tass Marathi.

प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांच्या चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्या वृंदा चेन तसेच आर्ट अफेअर्स मासिकाचे अक्षय बापट उपस्थित होते.

अक्षय बापट यांनी विद्यार्थ्यांना कला प्रदर्शने, संग्रहालये आणि कलाक्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी चंद्रशेखर रांगणेकर यांच्या कलाप्रवास आणि कलाकृतींविषयीही मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमुळे कला विद्यार्थ्यांना एका अनुभवी कलाकाराच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विविध माध्यमांमध्ये केलेल्या कामांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी रांगणेकर यांचे प्रात्यक्षिक उत्सुकतेने पाहिले आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रांगणेकर यांनी लाईव्ह डेमोद्वारे चित्रनिर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली. कलाकृती तयार करताना आवश्यक असलेली एकाग्रता, सातत्य आणि निरीक्षणशक्ती यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यशाळेनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

The post प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांच्या चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.