heat wave Archives | News 24 Tass Marathi

उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना ‘वळिवाचा’ दिलासा
शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

बेळगाव : उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना अचानक झालेल्या वळिवाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

सायंकाळी शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.

मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे पाणी बाजारपेठ परिसरात शिरले. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पावसामुळे हवामानात गारवा आला असला, तरी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

The post उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना ‘वळिवाचा’ दिलासा appeared first on News 24 Tass Marathi.

उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा
राणी चन्नम्मा चौकात जिल्हा प्रशासनाकडून सावलीची सोय

बेळगाव : सिग्नलवर उभे राहून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राणी चन्नम्मा चौकात उभारलेले ‘कुलिंग शेड’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्येही नागरिकांना थोडासा थंडावा देणारा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त आय. ए. कार्तिक यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाअंतर्गत सिग्नलजवळ हिरव्या नेटची सावली निर्माण करण्यात आली आहे. सिग्नलची वाट पाहणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी ही सोय विशेषतः उपयुक्त ठरत असून, उन्हाचा थेट तडाखा कमी करण्यास मदत होत आहे.

महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेले हे शेड विजापूरमधील प्रयोगाच्या धर्तीवर उभे करण्यात आले आहे. लहानसा वाटणारा हा उपाय प्रत्यक्षात मोठा दिलासा देणारा ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

या ‘कुलिंग शेड’मुळे सिग्नलवर उभे राहण्याचा अनुभव काहीसा सुसह्य झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सुविधा शहरातील इतर चौकांमध्येही सुरू कराव्यात, अशी मागणी व्यक्त केली आहे.

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन राबवलेला हा उपक्रम प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे. भविष्यात अशा आणखी उपाययोजना राबवून शहरवासीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचा पारा ३८ अंशांवर ; उकाड्याने नागरिक हैराण
सात दिवसांत किमान तापमानात आठ अंशांनी वाढ

बेळगाव : उन्हाळा ऐन मध्यावर आला असल्यामुळे रविवारी (दि. १२) बेळगावचे तापमान ३८ अंशांवर पोहोचले असून साप्ताहिक सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने ‘हॉट संडे’ ठरला. गेल्या सात दिवसांत कमाल तापमानात पाच तर किमान तापमानात तब्बल आठ अंशांनी वाढ झाली आहे.

बेळगावात एप्रिल महिन्यात सरासरी तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असते. मात्र, यंदा तापमानाने ३८ अंशांचा टप्पा गाठल्याने उष्णतेचा तीव्र त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

किमान तापमान २४ अंशांवर स्थिर असून त्यातही घट होत नसल्याने उष्णतेचा प्रभाव दिवस-रात्र जाणवत आहे. परिणामी, घरोघरी पंखे आणि वातानुकूलित यंत्रे दिवसभर सुरू ठेवावी लागत आहेत. आगामी काळातही तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या सात दिवसांत कमाल तापमानात पाच अंशांनी, तर किमान तापमानात आठ अंशांनी वाढ झाल्याने उकाडा असह्य झाला आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वारंवार पाणी पिणे, प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळणे, तसेच सैल आणि सुती कपड्यांचा वापर करणे, असा सल्ला देण्यात येत आहे.

The post बेळगावचा पारा ३८ अंशांवर ; उकाड्याने नागरिक हैराण appeared first on News 24 Tass Marathi.

तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा
पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. तलावाच्या काठावर पडलेल्या माशांच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक मत्स्यपालक शंकरगौडा पाटील यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून या तलावात मासेमारीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. यंदा त्यांनी तलावात सुमारे ५० हजारांहून अधिक मासे सोडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीव्र उन्हामुळे तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने माशांना हालचाल करण्यास जागा उरली नाही आणि ऑक्सिजनअभावी ते गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या घटनेमुळे मत्स्यपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून गुंतवलेले भांडवलही परत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शंकरगौडा पाटील यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटत असून जैवविविधतेवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

The post तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा appeared first on News 24 Tass Marathi.