Ponda Archives | News 24 Tass Marathi

संकुकाई कपमध्ये ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
बेळगाव / प्रतिनिधी

गोव्यातील फोंडा येथे दि. ४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकुकाई कप कराटे स्पर्धेत बेळगावच्या ए.व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. प्रशिक्षक अमित वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी काता व कुमिते प्रकारात अनेक पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत अनन्या एन. मिठारे, श्रीनिवास आर. कुलकर्णी आणि साची व्ही. अथणीमठ यांनी काता प्रकारात तिसरे स्थान पटकावले. नीरजा व्ही. बडगी हिने काता प्रकारात दुसरे स्थान मिळवून ॲकॅडमीचे नाव उज्वल केले.

स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये शौर्य एस. गोडसे याने काता प्रकारात पहिले तर कुमितेमध्ये दुसरे स्थान पटकावले. सृष्टी एस. जाधव हिने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत पहिले स्थान मिळवून दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच ईशान ए. करगुप्पिकर यानेही काता व कुमिते या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत शानदार यश मिळवले.

ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक अमित वेसणे तसेच पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

The post संकुकाई कपमध्ये ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी
बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश

बेळगाव / प्रतिनिधी

ए.व्ही.कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित ६व्या राष्ट्रीय निमंत्रित स्तरावरील कराटे स्पर्धेत सृष्टीने कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर काता प्रकारात द्वितीय स्थान मिळवले.

यशाची ही घोडदौड सुरू ठेवत सृष्टीने ४ जानेवारी रोजी फोंडा (गोवा) येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘संकुकाई कप’ कराटे स्पर्धेत काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या या दमदार कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिला प्रशिक्षक श्री.अमित वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सृष्टीच्या या यशाबद्दल राज्याच्या महिला बालविकास मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे युवा नेते श्री. मृणाल हेब्बाळकर यांनी तिचे कौतुक केले असून भावी वाटचालीत सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ए.व्ही.कराटे ॲकॅडमीचे प्रशिक्षक, पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

The post ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन
राजकीय वर्तुळावर शोककळा

पणजी : गोव्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक (वय ७९) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

रवी नाईक यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने फोंड्यातील सावईकर नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे पार्थिव आमचे दर्शनासाठी खडपाबांध – फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

आज बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी फोंडा येथील खडपाबांध येथे सायंकाळी चार वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

राजकीय प्रतिक्रिया :  डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री गोवा)

आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी रवी नाईक यांच्या निधनाने खूप दुःख झाले. गोव्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तीमत्व म्हणून त्यांची सेवा राज्याच्या प्रशासनावर आणि लोकांवर एक अमिट छाप सोडून गेली आहे. त्यांचे नेतृत्व आणि लोककल्याणासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.

भंडारी समाजाचा आधारवड हरपला :

भंडारी समाजाचे मार्गदर्शक आणि संघटक म्हणून समाजाच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिलेले रवी नाईक हे गोव्यातील भंडारी समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते. समाजात त्यांचा मोठा दबदबा होता आणि प्रत्येक सामाजिक कार्याचे सक्रियपणे सहभागी होत असत. निधनापूर्वी गेल्या रविवारी हरवळे – साखळी येथे झालेल्या भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यालाही त्यांनी उपस्थिती लावली होती.

राजकीय कारकीर्द :

तीन दशकांहून अधिक काळ गोव्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका असलेले मंत्री रवी नाईक १९९१-९३ आणि १९९४ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर १९९८-९९ मध्ये उत्तर गोवा मतदार संघातून लोकसभा सदस्य (खासदार) तर २०२२ मध्ये फोंडा मतदारसंघातून भाजपमधून ते निवडून आले होते.

The post गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ
२३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती

फोंडा (गोवा) / प्रतिनिधी

पूर्वी गोव्यात लोक समुद्र, तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते. याउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल. गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.

या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. कुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत. प्रकृतीस्वाथ्य ठिक नसतांनाही साधक आणि भक्तांच्या प्रेमासाठी महोत्सवासाठी उपस्थित असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या दर्शनाने उपस्थित साधक, हिंदुत्वनिष्ठ भावविभोर झाले. महोत्सवाच्या प्रारंभी शंखनाद, गणेशवंदना आणि वेदमंत्रपठाण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, गोवा राज्याचे समाजकल्याणमंत्री श्री. सुभाष फळदेसाई, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण !  – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे. गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या; मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे. अशा पावन भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणे, हा शुभसंकेत आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थेसोबत आहेत.’’

गोवा ही ‘बीच’ वर बसण्याची नव्हे, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी ! – पू. देवकीनंदन ठाकूर

गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारी) बसण्याची नाही, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे. पाकिस्तानचे सरकार जे स्वत: भीक मागणारे आहे, ते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करतात, तर दुसरीकडे भारतात मंदिरे, गोशाळा आणि वेदविद्यालय यांचे निर्मिती होत आहे. त्यानंतर आमचे राष्ट्र हिंदु राष्ट्र होते आणि पुढेही रहाणार आहे.

हिंदूंनो  राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा ! – पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी  (गोवा)

आज गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती, ती दूर होऊन एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. श्री हनुमान, श्री राम, श्री कृष्ण यांच्या हातात आयुधे आहेत. ही आयुधे धर्माच्या रक्षणासाठी आहेत. आम्हाला शांती हवी आहे. सनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास अन् शांती निर्माण होईल. आज हिंदू जागा न झाल्यास, तर उद्याचा दिवस आपला रहाणार नाही. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आम्हीही या कार्यात सहभागी आहोत. या कार्याला आमचेही आशीर्वाद आहेत.

राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’!  – चेतन राजहंस

पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली. त्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ देईल, एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल.

कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार म्हणाले, ‘‘अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची मूळ संकल्पना आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे.’’ या प्रसंगी गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी १ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपास प्रारंभ करण्यात आला.

The post गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.