journalist association Archives | News 24 Tass Marathi

एम. डी. मुल्ला यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले
ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांचे प्रतिपादन

बेळगाव : पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते एम. डी. मुल्ला यांनी आपल्या लेखणीतून इतर पत्रकारांना आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिताक्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांनी केले.

बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधन निमित्त आज शनिवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे मराठी पत्रकारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना बसवंत शहापूरकर म्हणाले, एम. डी. मुल्ला हे एक निर्भीड पत्रकार होते. त्यांचा पोलीस प्रशासनावर मोठा प्रभाव होता. अनेकांना ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असत.

यावेळी बोलताना शिवराज पाटील म्हणाले, उर्दू भाषिक असलेले एम.डी. मुल्ला यांचे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. धाडसी वृत्ती, मिश्किल स्वभाव ही त्यांची खासियत होती. बेळगावातील गुन्हेगारांवरही त्यांचा वचक होता. गुन्हेगारी जगतातील माहिती खोलवर जाणून घेत त्यांनी नेहमी आपले काम प्रभावीपणे केले.

शिवाजी शिंदे म्हणाले बेळगावच्या पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव म्हणून एम.डी.मुल्ला यांचा उल्लेख करावा लागेल. त्याकाळी संपर्काची साधने आणि प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी केलेले आदर्शवत कार्य आजच्या पत्रकारांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.

संजय सूर्यवंशी म्हणाले, एम. डी. मुल्ला यांच्याकडून बरेच काही शिकता आले. दिलदार मनाचा माणूस, त्याचबरोबर त्यांची नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची चिकित्सकवृत्ती पत्रकारांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

श्रीकांत काकतीकर म्हणाले, एम.डी मुल्ला बेळगावच्या क्राईम न्यूज क्षेत्रातील महत्त्वाचे नाव मानले जाते. दुसऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती त्याच्याबरोबर काम करणार्‍यांसाठी एक आदर्श होता.त्यांच्या सोबत काम करणार्‍या वार्ताहरांना ते नेहमीच प्रोत्साहन देत होते.

उपेंद्र बाजीकर म्हणाले, माध्यम आणि शोधपत्रकारांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे मुल्ला यांच्या पत्रकारितेतून दिसतं. गुन्हेगारी जगतातील बातम्यांबरोबरच त्यांनी समाजाची काळजी घेण्याचा नेहमीच ध्यास घेतला होता. रणजीत चौगुले म्हणाले, बातमी कशी असावी, फिल्डवर जाऊन काम करणे हे मुल्ला यांच्या पत्रकारितेचे महत्त्वाचा पैलू होता.

प्रारंभी स्तब्धता पाळून दिवंगत पत्रकार एम. डी. मुल्ला तसेच शब्दगंध कवी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य वेंकटेश श्रीनिवास वाळवेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेला पत्रकार डी. बी. पाटील, सतीश जाधव, रोहन पाटील,अनंत कुचेकर, रवींद्र जाधव, रवींद्र पाटील, यांच्यासह ॲड. सुधीर चव्हाण, संजय गौंडाडकर, महादेव चौगुले, एम. वाय. घाडी, डॉक्टर संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, गीता घाडी व अन्य सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

The post एम. डी. मुल्ला यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेला वेग
अनेक गावांतून सह्या केलेली पुस्तके सुपूर्द करण्यास सुरुवात

बेळगांव : सीमा लढ्यातील पहिले हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कंग्राळी खुर्द गावातून तीन हजारहून अधिक सह्यांचे पुस्तक शनिवारी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच आंबेवाडी गावातील सह्या घेतलेले पुस्तकही अर्जुन बांबू कातकर, लक्ष्मण शट्टू कातकर, देवाप्पा शहापूरकर, शिवाजी गोविंद लोहार, बाळू तानाजी कातकर यांनी यावेळी दिले. ही पुस्तके पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी त्वरित घेऊन सलगपणे करावी व निकाल द्यावा अशी विनंती पत्रकार संघातर्फे सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. याबाबतचे सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे. या मोहिमेला सीमा भागातून तसेच महाराष्ट्रातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सर्व भागातील कार्यकर्ते सह्या घेण्याचे काम जोमाने करत आहेत याबद्दल पत्रकार संघातर्फे यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. एम. जी. पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, उमेश पाटील, बाबू कोले, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, पत्रकार परिषद प्रतिनिधी शेखर पाटील, अर्जुन सांगावकर, उपस्थित होते.

The post मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेला वेग appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेस वाढता प्रतिसाद
बेळगांव : सर्वोच्च न्यायालयात २२ वर्षे रेंगाळत पडलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी त्वरित व सलगपणे करावी, या मागणीसाठी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सीमाभागातून एक लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्यात येणार आहे. सह्यांच्या या मोहिमेस सर्व भागांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी चव्हाट गल्ली भागात सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ झाला. पहिले सीमा सत्याग्रही अमृतराव हसबे यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंदा यांनी पहिली सही करून मोहिमेस प्रारंभ केला.

१९५६ साली जयंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसिंह नाना पाटील चौकात झालेल्या सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत अमृतराव सहभागी झाले होते. याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अमृतराव यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई रामराव हसबे यांनीही महिला सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत भाग घेऊन तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती. सह्या संकलनाच्या प्रारंभावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

The post मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेस वाढता प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी ‘सह्यांची मोहीम’ सुरू
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रकरणाची तातडीने सुनावणी होऊन सीमाभागातील मराठी लोकांना न्याय मिळावा, ही मागणी साध्य करण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाने ‘सह्यांची मोहीम’ सुरू केली आहे. रविवारी मराठा मंदिर येथे या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

मोहिमेची भूमिका स्पष्ट करताना ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार आनंद मेणसे म्हणाले, “लेखक, पत्रकार आणि चित्रकार जेव्हा रस्त्यावर उतरतात, तेव्हा समाजात खऱ्या अर्थाने बदल घडतो. लोकशाही मार्गाने आपला हक्क मागण्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. लाखो सह्यांद्वारे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर लवकर आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

त्यांनी पुढे नमूद केले की, काश्मीरसह देशातील अनेक सीमावाद मिटले, मात्र बेळगावचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सीमाभागातील जनता महात्मा गांधींच्या मार्गावर शांततेत लढा देत आहे, पण न्यायालयीन प्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नाही. आता निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांच्याशी चर्चा करून, लाखो सह्यांचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे सादर केले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांची पहिली सही घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांना सह्यांच्या मोहिमेसाठी विशेष पुस्तिका वाटप करण्यात आल्या. मनोहर किणेकर यांनी आचार्य अत्रे यांच्या लेखणीचा दाखला देत म्हटले, “ज्या प्रकारे अत्रेंच्या लेखणीमुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला, त्याचप्रमाणे पत्रकारांच्या पुढाकारामुळे ही मोहीमही यशस्वी होईल. ही देशातील पहिलीच मोहीम आहे आणि सीमाभागातील प्रत्येक घरात जाऊन सह्या गोळा कराव्यात.”

माजी महापौर व ज्येष्ठ पत्रकार नागेश सातेरी यांनी कर्नाटक सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टात सीमा बांधवांना न्याय मिळणार असल्यामुळे कर्नाटक सरकार सतत ढासळते आहे. महाराष्ट्र सरकारच्या तज्ज्ञ समितीत एकही मंत्री किंवा आमदार नाही; जयंत पाटील यांसारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश व्हायला हवा.”

बेळगाव महापालिकेत सीमा प्रश्नाविरोधात ठराव मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आनंद मेणसे यांनी यावर इशारा दिला, “असा ठराव कायदेशीर लढ्यासाठी धोका निर्माण करू शकतो. मराठी भाषिक बहुसंख्य असूनही असे ठराव कसे मांडले जातात, याचा आता जाब घ्यावा लागेल.”

यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, ज्येष्ठ पत्रकार शिवराज पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

The post बेळगावात सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी ‘सह्यांची मोहीम’ सुरू appeared first on News 24 Tass Marathi.

सीमाप्रश्न : पत्रकार संघातर्फे रविवारी मराठी भाषिकांची बैठक
बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी रविवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) खानापूर रोड येथे मराठी भाषिकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वांनी उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व कार्यकारिणीने केले आहे.

The post सीमाप्रश्न : पत्रकार संघातर्फे रविवारी मराठी भाषिकांची बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा
सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना एक लाख सह्यांचे निवेदन देणार

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली २२ वर्षे प्रलंबित आहे. त्याची सलग सुनावणी करुन त्वरित निर्णय द्यावा, अशी विनंती सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. या समारंभात हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य ॲड. महेश बिर्जे उपस्थित होते.

“लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी” या सुरेश भट यांच्या गौरव गीताने समारंभास प्रारंभ झाला. सुरुवातीस महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, म. ए. समिती युवा आघाडी सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके, सामाजिक कार्यकर्ते अनंत जांगळे या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मनोहर किणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. पत्रकार संघ प्रारंभापासून सीमावासीय मराठी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही संघाची बांधिलकी आहे. या बांधिलकीतूनच सरन्यायाधिशांना सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, राजेंद्र पोवार, विलास अध्यापक, जितेंद्र शिंदे, शिवराज पाटील व शिवानी पाटील या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर सर्वश्री मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, अंकुश केसरकर, सौ. रेणू किल्लेकर, धनंजय पाटील, ॲड. महेश बिर्जे यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात त्यांनी सीमा लढ्याला बेळगांवबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबईच्या मराठी पत्रकारांनी पाठबळ दिले आहे. मराठी पत्रकार संघाने सीमा प्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना सह्यांचे निवेदन देण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.

शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व कार्यवाह महेश काशीद यांनी आभार मानले. मराठी पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण तालुका समिती उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, उमेश पाटील, किरण हुद्दार, सतीश देसाई, ॲड. अश्वजित चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

The post मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा appeared first on News 24 Tass Marathi.