Independence Day Archives | News 24 Tass Marathi

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य श्री. मनोहर करडी, सर्व शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.

नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मनो‍ज सरांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी व कन्नड भाषेत प्रभावी भाषणे, देशभक्तिपर समूहगीत, हिंदी काव्यवाचन व समूह नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मास्टर रिधान पाटील व मास्टर शौर्य खन्नुकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्वातंत्र्यदिन केवळ देशभक्तीचा पोशाख परिधान करण्यापुरता मर्यादित नसून, स्वातंत्र्यवीरांची ओळख, त्यांचा त्याग आणि राष्ट्रासाठीचे योगदान जाणून घेण्याचा दिवस आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. देशप्रेम, शिस्त, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
टिळकवाडी : शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डॉ. विक्रम नाईक यांना नुकताच गणित विषयात पीएचडी संपादन केल्याबद्दल तसेच निवृत्त मुख्याध्यापक एन. डी. पाटील व वाय. पी. नाईक यांची अखिल भारतीय नाईक रामोशी समाज‌ विकास परिषद पुणे विभाग उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी उपमहापौर आनंद चव्हाण व पी. एन. बेळीकटी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नारायण आपटेकर, विलास काळे, नागेश नाईक, दयानंद भेंडीगेरी, लक्ष्मण वालीकर, सुशांत कडागंळे संजय रायकर, गणपती कब्बूर, विलास बसरीमरद, सुमेधा काळे,सुमन‌ दळवी, सुरेखा काळे, राहुल कांबळे, शिक्षक आसिफ आत्तार, उमा परदेशी आदी मान्यवरांसह नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
येळ्ळूर : येथील कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर होत्या. यावेळी एसडीएमसीचे उपाध्यक्ष, सदस्य, सदस्या, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन एसडीएमसी सदस्या अल्का कुंडेकर व रेश्मा काकतकर यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन एसडीएमसी सदस्य जोतिबा पाटील व दिनेश लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. शशिकांत पाटील यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदेमातरमच्या घोषात मानवंदना देण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील विविध गल्ल्यांमधून प्रभातफेरी काढली. सांबरेकर गल्लीतील अमर शिवसेना युवक मंडळ आणि तानाजी गल्लीतील तानाजी युवक मंडळाने प्रभातफेरीचे स्वागत करून ध्वजारोहण केले व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले. कलमेश्वर गल्लीतील युवक, सेवानिवृत्त सैनिक रावजी पाटील, स्वामी विवेकानंद सोसायटी, नेताजी सोसायटी आणि एसडीएमसी सदस्या ज्योती पाटील यांनीही विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने पीडीओ व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप केले.

शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते आणि विविध सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त केंद्रीय अधिकारी सूर्यकांत महादेव मुरकुटे यांनी प्रत्येकी १०० रुपयांचे बक्षीस दिले. देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसडीएमसी सदस्य मारुती यळगुकर यांनी आपल्या आजी कै. गंगुबाई यळगुकर यांच्या स्मरणार्थ पेन भेट दिले.

एसडीएमसी उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेच्या प्रभातफेरीत सहभागी झालेल्या विविध युवक मंडळे, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अध्यक्षा दिव्या कुंडेकर यांनीही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रभातफेरी काढून देशभक्तीपर भाषणे व गीते सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे स्वागत ऐश्वर्या मेणसे यांनी केले. सूत्रसंचालन मेघा देसाई यांनी केले, तर आभार सातेरी पाखरे यांनी मानले. यावेळी एसडीएमसी सदस्य मारुती यळगुकर, चांगदेव मुरकुटे, शशिकांत पाटील, जोतिबा पाटील, दिनेश लोहार, मुर्तिकुमार माने, सदस्या शुभांगी मुतगेकर, मयुरी कुगजी, ज्योती पाटील, अर्चना देसाई, अल्का कुंडेकर, रेश्मा काकतकर, वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

The post येळ्ळूर कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
बेळगाव : बेळगावातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, आयजीपी कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सूरांमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उत्तर विभागाच्या आयजीपी कार्यालयात आयजीपी संदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीतासह ध्वजास मानवंदना दिल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) कार्यालयात एसपी के. रामराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगावातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

महिला मंत्रिपदासाठी लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची चर्चा
मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि महिला मंत्र्यांच्या समावेशाबाबत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बेळगावात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांच्या समावेशासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. महिला मंत्र्याची निवड होईपर्यंत संबंधित खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे. पक्ष हायकमांड ज्यांची निवड करेल, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री जमीर अहमद यांच्या मुद्द्यावर बोलताना भाजपला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ठणकावले. तसेच यरगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची उद्या पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर करण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडून मुद्दाम बैठक घेतली जात नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला बेळगाव उत्तरचे आमदार असिफ शेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि पोलीस अधीक्षक के. रामराजन उपस्थित होते.

The post महिला मंत्रिपदासाठी लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची चर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रेरणादायी ; हुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन

बेळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजारोहण

बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील वीरांचे बलिदान देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी बेळगाव जिल्हा स्टेडियमवर आयोजित जिल्हास्तरीय सोहळ्यात ते बोलत होते.

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतासह तिरंग्याला सलामी देण्यात आली. परेड कमांडरने पालकमंत्र्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांनी खुल्या वाहनातून संचलनाची पाहणी केली. पोलीस विभाग, अग्निशमन दल, होमगार्ड, एनसीसी तसेच महापालिकेचे नागरी कर्मचारी आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर केले.

आपल्या भाषणात सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांसह जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बेळगाव शहरातील एका प्रकल्पाचा पहिला टप्पा २७५.५३ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २४० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ७५ कोटी रुपयांचा डीपीआर तपासणीच्या टप्प्यात असून, नवीन स्टेडियमसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था सुधारत असून ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना मोफत प्रवासाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना आवश्यक खतांचे वितरण करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आसिफ सेठ, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, प्रादेशिक आयुक्त एम. जानकी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

The post स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रेरणादायी ; हुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा appeared first on News 24 Tass Marathi.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅली
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; येळ्ळूर किल्ल्यापर्यंत २० किलोमीटरचा सायकल प्रवास

बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरपासून सुरू झालेली सुमारे २० किलोमीटरची रॅली येळ्ळूर किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. बेळगाव स्टेशन कमांडर तथा द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सायकल चालवत तरुण सायकलस्वारांसोबत सहभाग घेतला.

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, जेसीओ आणि जवानांनीही विद्यार्थ्यांसोबत सायकल रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे भारतीय लष्कर, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्यातील सहभागाचे दर्शन घडले.

‘तिरंगा ऑन व्हील्स’च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला तरुणाईच्या जोशाची जोड मिळाली. देशभक्तीसोबतच आरोग्य, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.

The post स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅली appeared first on News 24 Tass Marathi.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी नियोजनबद्ध तयारी करा
पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव : आगामी स्वातंत्र्यदिन उत्साह, शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी आतापासूनच नियोजनबद्ध तयारीला लागावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शुक्रवारी (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित स्वातंत्र्यदिन पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमासाठी छापण्यात येणारी निमंत्रणपत्रे शिष्टाचारानुसार तयार करून ती मान्यवरांपर्यंत वेळेआधी पोहोचवावीत, तसेच कोणत्याही परिस्थितीत शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी मान्यवरांसोबतच नागरिक, विद्यार्थी आणि उपस्थितांसाठीही पुरेशी व सुयोग्य आसनव्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच शहरातील प्रमुख चौक स्वच्छ करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावरही भर देण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

यशस्वी आणि उत्साहपूर्ण स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येक समितीने आपली जबाबदारी वेळेत आणि प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.

The post स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी नियोजनबद्ध तयारी करा appeared first on News 24 Tass Marathi.

स्वातंत्र्यदिनी येळ्ळूर सरकारी मराठी मॉडेल शाळेत ७ वी च्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण
येळ्ळूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येळ्ळूर सरकारी मॉडेल शाळेतील सन २०२३-२४ साली सातवीच्या परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कै. गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ प्रताप गल्ली येळ्ळूर येथील शाळेचे एसडीएमसी सदस्य श्री.मारुती कृष्णा यळगुकर यांनी सन्मानित केले.

यामध्ये कु.वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (प्रथम), कु. प्रज्योती अनिल पाटील (द्वितीय), कु. जयदीप शिवाजी खेमणाकर (तृतीय) या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री. शिवाजी जोतिबा नांदुरकर, माजी सैनिक श्री. शंकर टक्केकर,शाळेचे एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. मुर्तीकुमार माने, श्री. दिनेश लोहार, श्री. शशिकांत पाटील, श्री. विजय धामणेकर, श्री. जोतिबा पाटील, सदस्या सौ.अलका कुंडेकर, सौ. प्रियंका सांबरेकर, सौ.राजश्री सुतार, सौ. दिव्या कुंडेकर, सौ.माधुरी कुगजी, सौ. रेश्मा काकतकर, श्रीमती. शुभांगी मुतगेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

The post स्वातंत्र्यदिनी येळ्ळूर सरकारी मराठी मॉडेल शाळेत ७ वी च्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण appeared first on News 24 Tass Marathi.

शांतीनगर टिळकवाडी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : येथील शांती नगर टिळकवाडी येथे वीर सावरकर उद्यान मध्ये रहिवासी संघटनेतर्फे भारतीय ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण आपटेकर, विलास काळे,बापू पट्टणशेटी, विलास बसरीमरद प्रतिभा हावळ, श्वेता खांडेकर, विद्या पाटील, लक्ष्मण वालीकर, डॉ. गिरीधर पाटील, डॉ. मरली, बलवंत राजाई, मंदार उचगावकर, गणपती कब्बूर, प्राथमिक शाळेतील शिक्षक आत्तार, विद्यार्थी आदी मान्यवर रहिवासी उपस्थित होते. पी. एन. बेळीकेट्टी यांनी आभार मानले.

The post शांतीनगर टिळकवाडी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.