Educational Archives | News 24 Tass Marathi

मराठीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान
शिक्षक भरतीतील अन्यायाविरोधातील लढ्याला यश

मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदांना मंजुरी

बेळगाव : कर्नाटक सरकारने प्राथमिक शाळांमधील १५ हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करताना मराठी आणि उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी पदे जाहीर न केल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेत प्रशासनाकडे निवेदने सादर करून मराठी उमेदवारांच्या हक्कासाठी आवाज उठविला.

या मागणीसाठी सीमाभागात व्यापक पाठपुरावा सुरू असतानाच खानापूरचे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांनी बेंगळुरू येथे आठ ते दहा दिवस मुक्काम करून विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. शिक्षक भरतीतील मराठी माध्यमाचा प्रश्न विधानसभेत मांडला जावा, यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

शिक्षक भरतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ कन्नड माध्यमाच्या शाळांमधील रिक्त पदांची घोषणा करण्यात आली होती. मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांमधील रिक्त जागांचा विचार करण्यात न आल्याने हा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांमध्येही शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी लावून धरली.

या सातत्यपूर्ण आंदोलनाची आणि पाठपुराव्याची दखल घेत कर्नाटक सरकारने अखेर मराठी माध्यमाच्या शाळांसाठी २०० शिक्षक पदांना मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी प्रयत्न करून शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे आणि चिटणीस अभिजित मजुकर उपस्थित होते.

मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याचा हा सन्मान आहे, अशी भावना युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

The post मराठीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकवून ठेवाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत तुरमुरी, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, बेक्किनकेरे, उचगाव, कल्लेहोळ, आतवाड, मन्नुर, गोजगा, हिंडलगा, सुळगा, गणेशपूर, विजयनगर, , तसेच बेनकनहळ्ळीआदि शाळांमध्ये हे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

तुरमुरी प्राथमिक शाळेत वितरण करताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आशिष कोचेरी यांनी सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, हे आज सिद्ध झालेले आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. युवा समितीच्या वतीने मागील नऊ वर्षे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करण्यासाठी म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते.

बाची येथील शाळेमध्ये युवा समितीचे पदाधिकारी निखिल देसाई यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली.मी यावेळी उपस्थितांच्या हस्ते मुलांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन्सिल किट, असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. उपक्रमाला समितीचे कार्यकर्ते महेंद्र जाधव, प्रताप राजुकर, निरंजन अष्टेकर, श्रीशैल मासेकर, नागेंद्र तंगणकर, महेश चौगुले, नागेश बेळगावकर, हेमंत कंग्राळकर मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका शिक्षकवर्ग शाळा सुधारणा समितीचे सदस्य, गावकरी आदी उपस्थित होते.

The post बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूर तालुक्यातील हलकर्णी, शिवाजीनगर व चिरमूरकर गल्ली प्राथमिक मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
युवा समितीचा उपक्रम

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील हलकर्णी, शिवाजीनगर आणि चिरमूरकर गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासोबतच मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी युवा समितीच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या पालकांमध्येही मातृभाषेतील शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा उपक्रमामागील उद्देश असल्याचे युवा समितीचे कार्यकर्ते श्री. पाटील, तुषार देसाई आणि मुकेश गुरव यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेचे जतन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मराठी शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच शाळांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही उपस्थितांमध्ये चर्चा झाली.

साहित्य वितरणाच्या वेळी हलकर्णी, शिवाजीनगर आणि चिरमूरकर गल्ली येथील शाळांतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरचे श्री पाटील, मुकेश गुरव, श्रीहरी पाटील, प्रज्योत पाटील, तुषार देसाई, साई माळीक, गजानन पाटील, श्रेयस हल्याळकर, चेतन हंगीरकर, सोमनाथ दोडमणी आणि रीतेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

The post खानापूर तालुक्यातील हलकर्णी, शिवाजीनगर व चिरमूरकर गल्ली प्राथमिक मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण appeared first on News 24 Tass Marathi.

शिक्षक भरतीत मराठी शिक्षक पदांचा समावेश करा
युवा समितीचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत बेळगाव विभागातील मराठी तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरती अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाकडून राज्यभरात सुमारे १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बेळगाव माध्यमिक विभागासाठी यापूर्वी ८३१ शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत आणखी २४० पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी कन्नड माध्यमातील GPT पदवीधर प्राथमिक शिक्षकांची ६५ पदे, इंग्रजी माध्यमातील ४ पदे, गणित व विज्ञान विषयासाठी कन्नड माध्यमातील ७४ पदे, जीवशास्त्रासाठी ३३, समाजशास्त्रासाठी ५३ आणि इयत्ता पहिली ते आठवीसाठी संगणक विज्ञान शिक्षकांची ११ पदे जाहीर करण्यात आली आहेत.

मात्र, या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने मराठी भाषिक समाजात नाराजी निर्माण झाली आहे. मराठीसह इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठीही आवश्यक शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश करण्यात आलेला नसल्याने स्थानिक भाषिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा समितीने केला आहे.

बेळगाव विभाग हा बहुभाषिक प्रदेश असून बेळगाव ग्रामीण भागासह खानापूर आणि निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या आहे. या भागातील अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थीसंख्या, विषयांची गरज आणि स्थानिक भाषिक परिस्थितीचा विचार करून मराठी माध्यमासाठी आवश्यक तेवढी शिक्षक पदे मंजूर करणे गरजेचे असल्याचे समितीने म्हटले आहे.

मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि मराठीप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नांमुळे शैक्षणिक वातावरण चांगले असून अनेक शाळांची पटसंख्याही समाधानकारक आहे. मात्र, आवश्यक शिक्षक उपलब्ध न झाल्यास भविष्यात शिक्षकांची कमतरता निर्माण होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच शाळांच्या पटसंख्येवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, मराठी माध्यमातून डी.एड., बी.एड. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले अनेक उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत. मराठी माध्यमासाठी पदे उपलब्ध न झाल्यास या पात्र उमेदवारांच्या रोजगाराच्या संधींवरही परिणाम होणार असल्याचे समितीने म्हटले आहे. एका बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असताना दुसऱ्या बाजूला पात्र उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे माध्यमनिहाय शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश न होणे ही गंभीर बाब असल्याचे समितीने स्पष्ट केले.

बेळगाव विभागासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८३१ शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेचा तातडीने पुनर्विचार करून १२ ऑगस्टच्या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा. तसेच मराठी आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी विद्यार्थीसंख्या व शैक्षणिक गरजेनुसार स्वतंत्र पदे मंजूर करावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

The post शिक्षक भरतीत मराठी शिक्षक पदांचा समावेश करा appeared first on News 24 Tass Marathi.

युवा समितीतर्फे कुद्रेमानी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना म. ए. युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवार (दि. ८) ऑगस्ट रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष दीपक पाटील होते.

प्रारंभी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य एम. बी. गुरव यांनी युवा समितीतर्फे सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. सीमाभागातील मराठी शाळा टिकाव्यात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दहा वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी एसडीएमसी सदस्य शिवाजी शिंदे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम गुरव, शैलेश पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

The post युवा समितीतर्फे कुद्रेमानी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप appeared first on News 24 Tass Marathi.

युवा समितीतर्फे गर्लगुंजी, सिंगीनकोप मराठी शाळांत शैक्षणिक साहित्याचे वाटप
मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

गर्लगुंजी येथील मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य हणमंत मेलगे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच एसडीएमसी सदस्य संजय पाटील आणि मऱ्यापा पाखरे यांनी मराठी शाळा टिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन होईल. त्यामुळे शाळांच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्या लक्ष्मी पाटील, मार्केटिंग सोसायटी नंदगडचे गोपाळराव पाटील, तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, एसडीएमसी सदस्य संजय पाटील, मऱ्यापा पाखरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, माउली सोसायटीचे सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कुंभार, शिवाजी कोलकार, सुरेश मेलगे, संतोष पाटील, गोकुल चौगुले यांच्यासह शाळेचे एसडीएमसी सदस्य व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

यानंतर युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सिंगीनकोप येथील मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम युवा समितीच्या माध्यमातून राबविला जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आदित्य कांबळे, शुभम कांबळे आणि श्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. पत्रकार सुहास पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरचे श्री पाटील, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, सुदेश घाडी, मुकेश गुरव, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई, तन्मय हुंदरे, श्रेयस निटूरकर आणि आकाश घाडी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

The post युवा समितीतर्फे गर्लगुंजी, सिंगीनकोप मराठी शाळांत शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगुंदी, बिजगर्णीतील शाळांमध्ये युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन, सरकारी मराठी प्राथमिक शाळा तसेच बीजगर्णी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी शाळांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे मराठी शाळांना बळकटी देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा समितीतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. दरवर्षी सुमारे ३०० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक राजू मुजावर, पुंडलिक सुतार, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, गोविंद गावडे, सुषमा सुतार, कल्याणी गावडे यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बेळगुंदी मराठी प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम कमिटीचे अध्यक्ष किरण मोटनकर होते. त्यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. नागन्नावर, सहशिक्षक श्री. बेल्लारी आणि सहशिक्षिका बेबीताई झंगरूचे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

या वेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, तसेच पदाधिकारी निखिल देसाई, युवराज सुतार, रामा अमरोळकर आणि शुभम कुन्नुरकर उपस्थित होते.

The post बेळगुंदी, बिजगर्णीतील शाळांमध्ये युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on News 24 Tass Marathi.

प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आबासाहेब दळवी
खानापूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गुरुवारी मेंढेगाळी, हत्तररवाड, हलगा, मेरडा, करजगी, नागरगाळी, कृष्णनगर आदी परिसरातील सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकणार आहे. मराठी शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून त्या आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचे माध्यम आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेत प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे. शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांशी आत्मीयता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेबद्दल आकर्षण निर्माण करावे. सीमाभागातील मराठी शाळा टिकविणे ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचे ते राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य आहे. गावागावातील नागरिकांनी मराठी शाळांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवावेत आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे. मराठी शाळा सक्षम झाल्यास भावी पिढीमध्ये मातृभाषेप्रती प्रेम, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल असे मत व्यक्त केले.

ॲड. अभिजीत सरदेसाई, राजाराम देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक साहित्य वितरण झाल्यानंतर शाळा सुधारणा कमिटी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत करून अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी शाळांबद्दल जनजागृती करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

The post प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आबासाहेब दळवी appeared first on News 24 Tass Marathi.

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून युवा समिती मराठी शाळांचे संवर्धन, पटसंख्या वाढविणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहे. “मराठी शाळा टिकल्या तरच मातृभाषा टिकेल आणि मातृभाषा टिकली तरच आपली संस्कृती जपली जाईल,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम, तसेच पदाधिकारी सुरज कुडुचकर आणि अक्षय बांबरकर यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाला शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि युवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी शाळांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

The post कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश हलगेकर यांचे निधन
बेळगाव : बेळगावच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत परिचित, सरळस्वभावी आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व तथा मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  श्री. राजेश नाथाजीराव हलगेकर (वय ५८ वर्षे) यांचे मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शिक्षणमहर्षी दिवंगत नाथाजीराव हलगेकर यांचे ते चिरंजीव आणि मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे बंधू होत.

गेली अनेक वर्षे मराठा मंडळ संस्थेत संचालक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत आणि उभारणीत अत्यंत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या जाण्याने मराठा मंडळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष आणि संस्थेचा शिलेदार अकाली गेल्यामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेसह बेळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

The post मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश हलगेकर यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.