iskon Archives | News 24 Tass Marathi

इस्कॉन तर्फे मंगळवारी गौर पौर्णिमा महोत्सव
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे मंगळवार दि. ३ मार्च २०२६ रोजी गौर पौर्णिमा महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर टिळकवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कीर्तन त्यानंतर अभिषेक आणि इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाआरती व महाप्रसाद होणार आहे याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.

The post इस्कॉन तर्फे मंगळवारी गौर पौर्णिमा महोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

शुक्रवार पेठ सीटीएस २११ येथील मालमत्ता इस्कॉनचीचं
कोर्टाच्या आदेशानुसारच कारवाई ; खोट्या बातम्यांवर विश्वास नको – इस्कॉन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील सीटीएस २११, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मालमत्ता ही इस्कॉन संस्थेचीच असून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या चार कुटुंबांना न्यायालयीन प्रक्रियेनंतरच बेलिफमार्फत नियमानुसार बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात कोणतीही नियमबाह्य कारवाई करण्यात आलेली नाही, असा खुलासा इस्कॉनच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले.

इस्कॉनच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित जागा २००३ साली नोंदणीकृत निरंतर पट्ट्याने घेण्यात आली होती. त्यावेळी त्या परिसरात एकूण १४ कुटुंबे वास्तव्यास होती. सर्व कुटुंबांना जागा रिकामी करण्याची विनंती करून अन्य ठिकाणी जागा खरेदी व घरबांधणीसाठी मदत देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यानुसार दहा कुटुंबांनी स्वेच्छेने ताबा सोडून अन्यत्र स्थलांतर केले.

मात्र बिरजे, धमुने आणि पिंपरे या कुटुंबांनी स्थलांतरास नकार देत जागा रिकामी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मूळ दावा क्रमांक ३९०, ३९२, ५०८ आणि ४८९/२०१७ असे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले. संबंधित कुटुंबांनी या निर्णयाविरोधात अपील केले; परंतु न्यायालयाने ते फेटाळून लावले.

यानंतर न्यायालयाने ई.पी. १४४, १४५, १४६ व १४७ अन्वये घरे मोकळी करून जागा इस्कॉनच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार बेलिफमार्फत कारवाई करण्यात आली, असे इस्कॉनने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण प्रक्रिया न्यायालयीन आदेशांनुसार पार पडलेली असताना काही वृत्तपत्रे व समाजमाध्यमांतून चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

The post शुक्रवार पेठ सीटीएस २११ येथील मालमत्ता इस्कॉनचीचं appeared first on News 24 Tass Marathi.

हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप

बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी बेळगावात रथयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 28 वे वर्ष आहे.

दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकात हजारो स्त्री-पुरुष भक्त एकत्र आल्यानंतर इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, सुंदर चैतन्य महाराज, वृंदावन चे ब्रजेश चंद्र गोस्वामी प्रभू यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

फुलांनी सजविलेल्या रथामध्ये राधा कृष्ण, नित्यानंद महाप्रभू आणि गौरंग महाप्रभू यांचे आर्चविग्रह ठेवले होते. रथाचे पूजन व आरती केल्यानंतर खासदार इराण्णा कडाडी यांनी श्रीफळ वाढवून रथयात्रेस चालना दिली.

रथाला समोरच्या बाजूला दोन्ही कडेने दोरखंड बांधण्यात आले होते. डावीकडून पुरुष आणि उजवीकडून महिला रथ ओढीत होत्या. रथाच्या समोर भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेले आबालवृद्ध हरे कृष्ण महामंत्र गाण्यात मशगुल झाले होते. भक्तांवर मशीनद्वारा सुगंधीत द्रव्यांचे सिंचन करण्यात येत होते.

यात्रेच्या अगदी पुढे मंजिरी बेनके यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके, ज्यामध्ये 30 हून अधिक तरुणींचा समावेश होता, आकर्षक रांगोळ्या घालत होती. त्या पाठोपाठ वीस हून अधिक सजवलेल्या बैल जोड्या होत्या. दुसऱ्या एका विशेष सजविलेल्या रथात इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद यांची प्रतिमा होती. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध देखावे ज्यामध्ये खास करून शरपंजारी पडलेले भीष्म, नरसिंह देव, कालिया मर्दन, झारखंड लिला अशा अनेक लीला सादर केल्या होत्या. भक्ती रसामृत स्वामी महाराज जातीने रथयात्रा मार्गावर लक्ष ठेवून होते ते आणि त्यांच्या सोबतीला असलेले अनेक ज्येष्ठ भक्त मार्गदर्शन करीत होते.

ताल धरून नृत्य करणाऱ्या तरुणी, भजन कीर्तनामध्ये सामील झालेले तरुण, रंगीबेरंगी पोशाख करून विविध देखावे सादर करणारे बालक हे रथयात्रेची शोभा वाढवीत होते. हांदिगनुरच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे स्त्री-पुरुषांचे दोन संच भजन सादर करीत होते. रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. बऱ्याच ठिकाणी नागरिकाकडून पाणी, सरबत, फळे व केळी यांचे वाटप केले जात होते. रथयात्रा मार्गावर 50000 हून अधिक प्रसाद पाकिटे इस्कॉनच्या वतीने वाटली जात होती. कृष्णभक्तीत न्हाहून निघालेला हा दीड किलोमीटर लांबीचा लवाजमा शहराच्या विविध भागात फिरला.

धर्मवीर संभाजी चौकातून दीड वाजता प्रारंभ झालेली ही रथयात्रा समादेवी मंदिर ,खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, टिळक चौक मार्गे शनी मंदिराकडून कपिलेश्वर रेल्वे ब्रिजवरून शहापुरात पोहचली. तेथून नाथ पै सर्कल वरून के एल ई आयुर्वेदिक कॉलेज वरून कृषी भवन, बसवेश्वर सर्कल मार्गे साडेसहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामागे उभारण्यात आलेल्या शामियाण्यात पोहचली.

तेथे आज व उद्या दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गोसेवा स्टॉल्स, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवक- युवतीना मार्गदर्शन करणारे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.

आज अनेक ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली. कृष्ण भक्ति का महत्वाची आहे याची अनेक उदाहरणे महाराजांनी आपल्या प्रवचनाद्वारे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले असून आज रथयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना रात्री पूर्ण प्रसाद देण्यात आला.

रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या वतीने अनेक कमिट्या नियुक्त करण्यात आल्या असून प्रत्येक जण रथयात्रा महोत्सव सुखरूपपणे पार पडावा यासाठी प्रयत्न करीत होते. यात्रेमध्ये संकर्षण प्रभू, माधवचरण प्रभू ,नंदनंदन प्रभू, संजीवनी कृपा प्रभू, नागेंद्र प्रभू, प्रेम रस प्रभू, रामप्रभू ,राजाराम भांदुर्गे, उंडाळे प्रभू ,क्वात्रा प्रभू, आनंद भांदुर्गे,अरविंद कोल्हापूरे आदि कार्यकर्ते कार्यरत होते.

मंदिरातील कार्यक्रम :

शनिवारी सकाळी गौर आरती, भजन व किर्तन झाले. त्यानंतर परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांचे प्रवचनही झाले

“रविवारचे कार्यक्रम” :

रविवारी सायंकाळी चार ते पाच पर्यंत नरसिंह यज्ञ होणार असून मानव जातीच्या कल्याणासाठी होणाऱ्या या यज्ञामध्ये अनेक भक्त सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन नाट्य लीला आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे

“पार्किंग रस्त्यावर करण्याचे आवाहन” :

इस्कॉन मंदिर परिसरात असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिराला येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने मंदिराबाहेरील मुख्य रस्त्यावर पार्क करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

The post हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

‘हरे कृष्ण रथयात्रा’ महामहोत्सवाचा शनिवारी प्रारंभ
२४ व २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन),च्या वतीने सलग २८ व्या वर्षी भव्य ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कमिटी जोमाने कामास लागली आहे.

शनिवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शामियाण्यात इस्कॉन चे अध्यक्ष प.पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज आणि इतरज्येष्ठ संन्याशांची भाषणे होतील त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ होईल.अग्रभागी जोडलेले दोरखंड ओढत ही रथयात्रा कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडी बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे ओवर ब्रिजवरून शहापुरात पोहचेल. तेथून नाथ पै सर्कल कडून गोवा वेस व साडेसहा वाजता इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारलेल्या मंडपात पोहोचेल.

रथयात्रा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, सरबत, फळे यांचे वाटप केले जाईल तसेच अनेक ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी केली जाईल. रथाच्या मार्गावर अग्रभागी रांगोळ्या घालणारे एक पथक असेल. रथयात्रेत अनेक सजवलेल्या बैलजोड्या त्याचबरोबर अनेक चित्ररथ सहभागी होतील. देश विदेशातून आलेले अनेक भक्त या रथयात्रेत सहभागी होतील.

या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान श्री श्री राधा-कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान यांचे भव्य रथ असेल. सुंदर वस्त्रांनी आणि पुष्पहारांनी सजवलेल्या रथात विराजमान होऊन भगवान बेळगाववासीयांना दर्शन देऊन आशीर्वाद देणार आहेत. विविध कीर्तन पथके ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जयघोष करत आणि नृत्याविष्कार सादर करत या उत्सवात सहभागी होतील.

ज्येष्ठ संन्याशांची उपस्थिती : या महोत्सवासाठी इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, मॉरिशस येथील परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज, मुंबईचे श्री दयाल चंद प्रभू आणि परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्यासह अनेक वरिष्ठ भक्त उपस्थित राहणार आहेत.

प्रसाद वितरण : संपूर्ण मार्गावर सुमारे ५०,००० हून अधिक प्रसादाच्या पाकिटांचे वाटप केले जाईल.

ग्रंथ वितरण :  इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीताच्या आधारावर रचलेली व इतर आध्यात्मिक साहित्याचे वितरण यावेळी केले जाईल. इस्कॉन मंदिराच्या मागील परिसरात आकर्षक पद्धतीने सजवलेले पेंडाल व विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस मंडपामध्ये भजन, कीर्तन, आरती, बालकार्यक्रम तसेच इस्कॉनमधील ज्येष्ठ भक्तांची प्रवचने होतील.

याशिवाय भगवद्गीता प्रदर्शन, स्लाइड शो, मेडिटेशन पार्क (ध्यान केंद्र), देखावे, आध्यात्मिक पुस्तकांचे व भक्तीपर वस्तूंचे स्टॉल्स तसेच श्रीकृष्ण प्रसादाचे मोफत वितरण इत्यादी अनेक उपक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येथे ‘गो-सेवा’ दालन असून त्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेली उत्पादने उपलब्ध असतील दोन्ही दिवस रात्री भेट देण्यास येणाऱ्या प्रत्येकास’महाप्रसाद’ दिला जाणार असून आहे. नागरिकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.

The post ‘हरे कृष्ण रथयात्रा’ महामहोत्सवाचा शनिवारी प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात २४ पासून इस्कॉनचा भव्य हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव
बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बेळगावच्या वतीने येत्या २४ व २५ जानेवारी रोजी २८ वा ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची माहिती इस्कॉनचे अध्यक्ष भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी दिली.

शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख मार्गांवरून श्री राधा–कृष्ण तसेच निताई गौर सुंदर भगवान यांची भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत कर्नाटकसह इतर राज्यांतील तसेच परदेशातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत. रथयात्रा मार्गावर ५० हजारांहून अधिक प्रसाद पाकिटांचे वाटप, आकर्षक रांगोळी सजावट व सांस्कृतिक चित्ररथ ही यंदाच्या महोत्सवाची वैशिष्ट्ये असणार आहेत.

टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या मागील मैदानावर दोन दिवस भव्य मंडपामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वरिष्ठ संन्यासी व विद्वानांची प्रवचने, भक्ती संगीत तसेच मुलांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे.

महोत्सवस्थळी गो-सेवा दालन, आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन तसेच दररोज रात्री सुमारे ५० हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या रथयात्रेत सहभागी होऊन श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

या संदर्भातील पत्रकार परिषदेला राम दास, बलराम भक्त दास, नागेंद्र दास, निताई निमाय दास, अमृत कृष्ण दास, वदान्य चैतन्य दास, श्वेत निताई दास, श्री रामायण दास, कृष्णाश्रय दास तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

The post बेळगावात २४ पासून इस्कॉनचा भव्य हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातील श्रीकृष्ण रथयात्रेच्या मंडपाची मुहूर्तमेढ
बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने २८ वी श्रीकृष्ण रथयात्रा दि. २४ व २५ जानेवारी रोजी बेळगावनगरीत होत आहे.या रथयात्रेनिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच इस्कॉनच्या श्री श्री राधागोकुळानंद मंदिरासमोर करण्यात आली. ज्येष्ठ भक्त नारायण गौरांगदास यांच्या हस्ते ही मुहूर्तमेढ झाली. ‘बेळगावकरांचा उत्सव’ म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेत देशाच्या विविध भागातून हजारो भाविक आणि इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी सहभागी होणार आहेत. या रथयात्रेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ रोजी रथयात्रा झाल्यानंतर त्या दिवशी व दि. २५ रोजी मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियान्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या मुहूर्तमेढप्रसंगी चैतन्य प्रभू, प्रेमरस प्रभू, अमृतकृष्ण प्रभू, रामदास, सुकुमार प्रभू, श्री रामायण प्रभू, संकर्षण प्रभू आदी उपस्थित होते.

The post बेळगावातील श्रीकृष्ण रथयात्रेच्या मंडपाची मुहूर्तमेढ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात इस्कॉनची श्रीकृष्ण रथयात्रा २४ जानेवारीला
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉनच्या) वतीने होणारी श्रीकृष्ण रथयात्रा यंदा दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी बेळगाव नगरीत संपन्न होत आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी दिली. “बेळगावकरांचा उत्सव” म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेचे हे २८ वे वर्ष असून देशाच्या विविध भागातून येणारे हजारो भाविक या रथयात्रेत सहभागी होतात.

त्यासाठी इस्कॉन बेळगावच्या वतीने एका समितीचे आयोजन करण्यात आले असून ही समिती दोन दिवस होणारी रथयात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी प्रयत्नशील आहे. या रथयात्रेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ रोजी रथयात्रा झाल्यानंतर त्या दिवशी व दि. २५ रोजी मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियान्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या रथयात्रेत इस्कॉनचळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी सहभागी होणार आहेत.

The post बेळगावात इस्कॉनची श्रीकृष्ण रथयात्रा २४ जानेवारीला appeared first on News 24 Tass Marathi.

श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन )च्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने इस्कॉनच्या शुक्रवारपेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जन्माष्टमी महोत्सवाचा समारोप रविवारी संपन्न झालेल्या व्यासपूजेने झाला. श्री प्रभुपाद यांच्या प्रतिमेची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. मंदिरा बाहेर उभारण्यात आलेल्या शामियान्यात श्रील प्रभूपादांच्या मूर्तीभोवती आरास करण्यात आली होती.

संकर्षण प्रभू, मदन गोविंद प्रभू, पांडुरंग हरी प्रभू ,गोलोकचंद प्रभू, गिरीवर प्रभू, नारायण गौरांग प्रसाद, महा अवतार प्रभू, सुदर्शन प्रभू, विनोद गोपाल प्रभू, गोपाल चंद्र प्रभू, परशुराम खांडेकर प्रभू ,भावग्रही जनार्दन प्रभू ,श्री रामायण प्रभू ,गौरांग प्रसाद प्रभू ,पंकज राठी प्रभू, कुलदीप जैन प्रभू ,प्रेम अमृत प्रभू याचबरोबर ललित कुंदमाताजी, हरिप्रिया सखी, वैशाली चव्हाण, ललिता राधा, प्रभावती गोपी ,प्रिया रजरानी, सखी गौरांगी अशा एकंदर ५२ जणांनी श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज म्हणाले की “आचार्य श्रील प्रभुपाद यांनी आपल्याला रत्नांची खाण दिलेली आहे.जिची गणना करणे कठीण आहे. त्यांनी आपल्याला ग्रंथरत्न, लीलारत्न, रूप रत्न, विग्रह रत्न अशा प्रकारची अनेक रत्ने बहाल केली आहेत. या रत्नांचा योग्य प्रकारे सांभाळ करून हा अनमोल ठेवा पुढील पिढीच्या हातात देणे हे आपले कर्तव्य आहे. आपण जर असे केले तर आपले जीवन सार्थक होईल.” त्यानंतर भजन,कीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसाद होऊनकार्यक्रमाची सांगता झाली. काल व आज हजारो भक्ताने मंदिराला भेट देऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.

The post श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी..
बेळगाव : इस्कॉन चळवळीतील दरवर्षीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या उत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या महोत्सवात रविवारी जन्माष्टमी निमित्त भरगच्च कार्यक्रम झाले.

जन्माष्टमी कथा महोत्सव :

गेल्या रविवारपासून इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी जन्माष्टमी कथा महोत्सवात रोज भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरील कथा सांगितल्या.

पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यांनी श्रीमद् भागवतातील 60 व्या अध्यायावर कथाकथन केले. या अध्यायात भगवंत सांगतात की ,”मला प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे “माझे नित्य दर्शन करणे, माझ्याबद्दल श्रवण, कीर्तन करणे, भक्तांच्या संगतीत राहणे,  वगैरे वगैरे.

शुक्रवारी म्हणजे स्वातंत्र्य दिनादिवशी प.पू. भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी श्रीमद् भागवतातील दहाव्या गणितातील 61 व्या अध्यायावर कथाकथन केले. यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या कुटुंबाबद्दल ची माहिती दिली. भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या पण त्यापैकी प्रमुख राण्या आठ होत्या त्या प्रत्येक राणीला दहा मुलगे व एक मुलगी होती. असे सांगून महाराज पुढे म्हणाले की,” श्रीकृष्णांच्या मुलांची संख्या 1 लाख 61 हजार होती आणि त्या प्रत्येकाची लग्न झाल्याने त्यांना प्रत्येकी दहा मुले झाली अशा पद्धतीने श्रीकृष्णांच्या परिवारात 16 लाखापेक्षा जास्त सदस्य होते. भगवंतांनी प्रत्येक राणीसाठी वेगळा महल बांधला होता आणि प्रत्येक राणी बरोबर ते स्वतंत्ररीत्या राहायचे. हे केवळ भगवंत असल्यामुळेच त्यांना शक्य होते.

“भगवंताप्रति श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी आपण भक्तांच्या संगतीत राहावे लागते कारण संग हा अतिशय महत्त्वाचा आहे.” असे सांगून ज्या ज्या वेळी मनुष्याला राग येतो तेव्हा मनुष्याने जप केला तर त्याच्या जीवनात शांती येऊ शकेल असेही ते म्हणाले.

भक्तांनी तयार केलेल्या गाईशी संबंधित वस्तूंच्या एका बॉक्सचे अनावरण महाराजांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या बॉक्समध्ये जपमाळा, धूप, गोमूत्र, गोबर काड्या, महामंत्र व मोरपंख यांचा समावेश असून हा बॉक्स इस्कॉनच्या मॅचलेस गिफ्ट या दालनांत उपलब्ध आहे

पार्किंग ग्राउंडवर व्यवस्था :

दरवर्षी मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन यावर्षी प्रथमच जन्माष्टमी चे कार्यक्रम मंदिराबरोबरच मंदिरा मागील पार्किंग ग्राउंड वर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात घेण्यात आले. त्यामध्ये सकाळी आरती, शृंगार दर्शन ,भागवत प्रवचन ,दिवसभर भजन, कीर्तन आणि सायंकाळी दीक्षित भक्तांचे अभिषेक झाले. त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून पुढे देणगीदारांचे अभिषेक झाले. अनेक देणगीदारांनी अभिषेकाचा लाभ घेतला. इस्कॉनचे भक्त विष्णुप्रसाद यांनी बसवलेली श्रीकृष्णांच्या जीवनावरील नाट्यलीला सादर करण्यात आली. त्यानंतर प.पू .भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे श्रीकृष्ण जन्मावर विशेष कथाकथन झाले आणि रात्री बारा वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

सोमवारी व्यासपूजा

इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असतो त्यामुळे इस्कॉन चळवळीत तो दिवस व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात येतो. हाही कार्यक्रम मंदिराच्या मागील बाजूस उभारलेल्या मंडपात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. अनेक भक्तांच्या वतीने श्रील प्रभुपाद यांच्या जीवनावर गुणगान केले जाणार असून प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे

The post इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी.. appeared first on News 24 Tass Marathi.

इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी परंपरा दास, नागेंद्र दास, नीताई निमाई दास, राम दास, ब्रजजन दास व इतर अनेक भक्त उपस्थित होते. जन्माष्टमी भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी भक्तगण कामाला लागले आहेत.

The post इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.