Bagalkot Archives | News 24 Tass Marathi

हुनगुंद नगरपालिकेवर लोकायुक्तांचा छापा
बागलकोट : जिल्ह्यातील हुनगुंद नगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने अचानक कारवाई करत कार्यालयावर धाड टाकली. ई-मालमत्ता, बांधकाम परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्रांसाठी नागरिकांकडून लाच मागितली जात असल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या निर्देशानुसार डीएसपी सुरेश रेड्डी व निरीक्षक बी. ए. बिरादार यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी नगरपालिकेची तपासणी केली. छाप्यावेळी विविध विभागांतील कागदपत्रांची पाहणी करण्यात आली तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली.

तपासादरम्यान ई-प्रॉपर्टी नोंदी, उतारे आणि बांधकाम परवानग्या देण्यास मुद्दाम विलंब केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून लोकायुक्तांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

The post हुनगुंद नगरपालिकेवर लोकायुक्तांचा छापा appeared first on News 24 Tass Marathi.

आलमट्टी जलाशयाच्या पाणी पातळीत घट
फक्त १२ टीएमसी पाणी शिल्लक

विजयपूर – बागलकोटमध्ये भीषण पाणीटंचाई

विजयपूर : उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या कडक उन्हामुळे आलमट्टी जलाशयातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे.

सध्या जलाशयात केवळ १२ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उष्ण हवामानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने साठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांवर स्पष्टपणे जाणवत असून दोन्ही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

The post आलमट्टी जलाशयाच्या पाणी पातळीत घट appeared first on News 24 Tass Marathi.

बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींची फसवणूक
११ जणांवर गुन्हा ; चौघांना अटक

निनावी पत्रामुळे घोटाळा उघडकीस

बागलकोट : जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात पंतप्रधान फसल विमा योजनेच्या नावाखाली तब्बल ३० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि फोटो वापरून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा उलगडा एका निनावी पत्रामुळे झाला. आपली ओळख गुप्त ठेवत संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रशासन सतर्क झाले आणि सखोल चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. २०२०-२१ पासून शेतकऱ्यांच्या नावाने बनावट फोटो तयार करून, प्रत्यक्षात पीक नसतानाही विमा रक्कम काढण्यात आली. या मार्गाने सुमारे ३०,२८,५१,५८० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी मुधोळ कृषी विभागाचे सहायक संचालक सिद्धलिंगेश दोडामणी यांनी तक्रार दाखल केली असून, मेटागुड्डा गावातील सात जणांसह युनिव्हर्सल सोमपू विमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, विमा कंपनीचे कर्मचारी यशवंत, राकेश, प्रकाश आणि अनिल यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घोटाळ्यात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनेचा गैरवापर करून कोट्यवधींची लूट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

The post बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींची फसवणूक appeared first on News 24 Tass Marathi.

बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवरून ३.१५ लाखांची रोकड जप्त
बागलकोट / वार्ताहर

बागलकोट जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये निवडणू अधिकाऱ्यांनी ३ लाख १५ हजार रुपयांची विनापरवाना रोकड जप्त केली आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून अवैध पैशांच्या व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे. पहिली कारवाई बदामी तालुक्यातील कुळगेरी क्रॉस चेकपोस्टवर करण्यात आली. येथे तपासणी दरम्यान चन्नबसप्पा सज्जन नावाच्या व्यक्तीकडे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. या मोठ्या रकमेबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न केल्यामुळे अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली.

दुसऱ्या कारवाईत, बीळगी आणि कोलार दरम्यानच्या चेकपोस्टवर एका महिंद्रा एसयुव्ही (SUV) कारची झडती घेण्यात आली. यावेळी डॉ. रामकृष्ण इंडी यांच्याकडे ६५ हजार रुपये आढळून आले. या रकमेचाही कोणताही ठोस पुरावा नसल्याने निवडणूक विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. निवडणूक नियमांनुसार ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवण्यासाठी वैध कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

The post बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवरून ३.१५ लाखांची रोकड जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट
ऑरेंज अलर्ट जारी

बेळगाव : उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कर्नाटकात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून, बेळगावसह राज्यातील सात जिल्ह्यांत तीव्र थंडीची लाट जाणवू लागली आहे. तापमानात झालेल्या अचानक घसरणीमुळे हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. सध्या कर्नाटकातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे थंडीचा प्रकोप अधिक तीव्र झाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून पुढील दोन दिवस बेळगाव, गुलबर्गा, बागलकोटसह एकूण सात जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमानात ६ ते ७ अंशांची घट नोंदवली गेली आहे.

थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी थंड हवामानापासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

The post बेळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट appeared first on News 24 Tass Marathi.

श्री सद्गुरू बोधले महाराज मठाच्या तृतीय वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
विजयपूर / दिपक शिंत्रे

बागलकोट नवनगर येथील श्री सद्गुरू माणकोजी बोधले महाराज मठाचा तृतीय वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवानिमित्त दि. २७, २८ व २९ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवर्य ह. भ. प. यशवंत प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दि. २७ मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता पोथी स्थापना व कळस पूजन, ठिक 7 वाजता किर्तन तर रात्री लक्ष्मण ईश्वर मंचलकर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, दि.२८ बुधवार रोजी पहाटे सहा वाजता काकड आरती, ठिक ७ ते १० वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पारायण, नंतर धनंजय व्यंकटेश माळवदकर यांच्यावतीने अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली आहे. ठिक ११ ते १ वाजेपर्यंत किर्तन दुपारी शटराज लातुरकर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ ते ६ पर्यंत नामजप व प्रवचन, ६ ते ७ हरीपाठ भजन ७ ते ९ पर्यंत किर्तन नंतर सुनील दत्तात्रय कपाटे यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, दि.२९ गुरुवारी पहाटे सहा वाजता काकड आरती, ठिक ८ ते १० वाजेपर्यंत दिंडी प्रदर्शन, काला किर्तन नंतर संतोष कर्णे व व्यंकटेश मिरजकर यांच्या कडून अल्पोपहार व्यवस्था, त्यानंतर अध्यात्मिक संस्कार शिबिराचे समारोप समारंभ तर दुपारी १ वाजता ईश्वर सुगंधी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवर्य ह.भ.प. श्री यशवंत प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

The post श्री सद्गुरू बोधले महाराज मठाच्या तृतीय वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

नूतनीकरण झालेल्या बागलकोट रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटन
अमृत भारत योजनेअंतर्गत नूतनीकरणासाठी १६.०६ कोटी रुपये खर्च

बागलकोट / वार्ताहर

बागलकोट रेल्वे स्थानक हे अमृत भारत रेल्वे स्थानक प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण केलेल्या कर्नाटकातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बागलकोटसह राज्यातील पाच आधुनिक रेल्वे स्थानकांचे उद्घाटन होणार आहे.

बागलकोट रेल्वे स्टेशन उद्घाटनासाठी सज्ज आहे. बागलकोट येथे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना सहभागी होणार आहेत. एकूण १६.०६ कोटी रुपये खर्चून बागलकोट रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि अपंगांसाठी स्वतंत्र सुसज्ज शौचालये आहेत. येथे प्रशस्त प्रतीक्षालय आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर स्थानिक संस्कृती आणि वास्तुकला चित्रित केली आहे. येथे एक सौरऊर्जा प्रकल्प आहे, तसेच पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापन युनिट आहे.

प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीसाठी १२ मीटर रुंद फुटपाथ तयार करण्यात आला आहे. लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा आहे. तिकीट बुकिंग आणि सामान्य तिकीट खरेदीसाठी किमान तीन आणि जास्तीत जास्त पाच काउंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी दुकाने बांधण्यात आली आहेत.

The post नूतनीकरण झालेल्या बागलकोट रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.

हुनगुंद तालुक्यात कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
बागलकोट / दिपक शिंत्रे

दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले आहेत. हुनगुंद तालुक्यातील अमिनगडजवळ आज शुक्रवार दि. १६ मे रोजी सकाळी अमिनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यामध्ये संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) यांचा घटनस्थळीच मृत्यू झाला होता. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचा बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात वीरश अंगडी यांचा आणखी एक मुलगा सतीश (वय २८) हा सुदैवाने बचावला आहे.

या घटनेत दुसऱ्या कारचा चालकही जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वजण बदामी तालुक्यातील नेलुगी गावचे रहिवासी आहेत. या घटनेची नोंद अमिनगड पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

The post हुनगुंद तालुक्यात कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

प्रसूतीनंतर नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून मातेचे पलायन
बागलकोट येथील घटना

बागलकोट / वार्ताहर

प्रसूतीनंतर एक महिला आपल्या नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून गायब झाली. मुलगी झाल्याने तिने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बागलकोटमधील एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने प्रसूतीनंतर मुलगी झाल्याचे समजताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला ओपीडी कार्ड बनवण्यासाठी आणि नोंदणीसाठी सांगितले. त्याचवेळी सदर महिला अचानक गायब झाली.

महिलेने मुलगी असल्यामुळे तिला स्वीकारण्यास नकार दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एक दिवस रुग्णालय प्रशासनाने तिच्या नातेवाईकांची वाट पाहिली. पण कोणीही मुलीला घ्यायला न आल्यामुळे, रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सर्च अडॉप्शन सेंटरला माहिती दिली. त्यानंतर नवजात मुलीला जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू विभागात दाखल करण्यात आले. सध्या नवनगरमधील जिल्हा रुग्णालयात नवजात शिशुवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. रजनी पाटील यांनी दिली आहे.

The post प्रसूतीनंतर नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून मातेचे पलायन appeared first on News 24 Tass Marathi.

बागलकोट तालुक्यात कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेली तीन मुले बुडाली
गुढीपाडव्या दिवशीच दुर्दैवी घटना

एकाचा मृतदेह सापडला

विजयपूर / दीपक शिंत्रे

आलमट्टी जलाशयाच्या पुढील भागात रेल्वे पुलाच्या खाली कृष्णा नदीच्या पात्रात नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीसाठी गेलेली तीन मुले वाहून गेल्याची घटना घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय १५), मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी (वय १७) तिघेही (रा.इल्याळ ता. बागलकोट) अशी त्यांची नावे आहेत.

या तिघांपैकी सोमशेखर याचा मृतदेह सापडला असून मल्लप्पा व परनगौडा या दोघांच्या मृतदेहाचा नदीपात्रात शोध सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच बागलकोट अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बागलकोट तालुक्यातील सितीमनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी बागलकोट सीपीआय एच.आर.पाटील भेट देऊन पाहणी केली आहे.

The post बागलकोट तालुक्यात कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेली तीन मुले बुडाली appeared first on News 24 Tass Marathi.