explosion Archives | News 24 Tass Marathi

बैलहोंगल येथील इनामदार साखर कारखान्यातील बॉयलर स्फोटात सात जणांचा मृत्यू
बैलहोंगल / वार्ताहर

बैलहोंगल तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी चार कामगारांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.

ही घटना बुधवारी घडली. साखर कारखान्यातील कंपार्टमेंट क्रमांक १ येथे भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे बॉयलरमधील उकळलेला काकवीचा रस कामगारांच्या अंगावर उडाल्याने आठ कामगार गंभीररीत्या भाजले.

अपघातानंतर जखमी कामगारांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालय तसेच बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी मंगळवारी दीपक मुनवल्ली (वय ३१, रा. नेसरगी, ता. बैलहोंगल), सुदर्शन बनोशी (वय २५, रा. चिक्कमुनवल्ली, ता. खानापूर) आणि अक्षय सुभाष चोपडे (वय ४८, रा. राबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट) या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दरम्यान, गुरुवारी उपचार सुरू असतानाच आणखी चार कामगारांनी प्राण सोडले. त्यामध्ये भरत बसप्पा सरवाडी (वय २७, रा. गोडचिनामलकी, ता. गोकाक), मंजुनाथ मडीवळप्पा काजगर (वय २८, रा. अरवल्ली, ता. बैलहोंगल), गुरुनाथ भीरप्पा तम्मणावर (वय ३८, रा. मारेगुडी, जि. बागलकोट) आणि मंजुनाथ गोपाल तेरादळ (वय ३१, रा. हुलिकट्टी, ता. अथणी) यांचा समावेश आहे. तर राघवेंद्र मल्लप्पा गिरियाळ (वय ३६, रा. गिलीहोसूर, ता. गोकाक) यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

केएलई रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर मृतांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. हा साखर कारखाना विक्रम इनामदार, डॉ. प्रभाकर कोरे आणि विजय मेटगुड यांच्या मालकीचा असून, कारखाना व्यवस्थापनाची निष्काळजीपणा व अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळेच हा अपघात झाल्याचे आरोप पुढे येत आहेत.

या घटनेप्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे तसेच कामगार संघटनांकडून होत आहे.

The post बैलहोंगल येथील इनामदार साखर कारखान्यातील बॉयलर स्फोटात सात जणांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट
दोन कामगारांचा जागीच मृत्यू ; आठ जण गंभीर जखमी

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात आज दुपारी भीषण बॉयलर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून आठ कामगार गंभीररीत्या होरपळले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या साखर कारखान्यात दुपारी सुमारे २ वाजता काम सुरू असताना अचानक बॉयलरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बॉयलरमधील उकळते पदार्थ कामगारांच्या अंगावर पडले आणि ते गंभीररीत्या होरपळले. या घटनेनंतर कारखाना परिसरात एकच गोंधळ उडाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमी आठ कामगारांपैकी एकाला बैलहोंगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्या सहा जखमींना ‘झिरो ट्रॅफिक’ व्यवस्थेच्या मदतीने बेळगावमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॉयलर स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेनंतर कारखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट appeared first on News 24 Tass Marathi.