iffi Archives | News 24 Tass Marathi

गोव्यात अत्याधुनिक फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव
चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणाला प्राधान्य द्यावे !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

‘इफ्फी’ चे दिमाखात उद्घाटन

पणजी : निसर्गसौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि चित्रपट निर्मितीसाठी अनुकूल वातावरण यामुळे गोवा जागतिक चित्रपट निर्मात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. त्यामुळे देश-विदेशातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी गोव्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत असून, गोव्यात अत्याधुनिक फिल्म सिटी उभारण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्यामाप्रसाद स्टेडियमवर शुक्रवारी ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार रवी किशन, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

गोवा सरकारने चित्रपट निर्मात्यांसाठी सिंगल विंडो धोरण स्वीकारले असून, त्यामुळे चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. राज्यातील निसर्गरम्य ठिकाणे आणि अनुकूल धोरणांचा चित्रपट निर्मात्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. या बदलत्या क्षेत्रात स्थानिक तरुणांनी उपलब्ध होणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गोव्याची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित नसून, येथील सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक परंपरांचाही अनुभव महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांनी घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्याच्या भूमीत स्वप्नांना नवी दिशा मिळते आणि इफ्फीने जागतिक सांस्कृतिक दिनदर्शिकेत महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणी, मराठी चित्रपटांना अनुदान

हिंदी चित्रपटसृष्टीत गोमंतकीय कलाकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक चित्रपटसृष्टीच्या विकासावर भर दिला. यंदाच्या महोत्सवाची ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर’ ही संकल्पना असून, भारतीय तत्त्वज्ञानातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचाराशी ती साधर्म्य दर्शवते. कथा आणि चित्रपट हे भाषिक व भौगोलिक सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. इफ्फीमुळे स्थानिक चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान योजना सुरू केली असून, बदलत्या काळानुसार त्यात आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिकी केज यांच्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध

उद्घाटन सोहळ्यात तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री रिकी केज यांनी आपल्या संगीतकलेची अनोखी झलक सादर केली. ‘म्युझिक विदाऊट बॉर्डर’ या विशेष कार्यक्रमातून त्यांनी विविध देशांतील संगीतकारांना एकत्र आणले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या थीम साँगचे सुरेल एकत्रीकरण करत त्यांनी इफ्फीचे थीम साँग सादर केले. या अभिनव संगीत प्रयोगाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्तिक आर्यन, साई पल्लवी यांची उपस्थिती

उद्घाटन सोहळ्यात कलाकारांच्या उपस्थितीने रंगत आणखी वाढली. भोजपुरी चित्रपटांमधून प्रवास सुरू करून इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास सुखद असल्याची भावना खासदार रवी किशन यांनी व्यक्त केली.

अभिनेता कार्तिक आर्यन याने इफ्फीला चित्रपटांचा महाकुंभ असे संबोधले. आपल्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले होते, अशी आठवणही त्याने यावेळी सांगितली. अभिनेत्री साई पल्लवी यांनी कलाकारांना आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इफ्फी हे उत्तम व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त केले.

The post गोव्यात अत्याधुनिक फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव appeared first on News 24 Tass Marathi.