ganesh idol Archives | News 24 Tass Marathi

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट
विसर्जन मिरवणुकीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केले मार्गदर्शन

बेळगाव : गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर व्हाव्यात आणि मिरवणुकीचा कालावधी कमी व्हावा, या उद्देशाने बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे अत्यंत सक्रिय झाले आहेत. काल, मंगळवार दि.२८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते रात्री १०:०० या वेळेत पोलीस आयुक्तांनी शहरातील विविध गणेश मूर्तीशाळांना थेट भेटी देऊन पाहणी केली आणि मूर्तिकारांशी संवाद साधला. उत्सव दीड महिना म्हणजेच ४५ दिवस बाकी असतानाच आयुक्तांनी ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. या दौऱ्यात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर हे देखील आयुक्तांसोबत उपस्थित होते.

विविध भागात प्रत्यक्ष पाहणी व स्वागत :

पोलीस आयुक्त श्री. बोरसे यांनी येडियुराप्पा रोड येथील मनोहर पाटील, अनगोळ येथील जे. जे. पाटील, विक्रम व विनायक, मुतगा गावातील एम. जी. पाटील आणि गुडशेड रोड येथील कुंभार ब्रदर्स यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांसह अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात जवळपास 200 हून अधिक मूर्तींची पाहणी करण्यात आली. मूर्तिकार संघटनेचे सचिव विनायक मनोहर पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे झाडाचे रोप देऊन उत्साहात स्वागत केले.

अडचणींवर मात करण्यासाठी थेट संवाद :

मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलीस आयुक्त स्वतः मागील वर्षी पहिल्या मूर्तीपासून ते शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत कपलेश्वर तलावापाशी जातीने हजर होते. त्यामुळे त्यांना तिथल्या लहान-मोठ्या सर्व तांत्रिक अडचणींची पूर्ण कल्पना आहे. यंदा त्या चुका आणि अडचणी पुन्हा घडू नयेत, यासाठी आयुक्तांनी सर्व मूर्तिकारांना विसर्जन सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले व सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मूर्तिकारांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस अधिकारी आणि मूर्तिकारांची साथ :

या विशेष मोहिमेदरम्यान मार्केट, खडे बाजार, शहापूर, मारीहाळ आणि उद्यमबाग अशा विविध पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मक पुढाकाराचे सर्व मूर्तिकारांनी स्वागत केले असून, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या मोहिमेमुळे यंदाची बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध आणि कमी वेळेत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

The post पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट appeared first on News 24 Tass Marathi.