Entertainement Archives | News 24 Tass Marathi

तारांगणचा कलाविष्कार कार्यक्रम शनिवारी
बेळगाव : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारे व त्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेले तारांगण, निधी कामत,नेत्रा मेणसे , डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा यांच्यावतीने कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता महात्मा फुले रोडवरील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात पारंपारिक मंगळागौर खेळ, भारुड, ओवी सादरीकरण, फॅशन शो अशा जुन्या आणि आधुनिक काळातील संस्कृतीचे दर्शन बेळगावकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमात श्री कालिका देवी मंगळागौर ग्रुप, क्रांती महिला मंडळ, योगा महिला मंडळ, सविता मंगळागौर ग्रुप, श्री धनलक्ष्मी मंगळागौर ग्रुप, स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, श्री सरस्वती इन्फोटेक आपल्या समूहातर्फे सादरीकरण करणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एमपी म्युचल फंड डिस्ट्रीब्यूटर निधी कामत, सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेणसे , साहित्यिका डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा, उद्योजिका पुनम हांगीरगेकर, दैवज्ञ मंगल कार्यालयाचे सचिव मंजुनाथ सेठ उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळवले आहे.

The post तारांगणचा कलाविष्कार कार्यक्रम शनिवारी appeared first on News 24 Tass Marathi.

अमेरिकेत गाजली ‘वाऱ्यावरची वरात’
बेळगाव : कॅलिफोर्निया येथील ‘बे एरिया’ तील प्लेझन्टन शहरात रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ‘वाऱ्यावरची वरात’ चा प्रयोग सादर करण्यात आला. येथील ‘बे फ्रेंड्स’ आयोजित आणि ‘कुंकु प्रॉडक्शन्स’ निर्मित हा नाट्याविष्कार विलो रोड वरील जय गणेश स्टुडिओमधे संपन्न झाला. मूळलेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या ‘वरातीचे’ दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले .

बेळगाव व नाशिक येथील तसेच कॅलिफोर्निया मधील, मुख्यतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी झाले होते. प्रथम भालचंद्र कुंटे यांनी बेळगावचे कवि अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर केल्या. त्यात भूगोलाच्या बाई, सौभाग्यवतीला ताप म्हणालो, पुण्याचे प्रदूषण, मिसळ चापतो तर्रीची, कंट्रोल झेड आणि कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ चे विडंबन सादर केले.

मध्यंतरानंतर ‘वाऱ्यावरची वरात’ चा बहारदार प्रयोग झाला. त्यात मंदार, वीणा, अपूर्वा, नील, भालचंद्र, महिमा, नीता, मिलिंद आणि जगदीश ही कुंटे मंडळी; निहार, स्वप्नाली आणि उर्वी हे कुलकर्णी कुटुंबीय तसेच अजित रानडे व आझाद दहिया यांनी भाग घेतला. पार्श्वसंगीत अमेय पोतदार यांचे तर निवेदन प्रणाली उबाळे यांचे होते.

प्रयोगाला बे एरिया मधील सुजाण प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षणोक्षणी प्रेक्षक हास्यकल्लोळात डूबत होते आणि सभागृह डोक्यावर घेत होते. प्रयोगाला उस्फूर्त प्रतिसाद मिळून प्रयोग हाऊसफुल्ल झाला. बे फ्रेंड्सच्या हेमाली गोंधळेकर आणि सहकारी यांनी प्रयोग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

तीन पिढ्यांचा सहभाग

मुख्यतः कुंटे व कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी होते एवढेच वैशिष्ट्य नव्हते तर या नाट्यविष्कारात एकाच वेळी तीन पिढ्यातील सदस्य सामील होते. जगदीश कुंटे यांनी पु ल देशपांडे यांची, त्यांचे चिरंजीव मंदार यांनी सूत्रधाराची तर त्याचा मुलगा नील याने पाताडे सायकल मार्ट च्या प्रतिनिधीची भूमिका साकारली होती.

The post अमेरिकेत गाजली ‘वाऱ्यावरची वरात’ appeared first on News 24 Tass Marathi.

कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध
शब्दगंध कवी मंडळातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, कवयित्री आणि रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा गद्रे यांनी केले.

काव्यवाचन सत्रात स्मिता किल्लेकर यांनी विविध विषयांवरील आपल्या निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. ‘आदिमाया’ या कवितेतून आईच्या वात्सल्याचा आणि त्यागाचा हृदयस्पर्शी आविष्कार,’आधुनिक ओवी’ मधून बदलत्या समाजाचे वास्तव, तर ‘अस्तित्व’ या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि आत्मभानाचा प्रभावी वेध त्यांनी घेतला.

‘आनंदाचा ठेवा’ या अभंगातून “ग्रंथ हेच गुरु, जीवन साकारू” असा वाचनसंस्कृतीचा संदेश त्यांनी दिला. ‘बरसान’, ‘झिम्माड पाऊस’ आणि ‘आक्रोश’ या कवितांमधून निसर्ग, शेतकरी जीवन आणि विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणाऱ्या शेतीची वेदना प्रभावीपणे मांडण्यात आली. ‘गड जेजुरी’, ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘भारूड’ या रचनांमधून भक्ती, सामाजिक वास्तव आणि विसंगतींवर भाष्य करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘माझी सखी’ या कवितेने विशेष दाद मिळवली. “एका एका अक्षरात सजते, शब्दा शब्दात रंगून जाते…” या ओळींमधून कवितेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते रसिकांच्या मनाला भावले. प्रत्येक कवितेनंतर टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर झालेल्या खुल्या कवी संमेलनात मनीषा नाडगौडा, अस्मिता आळतेकर, स्नेहल बर्डे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, रेखा गद्रे, सीमा कणबरकर, गौरी धामणेकर, अपर्णा पाटील, मधु पाटील, शुभदा खानोलकर, बसवंत शहापूरकर, प्रा. महादेव खोत, सुधाकर गावडे आणि परशराम खेमने यांनी पाऊस, निसर्ग, समाज, राष्ट्रभक्ती, स्त्रीजीवन आणि मानवी मूल्ये या विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या.

अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी स्मिता किल्लेकर यांच्या कवितांचा चिकित्सक आढावा घेत त्यांच्या कवितांमध्ये मातृत्व, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, सामाजिक भान, अध्यात्म, स्त्रीमन आणि मानवी संवेदनांचा सुंदर संगम असल्याचे सांगितले. त्यांची सहज, प्रवाही आणि थेट मनाला भिडणारी भाषा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गद्रे यांनी केले, तर सुधाकर गावडे यांनी आभार मानले.

The post कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on News 24 Tass Marathi.

अर्चना संगीत विद्यालय तर्फे उद्या “स्वर सौरभ” कार्यक्रम
बेळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तसेच स्वर्गीय श्री. रामभाऊ बिजापूरे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अर्चना संगीत विद्यालयातर्फे “स्वर-सौरभ” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयएमईआर हॉल, हिंदवाडी, बेळगाव येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय आशा भोसले यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, वर्षा ऋतुवर आधारित सुरेल गीतांचा बहार रसिकांना अनुभवता येईल. या कार्यक्रमात अर्चना संगीत विद्यालयाचे ७५ हून अधिक विद्यार्थी आपल्या सुरेल गायनातून गुरूवंदना सादर करतील.

या कार्यक्रमास श्री. अनिल चौधरी, श्री. संजीव अध्यापक, सौ. कुसुमताई कुलकर्णी, श्री. महेश इनामदार आणि श्री. पराग चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्व संगीतप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विद्यालयाच्या संचालिका सौ. अर्चना बेळगुंदी यांनी केले आहे.

The post अर्चना संगीत विद्यालय तर्फे उद्या “स्वर सौरभ” कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

अमेरिकेत ‘वाऱ्यावरची वरात’
कॅलिफोर्निया ‘बे एरिया’ तील रसिकांसाठी २ ऑगस्टला विशेष प्रयोग

हाऊसफुल्ल प्रतिसाद

बेळगाव : कॅलिफोर्निया येथील ‘बे एरिया’ तील प्लेझन्टन शहरात रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी ‘ वाऱ्यावरची वरात ‘ चा प्रयोग करण्यात येणार आहे. येथील ‘ बे फ्रेंड्स ‘आयोजित आणि’ कुंकु प्रॉडक्शन्स ‘ निर्मित हा नाट्याविष्कार विलो रोड वरील जय गणेश स्टुडिओ येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मूळ लेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या ‘वरातीचे’ दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले आहे. बेळगाव व नाशिक येथील तसेच कॅलिफोर्निया मधील, मुख्यतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी आहेत.

प्रथम भालचंद्र कुंटे हे बेळगावचे कवि अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर करणार आहेत. मध्यंतरानंतर ‘ वाऱ्यावरची वरात ‘ सादर होईल. प्रयोगाला मुक्त प्रवेश असून नाव नोंदणीद्वारे उस्फूर्त प्रतिसाद मिळून प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे.

The post अमेरिकेत ‘वाऱ्यावरची वरात’ appeared first on News 24 Tass Marathi.

कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांचा ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी
साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे ; शब्दगंध कवी मंडळ संघाचे आवाहन

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘गंध मातीचा’ हा कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती महाविद्यालय कॅम्पस, बेळगाव येथे करण्यात आले आहे.

सौ. स्मिता किल्लेकर या गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असून कविता, कथा, ललित लेख, प्रवासवर्णन आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळ, तरुण भारत, पुढारी यांसह अनेक दैनिके तसेच विविध दिवाळी अंकांत त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून, शब्दगंध कवी मंडळ संघाच्या माजी सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दिल्ली येथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या निमंत्रित व्यासपीठावर त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे. विविध काव्य, निबंध व ओवी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले असून सध्या त्या मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

या कार्यक्रमात कवयित्रींच्या संवेदनशील, जीवनस्पर्शी आणि मातीतल्या सुगंधाने नटलेल्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्यानंतर उपस्थित कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्यिक मेळाव्यास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी व सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.

The post कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांचा ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी appeared first on News 24 Tass Marathi.

कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद – डॉ. उमेश कळेकर
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कालिदास दिन साजरा

बेळगाव : “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ आहे. कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद होय. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम म्हणून कवितेचा उपयोग होत आला आहे. एखादी भावना कवीला अंतर्मुख करते, अस्वस्थ करते आणि तीच भावना शब्दरूप धारण करून कवितेच्या रूपाने जन्माला येते. कवी जसा सौंदर्याच्या विविध छटा रेखाटतो, तसाच तोन समाजातील वास्तवाचेही प्रामाणिक चित्रण करतो. कवीने सतत जागृत राहून समाजात, निसर्गात आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व व्याख्याते डॉ. उमेश कळेकर यांनी केले.

येथील शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कालिदास दिनानिमित्त आयोजित “कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म” या विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम शाहिद भगतसिंग सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते.

प्रारंभी कवी परशराम खेमाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करणारे प्रास्ताविक केले. यानंतर उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते डॉ. उमेश कळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या व्याख्यानात डॉ. कळेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया, कवीची संवेदनशीलता, अनुभवांचे कलात्मक रूपांतर आणि कवितेतील अभिव्यक्तीचे महत्त्व यांचा सखोल उहापोह केला. त्यांनी स्वतःच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. “कवितेचा गाव” या कवितेतून कवीचे कवितेशी असलेले भावबंध त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केले. “पाऊस” ही कविता आपल्या दमदार शैलीत सादर करताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. तर “इलेक्शन” या कवितेद्वारे देशातील राजकीय वास्तवावर त्यांनी मार्मिक भाष्य केले.

कवीने सतत जागृत राहून समाजात, निसर्गात आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये आणि जीवनातील सूक्ष्म अनुभव यांचे काव्यरूपांतर करण्याची क्षमता कवीने विकसित केली पाहिजे, असे सांगत त्यांनी कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म यांचा परिपूर्ण उलगडा केला.

अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्यपरंपरेचा आढावा घेत शब्दगंध कवी मंडळ संघ गेली अनेक दशके मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्यिक उपक्रमांद्वारे मराठी साहित्याचा वारसा पुढे नेणे, ही संघाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. शिवाजीदादा कागणीकर, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, प्रा. स्वरूपा इनामदार, रेखा गद्रे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, स्मिता किल्लेकर, अस्मिता अळतेकर, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई, सागर मरगाणाचे यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कनबरकर यांनी केले, तर जितेंद्र रेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

The post कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद – डॉ. उमेश कळेकर appeared first on News 24 Tass Marathi.

कवी कालिदास दिनानिमित्त डॉ. उमेश कळेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम
बेळगाव : येथील सीमाभागात मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने कवी कालिदास दिन निमित्त “कवितेचे मर्म, वर्म आणि धर्म” या विषयावरील विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते व मार्गदर्शक डॉ. उमेश कळेकर हे स्वतःच्या निवडक कवितांचे सादरीकरण करणार असून, त्या कवितांमागील आशय, काव्यदृष्टी आणि सर्जनप्रक्रियेचा उलगडा करणार आहेत. काव्यरसिकांसाठी हा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी साहित्यिक अनुभव ठरणार आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

परिचय : डॉ. उमेश दत्त कळेकर हे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय सेवा, साहित्य, संगीत आणि भारतीय संस्कृती या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘फिनिक्स’ या कवितासंग्रहासाठी त्यांना स्व. शांता शेळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, विविध साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी व अध्यक्ष म्हणून त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या प्रभावी काव्यवाचन, व्याख्यानांमुळे आणि साहित्यसेवेमुळे ते मराठी साहित्यविश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

या कार्यक्रमास मराठी रसिक, कवी, साहित्यिक तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.

The post कवी कालिदास दिनानिमित्त डॉ. उमेश कळेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांचे काव्यवाचन शनिवारी
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने राबविण्यात येत असलेल्या “कवी समजून घेताना” या उपक्रमांतर्गत शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने सातवे पुष्प म्हणून ‘स्वरूपायन’ हा ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांच्या कवितांचे काव्यवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली, बेळगाव येथे होणार आहे.

प्रा. स्वरूपा इनामदार या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या ज्येष्ठ सदस्या असून सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या साहित्य, वाचनसंस्कृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक भान, स्त्रीजीवन, नातेसंबंध आणि जीवनमूल्यांचे प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन या कार्यक्रमात होणार असून रसिकांना त्यांच्या काव्यविश्वाचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे.

काव्यवाचनानंतर उपस्थित कवींसाठी खुल्या व्यासपीठावरील कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात स्थानिक कवींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ काव्यश्रवणापुरता मर्यादित न राहता नवोदित आणि प्रस्थापित कवींमधील साहित्यिक संवादाचे व्यासपीठ ठरणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी व सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी, विद्यार्थी, वाचक आणि रसिक नागरिकांनी या साहित्यिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

The post कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांचे काव्यवाचन शनिवारी appeared first on News 24 Tass Marathi.

भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन
संगीत क्षेत्रावर शोककळा

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सुरेल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

१९५४ मध्ये पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी ६० आणि ७० च्या दशकात आपल्या अवीट गोड आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीते गायली. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ आणि ‘ना तुम हमें जानो’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी भावसंगीतातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केतकीच्या वनी येथे’, ‘पाखरा जा रे दूर देशी’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारख्या भावगीतांनी मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य असूनही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून भारतीय संगीतविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. मराठी, हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये त्यांनी शेकडो गाणी गायली.

भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुश्राव्य, अजरामर आणि भावस्पर्शी अध्याय कायमचा हरपला आहे.

The post भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.