Important News Archives | News 24 Tass Marathi

बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न
मार्केट पोलिसांकडून दोघांना अटक

बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटा कुलमुखत्यारनामा आणि बनावट स्वाक्षरीच्या आधारे दुसऱ्याची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेळगावच्या मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. उपनिबंधक कार्यालयात खोटी ओळख निर्माण करून मालमत्तेच्या व्यवहाराचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

कडोली येथील परशुराम दुडुम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, बनावट कागदपत्रे तयार करून खोटी स्वाक्षरी आणि बनावट छायाचित्रांचा वापर करत दुसऱ्या व्यक्तीला मूळ मालक म्हणून उभे करण्यात आले होते. या माध्यमातून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी दस्तऐवजांवरील छायाचित्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबवत मुख्य संशयित इसाक इस्माईल मुजावर आणि नागराज रामचंद्र कडकोळ यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

तपासात असेही समोर आले की, अटक करण्यात आलेल्या नागराज कडकोळ याच्याविरुद्ध यापूर्वी अंकोला पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून तो त्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता.

मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिरची आणि पीएसआय एच. एल. केरूळ यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा डाव उधळून लावल्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिसांचे कौतुक केले आहे.

The post बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

सिद्धरामय्या आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत – मंत्री सतीश जारकीहोळी
अफवांना पूर्णविराम ; बेळगावला आणखी एका मंत्रीपदाची आग्रही मागणी

बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसून त्यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना तथ्य नसल्याचे स्पष्ट करत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आम्ही गेली तीन दशके एकत्र काम करत असून आमच्यात कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले, “सिद्धरामय्या आणि आमच्यात कोणताही मतभेद नाही. आम्ही पूर्वीही एकत्र होतो आणि आजही एकत्रच आहोत. प्रसारमाध्यमांमध्ये विनाकारण मतभेदांचे चित्र रंगवले जात आहे. आमच्यात कोणताही संभ्रम किंवा अडचण नाही. सध्या निर्माण झालेली ही चर्चा फार काळ टिकणार नाही.”

केपीसीसीच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलताना त्यांनी पक्षाच्या नव्या नेतृत्वाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. नवीन संघटनात्मक टीम पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल आणि त्यामध्ये आपणही सक्रियपणे सहभागी राहू, असे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्ली दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले की, योग्य वेळी पक्षश्रेष्ठींची भेट घेणे ही नियमित प्रक्रिया आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाली असून संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका पक्ष नेतृत्वापुढे मांडण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चर्चा लवकरच होणार असून अंतिम निर्णय काँग्रेस हाय कमांड घेणार आहे.

पक्षात नवीन आणि पात्र चेहऱ्यांना संधी दिल्यास संघटना अधिक बळकट होईल, अशी पक्षश्रेष्ठींची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बेळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत जारकीहोळी यांनी जिल्ह्याला मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रीपद मिळावे, ही आपली ठाम भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

The post सिद्धरामय्या आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत – मंत्री सतीश जारकीहोळी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालये रविवारीही सुरू राहणार
राज्य सरकारचा आदेश ; १२ जुलै रोजी नागरिकांना मिळणार नोंदणी सेवांचा लाभ

बेळगाव : राज्य सरकारच्या निर्णयामुळे मालमत्ता नोंदणीसह विविध नोंदणी कामांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकातील सर्व उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये नियमितपणे सुरू राहणार असून, नागरिकांना नेहमीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कर्नाटक सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील प्रकरण ५ अंतर्गत नियम ५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, या रविवारीची सार्वजनिक सुटी रद्द करून तो दिवस ‘कामाचा दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

यामुळे मालमत्ता नोंदणी, मुद्रांक शुल्क भरणे तसेच नोंदणी विभागाशी संबंधित इतर तातडीचे व्यवहार नागरिकांना रविवारीही करता येणार आहेत. आठवड्याच्या इतर दिवशी वेळेअभावी कामे पूर्ण करू न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय विशेष लाभदायी ठरणार आहे.

महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घेत आपल्या प्रलंबित नोंदणीसंबंधित कामांचा वेळेत निपटारा करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post बेळगाव जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालये रविवारीही सुरू राहणार appeared first on News 24 Tass Marathi.

मतदारांनी माहिती वेळेत सादर करावी
एसआयआर प्रक्रियेत सकल मराठा समाजाचे आवाहन

बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत समाजातील एकही मतदार वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी आवश्यक माहिती वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाज, बेळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक सरकारतर्फे राज्यभर विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) अभियान राबविण्यात येत असून, या अंतर्गत मतदार याद्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती तसेच पत्त्याची अचूक नोंद या प्रक्रियेत केली जात आहे.

मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहावा तसेच भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत संबंधित शासकीय प्रतिनिधींकडे सादर करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादीतील नावे अचूक राहणे, शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे आणि समाजाची अधिकृत लोकसंख्येची माहिती योग्य प्रकारे नोंदवली जाणे, या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे.

समाजातील सर्व मराठा बांधवांनी संबंधित एसआयआर फॉर्म काळजीपूर्वक भरून आपल्या भागातील बीएलओ (Booth Level Officer) यांच्याकडे अथवा संबंधित कार्यालयात वेळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सकल मराठा समाजाच्या जनसंपर्क कार्यालय, गुडशेड रोड, बेळगाव येथे संपर्क साधावा किंवा समन्वयक किरण जाधव यांच्याशी ९४४८१ ३५८०७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

The post मतदारांनी माहिती वेळेत सादर करावी appeared first on News 24 Tass Marathi.

मच्छेत कारमधून गांजा विक्री करणाऱ्या हुबळीच्या तरुणाला अटक
बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई ; १६८ ग्रॅम गांजा, कारसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कारमधून गांजाची विक्री करणाऱ्या हुबळी येथील एका तरुणाला शिताफीने अटक केली आहे. व्हीटीयू क्रॉसजवळील जांबोटी-बेळगाव मार्गावरील मच्छे परिसरात सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निखील मायकल डेव्हिड (वय ३७, रा. केशवापूर, हुबळी) असे आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनायक आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १६८ ग्रॅम गांजा, एक कार आणि एक मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा विक्रीच्या जाळ्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

The post मच्छेत कारमधून गांजा विक्री करणाऱ्या हुबळीच्या तरुणाला अटक appeared first on News 24 Tass Marathi.

विजेचा धक्का लागून टायर दुकान मालकाचा मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली गावात दुकान बंद करत असताना विजेचा धक्का लागून टायर दुकानाच्या मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवन माने (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन माने हे जोडकुर्ली गावात टायरचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे रात्रीचे काम आटोपून ते दुकान बंद करत असताना दुकानातील शॉर्ट सर्किट किंवा जुन्या वायरिंगमुळे वीज प्रवाहित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जुन्या वीज वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची पाहणी केली असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

The post विजेचा धक्का लागून टायर दुकान मालकाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कॅम्प पोलीस ठाण्याचे बीएसएनएल इमारतीत स्थलांतर
उद्यापासून नव्या ठिकाणाहून सेवा

बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, यापुढे ठाण्याचे कामकाज ग्लोब चित्रपटगृहासमोरील बीएसएनएल इमारतीतून सुरू राहणार आहे.

हाय स्ट्रीटवरील बी.सी. क्र. ९७ येथील कॅम्प पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याने ही तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पोलीस सेवा अधिक सुरक्षित आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, कॅम्प पोलीस ठाण्याशी संबंधित सर्व तक्रारी, अर्ज, पडताळणीची कामे तसेच इतर पोलीस सेवांसाठी नागरिकांनी सोमवारपासून नव्या बीएसएनएल इमारतीतील पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

The post कॅम्प पोलीस ठाण्याचे बीएसएनएल इमारतीत स्थलांतर appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यात जप्त अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट
बेळगाव : अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली. जिल्हा अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

बेळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस ठाण्यांमध्ये अवैध विक्री, वाहतूक आणि अंमली पदार्थांच्या लागवडीशी संबंधित नोंदविण्यात आलेल्या एकूण २३ प्रकरणांमधील जप्त मुद्देमालाचा यामध्ये समावेश होता.

न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक परवानगीनंतर, जिल्हा अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सावदत्ती तालुक्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरुगोप्पा गावाजवळ असलेल्या द बेळगाव ग्रीन एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पात ही विल्हेवाट प्रक्रिया पार पडली.

या कारवाईत सुमारे १० लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचे आणि २२ किलो ५०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ नियमांनुसार वैज्ञानिक पद्धतीने पूर्णतः नष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, अशा गुन्ह्यांविरोधात पोलिसांचे विशेष अभियान पुढेही कायम राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

The post बेळगाव जिल्ह्यात जप्त अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट appeared first on News 24 Tass Marathi.

तरुणाच्या आत्महत्येनंतर माजी महापौरांच्या घरावर दगडफेक
घरासह कार्यालय आणि वाहनांची तोडफोड

हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

बेळगाव : हिंडाल्को कंपनीतील एका तरुणाच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बेळगावचे माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर हल्ला केला. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले असून हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माजी महापौरांनी केली आहे.

हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुणाने बुधवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीत त्याने नोकरी कायम करण्यासाठी रामाचारी नावाच्या व्यक्तीला ५ लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता. तसेच कंत्राटदारांकडून भरती प्रक्रियेत जवळच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुत्त्यानट्टी गावातील नागरिकांनी बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली. या हल्ल्यात काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर प्रतिक्रिया देताना माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांनी कंपनीतील भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याचा दावा केला. तसेच मृत तरुणाने चिठ्ठीत उल्लेख केलेल्या रामाचारी नावाच्या व्यक्तीशी आपला किंवा आपल्या संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा हल्ला वैयक्तिक आणि राजकीय द्वेषातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप करत, लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

The post तरुणाच्या आत्महत्येनंतर माजी महापौरांच्या घरावर दगडफेक appeared first on News 24 Tass Marathi.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या महत्वाची बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या शुक्रवार दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

The post मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या महत्वाची बैठक appeared first on News 24 Tass Marathi.