gram panchayat Archives | News 24 Tass Marathi

ग्रामपंचायतींची प्रभागरचना आणि प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी जिल्हा प्रशासनाची अधिसूचना

इच्छुक उमेदवारांचे लक्ष निवडणुकांकडे

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना आणि प्रवर्गनिहाय आरक्षणाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता निवडणूक प्रक्रियेकडे लागले आहे.

तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागांची रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने गावपातळीवरील राजकीय हालचालींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम, १९९३ मधील कलम ५ च्या उपकलम (५) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या भौगोलिक हद्दीनुसार प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची विभागणी करण्यात आली असून, सदस्यसंख्या आणि विविध प्रवर्गांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत अरळीकट्टी, येळ्ळूर, उचगाव, कडोली, मारीहाळ, सुळगे (उ), अंकलगी, होसवंटमूरी, मुतगा, हंदिगनूर, केदनूर, बंबरगे, किणये आणि मुच्चंडी यांसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभागांच्या भौगोलिक मर्यादाही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग ‘अ’ आणि ‘ब’ तसेच महिलांसाठी राखीव जागांचा तपशील राजपत्रात नमूद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीनुसार प्रभागरचना आणि आरक्षणाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अधिसूचनेनंतर ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांचे पुढील निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

The post ग्रामपंचायतींची प्रभागरचना आणि प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.