flyover Archives | News 24 Tass Marathi

बेळगावच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला अखेर गती
सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ

२७० कोटींच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी

बेळगाव : शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर गती मिळाली असून, सप्टेंबरअखेर कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७० कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ती ऑगस्टअखेर पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये निविदा अंतिम करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा आराखडा पुढील तीन महिन्यांत अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा आराखडा तयार केला आहे. तात्पुरती बॅरिकेडिंग, पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती आणि प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी प्रकल्पातील ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वीजवाहिन्या, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाच्या वाहिन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचाही खर्च मूळ प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या मार्गातील झाडांची सरसकट तोड न करता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ती जवळील शासकीय जागांवर एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात पुनर्लागवड करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना कमीत कमी गैरसोय होण्यासाठी लवकरच विविध घटकांची व्यापक सल्लागार बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

या बैठकीला पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा वनसंरक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला अखेर गती appeared first on News 24 Tass Marathi.

उड्डाणपूल, यल्लम्मा डोंगर विकास आणि शेतकरी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी येत्या एका आठवड्यात जाहीर सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचे काम पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, सम्राट अशोक रोड, मध्यवर्ती बसस्थानक, आरटीओ सर्कल ते चन्नम्मा सर्कल या मार्गावर राबवले जाणार आहे. जाहीर सभेत नागरिकांच्या सूचनांवर चर्चा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल.

यावेळी त्यांनी सवदत्ती येथील यल्लम्मा डोंगर विकास प्रकल्पासाठी २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. या विकासकामांचा शुभारंभ १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११६ कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली आहे. तसेच पावसात पूर्णतः घर कोसळलेल्या प्रसाद माळी यांना नव्या घराच्या बांधकामासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पायाभरणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आल्या असून, पुढील टप्प्यातील अनुदान लवकरच दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ही बैठक विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

The post उड्डाणपूल, यल्लम्मा डोंगर विकास आणि शेतकरी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ६ जानेवारीला बैठक
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठी ६ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत विविध संघटना आणि नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात विशेष बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाने उड्डाणपुलाच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उत्तर व दक्षिण मतदारसंघात पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य सरकारने या उड्डाणपुलासाठी २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग ते राणी चन्नम्मा चौक, दुसऱ्या टप्प्यात राणी चन्नम्मा चौक ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि तिसऱ्या टप्प्यात थर्ड रेल्वे गेटपर्यंत पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. ६ जानेवारीच्या बैठकीत सर्वांचे मत विचारात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील तुरमुरी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योग्य जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे शास्त्रीय पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत स्मार्ट सिटी, बुडा आणि हेस्कॉम विभागातील प्रलंबित विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेली कामे संबंधित विभागांकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी डॉ. भानुदास प्रकाश उपस्थित होते.

The post बेळगावातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ६ जानेवारीला बैठक appeared first on News 24 Tass Marathi.