Bidar Archives | News 24 Tass Marathi

दुःखाच्या प्रसंगातही सीमालढ्याची तळमळ कायम
रामराव राठोड यांची युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वनपर भेट

बिदर : महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर विभागाचे अध्यक्ष श्री. रामराव राठोड यांच्या पत्नी कै. राजाबाई रामराव राठोड यांचे दि. २१ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी शिळवणी (बिदर) येथे राठोड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

भालकी-बिदर दौऱ्यावर असताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सहकाऱ्यांनी श्री. रामराव राठोड यांची भेट घेऊन कै. राजाबाई राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वतः मोठ्या दुःखातून जात असतानाही युवा समितीचे पदाधिकारी भेटीस येणार असल्याचे समजताच रामराव राठोड यांनी अत्यंत आपुलकीने त्यांची वाट पाहिली.

वयाची नव्वदी पार केलेले रामराव राठोड यांना वयोमानामुळे ऐकणे-बोलणे काहीसे कठीण झाले आहे. मात्र, युवा समितीचे पदाधिकारी त्यांच्या घरी पोहोचल्यापासून ते निरोप घेईपर्यंत त्यांच्या प्रत्येक शब्दातून सीमालढ्याविषयीची तळमळ आणि महाराष्ट्रात जाण्याची जिद्द स्पष्टपणे जाणवत होती. स्वतःच्या दुःखापेक्षाही सीमाप्रश्नाची चिंता त्यांच्या मनात अधिक असल्याचे पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.

गेल्या अनेक दशकांच्या सीमालढ्याचा इतिहास, कागदपत्रे आणि दस्तऐवज आजही त्यांनी जपून ठेवले आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी सीमालढ्यासाठी अर्पण केले असून, त्यांच्या कुटुंबानेही या लढ्यात सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक पिढीने सीमाप्रश्नाशी असलेली आपली बांधिलकी जपली आहे.

रामराव राठोड यांची ही तळमळ पाहून युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ सीमासैनिकांच्या त्यागाची आणि संघर्षाची पुन्हा एकदा जाणीव झाली. ज्यांनी आयुष्यभर सीमाप्रश्नासाठी संघर्ष केला, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या पिढीने अधिक ताकदीने पुढे नेली पाहिजे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कै. राजाबाई रामराव राठोड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि रामराव राठोड यांच्या डोळ्यांदेखत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊन सीमाप्रश्न कायमचा सुटावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

यावेळी युवा समिती सीमाभाग चे सरचिटणीस मनोहर हुंदरे,अशोक घगवे, सचिन दळवी, रंजित हावळण्णाचे, रमेश माळवी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख विनायक हुलजी,श्रीकांत नांदुरकर वकील वैभव कुट्रे तसेच हरीबसू धुळजी, विनायक पवार, राजू पाटील,निलेश काकतकर, सुरज जाधव, उमेश पाटील, परीणय कदम विद्येश बडस्कर,ओमकार बैलुरकर, ज्ञानेश चिकुर्डे,गोविद कुडेंकर, यल्लाप्पा पाटील,चेतन खोटे, अमोल चौगुल, विनायक कांगले, यश कदम, प्रणव घगवे आदी उपस्थित होते.

The post दुःखाच्या प्रसंगातही सीमालढ्याची तळमळ कायम appeared first on News 24 Tass Marathi.