jai kisan bhaji market Archives | News 24 Tass Marathi

‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटला पुन्हा न्यायालयाचा दणका
कर्नाटक अपीलीय न्यायाधिकरणाकडून अंतरिम स्थगिती नाकारली

बेळगाव / प्रतिनिधी

खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या ‘जय किसान’ भाजी मार्केटला कायदेशीर लढाईत पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मार्केटचा व्यापार परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना बंगळुरू येथील कर्नाटक अपीलीय न्यायाधिकरणाने अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे परवाना रद्द करण्याचा आदेश सध्या कायम राहणार आहे.

यापूर्वी या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही संबंधित रिट याचिका व रिट अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर हे प्रकरण अपीलीय न्यायाधिकरणासमोर आले होते.

शेतकरी व शेतकरी संघटनांच्या वतीने ॲड. नितीन बोलबंदी यांनी न्यायाधिकरणात बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बेळगाव एपीएमसीमध्ये अनेक गाळे रिकामे असतानाही ‘जय किसान’चे व्यापारी जाणीवपूर्वक लिलाव प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. खाजगी मक्तेदारी टिकवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असून, याचा थेट फटका गरीब शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी खाजगी बाजारपेठ चालवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. न्यायाधिकरणाने या प्रकरणातील प्रतिवाद्यांना नोटीस बजावून आक्षेप दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ‘जय किसान’ गटाला कोणताही अंतरिम दिलासा नाकारण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या निर्णयामुळे एपीएमसी मार्केटमधील अधिकृत व्यवहारांना बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटला पुन्हा न्यायालयाचा दणका appeared first on News 24 Tass Marathi.

जय किसान भाजी मार्केटच्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
बेळगाव / प्रतिनिधी

जय किसान भाजी मार्केट यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की या प्रकरणात अर्जदारांनी प्रथम कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (KAT) जाणे आवश्यक होते.

या निर्णयानंतर जय किसान भाजी मार्केट असोसिएशनकडे आता कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण (KAT) समोर दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना राजू टोप्पन्नावर म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी वास्तव स्वीकारावे. आता आंदोलन मागे घेऊन APMC परिसरात शांततेत आणि सहकार्याने व्यवसाय सुरू ठेवावा.” त्यांनी पुढे सांगितले, “जर जय किसान असोसिएशनने KAT कडे दाद मागितली, तरी आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, अशी माहिती संबंधित व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.

The post जय किसान भाजी मार्केटच्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या appeared first on News 24 Tass Marathi.

‘जय किसान’ भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्याची मागणी
शेतकऱ्यांचे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले.

परवाना रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीवर झोपून निषेध नोंदवला. “अधिकारी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. आमच्या समस्या व भावना समजून घ्याव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.

शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांनी प्रश्न उपस्थित केला, “खासगी ‘जय किसान मार्केट’ पाडण्याचा अधिकार तुम्हाला कुठून आला? सरकारी जमिनींवर झालेले अतिक्रमण आधी हटवा.” त्यांनी आणखी आव्हान दिले की, “बसस्थानकाजवळील अनधिकृत इमारती पाडून दाखवा.”

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, बेळगाव हा कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा असून दोन बाजारपेठांची गरज आहे. “आम्हाला आपले उत्पादन दूरवर नेऊन विकावे लागते, कामगारही मिळत नाहीत,” अशी व्यथा कित्तूर, सौंदत्ती, बैलहोंगल आणि यरगट्टीतील शेतकऱ्यांनी मांडली.

त्यांनी मंत्री शिवानंद पाटील यांना इशारा दिला, “जर खासगी ‘जय किसान मार्केट’ला अधिकृत दुसरी बाजारपेठ म्हणून पुन्हा सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू.”

शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आश्वासन दिले, “या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल.” या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

The post ‘जय किसान’ भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

“जय किसान” भाजी मार्केटची परवानगी रद्द
बेळगावात शेतकरी, व्यापाऱ्यांचे निषेध आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी अचानक रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, व्यापारी व कामगारांनी बेळगावात जोरदार आंदोलन केले.

या मार्केटमधील अंदाजे ३०० दुकानदार आणि कामगार परवाना रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी देण्यात आलेला ‘ट्रेडिंग लायसन्स’ कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “संकेश्वरमधील जगद्गुरू शंकरलिंग मार्केटप्रमाणेच काहींच्या दबावामुळे हे मार्केटही बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. बेळगाव, हुबळी व धारवाड परिसरातील शेतकऱ्यांना जय किसान मार्केट मोठी सोय होती. ए.पी.एम.सी. मध्ये शेतीमाल विकताना अधिक खर्च येतो, त्यामुळे हे मार्केट पुन्हा सुरू झाले तर शेतकऱ्यांचे हित साधले जाईल.”

व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले, “सरकारने दहा वर्षांसाठी परवाना देऊनही कोणतीही नोटीस न देता तो रद्द केला. गेली तीन वर्षे आम्ही शेतकऱ्यांना चांगला दर देत आलो आहोत. खासगी मार्केट बंद करून शेतकऱ्यांना ए.पी.एम.सी. मध्येच यावे लागावे असा काहींचा हेतू दिसतो. शिवाय हे मार्केट कोणत्याही शासकीय निधीशिवाय उभारलेले आहे.”

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, “शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी कोणताही दबाव आणला जाणार नाही. खासगी मार्केटचे गेट वा दुकाने सील करण्यात आलेली नाहीत. जय किसान मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाया न करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ए.पी.एम.सी.मधील रिकामी दुकाने व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील. कायदेशीर मार्गाने या प्रश्नाचा तोडगा काढला जाईल.”

The post “जय किसान” भाजी मार्केटची परवानगी रद्द appeared first on News 24 Tass Marathi.

जय किसान भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स रद्द
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनला कृषी पणन विभागाने मोठा धक्का दिला आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात संस्थेला अपयश आल्याने एपीएमसीच्या निर्देशकांनी या खासगी भाजी बाजारपेठेचे ट्रेडिंग लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी भूखंडाच्या वापराबाबतचा आदेश रद्द झाल्यामुळे या खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बेळगाव महानगरपालिकेकडे घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र आता एपीएमसीच्या नव्या निर्णयामुळे पुन्हा व्यापाऱ्यांत गोंधळाचे वातावरण आहे.

जय किसान असोसिएशनला खासगी बाजार उभारणी व त्याचे संचालन करण्यासाठी देण्यात आलेल्या लायसन्सच्या अटींचे पालन होत नाही, अशा तक्रारी शेतकरी संघटनांनी सातत्याने केल्या होत्या. त्यानुसार कृषी पणन विभागाने अखेर ही कठोर कारवाई केली.

The post जय किसान भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स रद्द appeared first on News 24 Tass Marathi.