flight service Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव – दिल्ली इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून दररोज
आठवड्यातील तीन दिवसांची सेवा आता सातही दिवस

बेंगळुरू – बेळगाव सकाळची सेवाही दररोज

बेळगाव : बेळगाव-दिल्ली मार्गावरील ‘इंडिगो’ची विमानसेवा येत्या १ ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस सुरू होणार आहे. यापूर्वी ही सेवा आठवड्यातील केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली होती. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, डॉक्टर तसेच दिल्लीला प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांची भेट घेऊन सेवा दररोज सुरू करण्याची मागणी केली होती.

खासदार शेट्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने यापूर्वी दिल्ली-बेळगाव मार्गावर दररोज विमानसेवा सुरू ठेवली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातील तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती.

याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी करण्यासोबतच इंडिगोच्या अधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात आले होते. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून दिल्लीहून दररोज सकाळी ६.१५ वाजता विमान सुटून सकाळी ८.४० वाजता बेळगावात पोहोचेल, तर बेळगावहून सकाळी ९.१० वाजता विमान सुटून सकाळी ११.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.

दरम्यान, बेंगळुरू – बेळगाव मार्गावरील सकाळची विमानसेवाही १ ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस सुरू होणार आहे. सध्या ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार, अशी चार दिवस सुरू आहे. तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारची संध्याकाळची सेवा कायम राहणार आहे. आगामी काळात ही संध्याकाळची सेवाही दररोज सुरू करण्याबाबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले.

The post बेळगाव – दिल्ली इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून दररोज appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – मुंबई विमानसेवेला तात्पुरती स्थगिती
१७ ऑगस्टपासून उड्डाणे बंद ; २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बुकिंग उपलब्ध

स्टार एअरकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप नाही

बेळगाव : बेळगाव आणि मुंबईदरम्यान विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टार एअरची बेळगाव-मुंबई विमानसेवा १७ ऑगस्टपासून तात्पुरती बंद होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अधिकृत बुकिंग व्यवस्थेत १६ ऑगस्टपर्यंतच या मार्गावरील उड्डाणे उपलब्ध असून, १७ ऑगस्टपासून बुकिंग दिसत नाही. मात्र, २५ ऑक्टोबरपासून पुन्हा तिकिटांचे बुकिंग उपलब्ध असल्याने सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

बेळगाव विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी ही सेवा व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अचानक बुकिंग बंद झाल्याने आगामी काळात मुंबईला जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

२५ ऑक्टोबरपासून सकाळी विमानसेवा :

सध्याच्या बुकिंग वेळापत्रकानुसार, २५ ऑक्टोबरपासून बेळगावहून सकाळी ७.२० वाजता विमानाचे उड्डाण होऊन ते सकाळी ८.२५ वाजता मुंबईत पोहोचणार असल्याचे दिसत आहे. इकॉनॉमी क्लासचे प्रारंभिक भाडे सुमारे ६,४०० रुपये असल्याचे बुकिंग प्रणालीत दर्शविण्यात आले आहे.

बेळगाव – अहमदाबाद सेवेतही बदल :

स्टार एअरच्या बेळगाव-अहमदाबाद विमानसेवेच्या वेळापत्रकातही बदल झाल्याचे दिसून येत आहे. २५ ऑक्टोबरपासून बेळगावहून सकाळी ७.४५ वाजता विमान सुटून सकाळी ९.२५ वाजता अहमदाबादला पोहोचणार असल्याचे बुकिंगमध्ये नमूद आहे. मात्र, २५ ऑक्टोबरपूर्वी या मार्गावरील बुकिंग सध्या उपलब्ध नसल्याचे दिसते.

दोन महिन्यांहून अधिक काळ सेवा बंद राहणार?

सध्याच्या बुकिंग माहितीनुसार, १७ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव-मुंबई विमानसेवा उपलब्ध राहणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या काळात मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी विमानसेवा तसेच रेल्वे किंवा बसचा पर्याय निवडावा लागू शकतो.

दरम्यान, २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बुकिंग उपलब्ध असल्याने सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, सेवा तात्पुरती बंद करण्यामागचे कारण आणि २५ ऑक्टोबरपासून ती निश्चितपणे सुरू होणार आहे का, याबाबत स्टार एअरकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे अद्याप बाकी आहे.

The post बेळगाव – मुंबई विमानसेवेला तात्पुरती स्थगिती appeared first on News 24 Tass Marathi.