felicitation Archives | News 24 Tass Marathi

नूतन आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांच्या वतीने सत्कार
बेळगाव : उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप पाटील यांचा बेळगावमधील वकिलांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित सत्कार समारंभात आयजीपी संदीप पाटील यांच्या कार्यपद्धतीचा वकिलांनी गौरव केला.

सत्कार स्वीकारल्यानंतर, आयजीपी संदीप पाटील यांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यातील परस्पर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब घोरपडे, आर. पी. पाटील, एन. आर. लातूर, मारुती कामाण्णाचे, राजू हिरेमठ, विनोद पाटील, निंगाप्पा मस्ती, मोहिते, महेंद्र कांबळे, विभूतीमठ, राजेंद्र नलवडे आणि एम. बी. बोंद्रे या ज्येष्ठ वकिलांसह अनेक वकील उपस्थित होते. उपस्थित सर्व वकिलांनी नूतन आयजीपी यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

The post नूतन आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांच्या वतीने सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचा हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एस. मोरे होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केल्याने त्यांना भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते आणि सह्याद्री सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करता येते. त्याचबरोबर संस्कार, नम्रता आणि मोठ्यांप्रती आदर ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी विनायक पाटील आणि रविना बसरीमरद यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. गौरवाबद्दल प्रतिक्षा तरवाल हिने विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धेत डेन्मार्क येथे भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रविना बसरीमरद (नागपूर) हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय सह्याद्री सोसायटीचे नूतन संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांचाही यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास पांडुरंग मोरे, यल्लापा बेळगावकर, विनायक पाटील, सुरेश किणयेकर, मोणापा सुतार, अशोक कडोलकर, शिवाजी जाधव, एम. पी. मोरे, यशवंतराव मोरे, के. डी. यळ्ळूरकर, जोतिबा मोरे, रामचंद्र मोरे, यल्लापा बुरुड, वसंत हेब्बाळकर, शशिकांत गावडे, आशा बाचीकर, रेणुका मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नयन जाधव हिने यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाबुराव जाधव आणि किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी केले. या गौरव सोहळ्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर(वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत) मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. ३१ मे पर्यंत आणून द्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील  (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

The post मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

मनोरंजनातून प्रबोधन करणारी ‘व्यंगचित्रकला’ हीच सर्वात उत्क्रांत कला
ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचे प्रतिपादन

ज्येष्ठ नागरिक संघात व्याख्यान : उद्योगपती शिरीष गोगटे यांच्याहस्ते सत्कार

बेळगाव : “व्यंगचित्र ही केवळ हास्यनिर्मिती करणारी कला नसून मनोरंजनातून समाजप्रबोधन घडवणारी प्रभावी अभिव्यक्ती आहे. म्हणूनच व्यंगचित्रकला ही सर्वात उत्क्रांत कला मानली जाते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित कार्यक्रमात ‘व्यंगचित्र : एक बोलकी कला’ या विषयावरील प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते.

बेळगावातील ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित कार्यक्रमात कुंटे यांनी क्षणार्धात विविध चेहरे आणि भावरेषा साकारत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी सुचतात, त्यामागील निरीक्षणशक्ती, अभ्यास, विविध प्रकार आणि व्यंगचित्रांची प्रभावीता याचे त्यांनी अत्यंत रंजक शैलीत विवेचन केले.

यावेळी उद्योगपती शिरीष गोगटे यांनी कुंटे यांचा सत्कार करताना, “जगदीश कुंटे यांच्या कलेचा आम्हाला अभिमान वाटतो. पुण्यात त्यांचा मोठा गौरव झाला, मग बेळगावकरांनी का मागे राहायचे? समस्त बेळगावकर आणि गोगटे कुटुंबातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत,” असे सांगितले.

गणपतीची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांची फ्रेम तसेच भेटवस्तू देऊन कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनीही त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. काही सदस्यांनी पदे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

सुरेंद्र देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवराज पाटील यांनी कुंटे यांचा परिचय करून दिला. के. एल. मजुकर यांनी आभार मानले.

The post मनोरंजनातून प्रबोधन करणारी ‘व्यंगचित्रकला’ हीच सर्वात उत्क्रांत कला appeared first on News 24 Tass Marathi.

जनगणनेचे काम वेळेपूर्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा मनपा आयुक्तांकडून सत्कार
बेळगाव : शासनाने सोपवलेले महत्त्वाचे जनगणनेचे काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात महापालिकेला यश आले आहे. निर्धारित वेळेच्या सुमारे आठवडा आधी हे काम पूर्ण केल्याबद्दल मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवारी जनगणना प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

महापालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त कार्तिक एम. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. जनगणना, निवडणुका, पल्स पोलिओ मोहीम तसेच कोरोना काळात मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रशासनातील सैनिकांप्रमाणे जबाबदारी पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. हीदेखील एक प्रकारची देशसेवाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनगणना मोहिमेदरम्यान तांत्रिक अडचणी आणि कडक उन्हाचा सामना करत अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सहकार्याने अल्पावधीत काम पूर्ण केले. त्यांच्या मेहनतीमुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचे आयुक्तांनी सांगितले.

या उपक्रमात सुमारे एक हजार कर्मचारी आणि १५० मतदान कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण १२०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनगणनेचे काम पार पडले. यासाठी आठ ब्लॉक तयार करण्यात आले होते. तसेच ५० सदस्यांची स्वतंत्र तुकडी स्थापन करून सात अधिकाऱ्यांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. सात प्रभारी अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त (महसूल) डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी आयुक्तांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची योग्य नियुक्ती यामुळे हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रशासकीय विभागाचे उपआयुक्त उदयकुमार तळवार उपस्थित होते.

The post जनगणनेचे काम वेळेपूर्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा मनपा आयुक्तांकडून सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा सत्कार
पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व कला दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामधे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची देशभरातील नामवंत चित्रकारांनी आपापल्या शैलीतून रेखाटलेली चित्रे व अर्कचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सोबतच ठाकरे यांनी रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रे रसिकांना पाहायला मिळतील.

या दिनाचे औचित्य साधून काही ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यात बेळगावच्या जगदीश कुंटे यांच्या खेरीज वैजनाथ दुलंगे, श्रीनिवास प्रभुदेसाई, अवि जाधव, राजीव गायकवाड, रवींद्र बाळापुरे आणि खलील खान यांचा समावेश आहे.

याशिवाय दोन दिवसात नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने, छोट्यांसाठी कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला गेला. या दोन दिवसाच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप, कार्टून कट्टा आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.

The post जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गौरव
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर आणि बीके बांडगी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे.

बेळगाव तालुक्यातील प्रत्येक मराठी माध्यम शाळेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मे महिन्याच्या अखेरीस करण्याची योजना आहे. त्यासाठी बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूल मधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी आपले अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह दि. १६ मे पर्यंत बाळू किल्लेकर, घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी किंवा अनंत लाड, आनंद एडवर्टाइजिंग, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली बेळगाव येथे आणून द्यावेत असे आवाहन अध्यक्ष कुलदीप भेकणे व कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

The post घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गौरव appeared first on News 24 Tass Marathi.

विकास कलघटगी यांचे पोलीस विभागाकडून कौतुक
प्रशंसापत्र प्रदान

बेळगाव : बेळगावशहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे अनेकांचे योगदान असून, त्यामध्ये शिवजयंती मंडळ आणि प्रशासनात समन्वय साधणारे विकास आर. कलघटगी यांची भूमिका विशेष ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचे कौतुक करत प्रशंसापत्र प्रदान केले आहे.

२१ एप्रिल २०२६ च्या सायंकाळपासून २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात विविध ठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वय साधला.

विशेषतः स्थानिक परिस्थितीबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून विकास कलघटगी यांनी पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. पोलिस आयुक्त बोरसे यांनी कलघटगी यांना यावेळी प्रशस्तीपत्र पुस्तिका देऊन गौरव केला आहे. यापूर्वीही गणेशोत्सव काळात त्यांनी अशाच प्रकारे सहकार्य केल्याचे नमूद करत पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव (आयपीएस) यांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले आहे. तसेच पुढील काळातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

The post विकास कलघटगी यांचे पोलीस विभागाकडून कौतुक appeared first on News 24 Tass Marathi.

शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्त – उपायुक्तांचा सत्कार
बेळगाव : ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक तसेच वडगाव येथील मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शहरवासीय व नगरसेवकांतर्फे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला.

नगरसेवक रवी साळुंके व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात भेट देत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले.

त्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यंदाची तब्बल १३ तास चाललेली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने महिनाभरापासून नियोजनबद्ध बैठका घेत जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम मिरवणुकीत दिसून आला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. गेल्या १०७ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली असून यासाठी पोलीस, महानगरपालिका व इतर विभागांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले.

यावर्षी प्रथमच डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी झाल्याने मिरवणुकीत सकारात्मक बदल जाणवला. कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण मिरवणूक सुरळीत पार पडली. मंडळांना शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्तांनी कौशल्याने केले, अशी प्रतिक्रिया मनोहर हलगेकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राजू सावंत, अनंत बिर्जे, जोतिबा शहापूरकर, प्रसाद मुतगेकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

The post शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्त – उपायुक्तांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर वकिलांचा जाहीर सत्कार
बेळगाव : येळ्ळूरमध्ये ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटविल्यानंतर सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अखेर न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १२ वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढ्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांचा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रकरणात कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरमधील नागरिकांवर सात वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर सुमारे 250 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या दीर्घ लढ्यात ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील, ॲड. हेमराज बेंचण्णावर आदी वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रभावी बाजू मांडली.

या उल्लेखनीय कार्याबद्दल दुद्दापा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, राजू पावले, अजित गोरल, भोला पाखरे, सतीश कुगजी यांच्या हस्ते संबंधित वकिलांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, हा न्यायालयीन लढा उभा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव गोरल, शिवाजी कदम, उदय जाधव, सतीश कुगजी, शामल जाधव, कमळा पोटे, रमेश धामणेकर आदींनी मोलाचे योगदान दिले. सत्कार समारंभाला रमाकांत कोंडुसकर, प्रमोद पाटील, तानाजी हलगेकर, आनंद कुंडेकर, जोतीबा चौगुले, सुरज गोरल, मधु पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

The post येळ्ळूर प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर वकिलांचा जाहीर सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.