dussehra holidays Archives | News 24 Tass Marathi

कर्नाटकातील शाळांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी जाहीर
३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान सुटी ; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू

बेंगळुरू : राज्यातील लाखो शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दसरा सुटीची घोषणा शिक्षण विभागाने केली असून यंदा विद्यार्थ्यांना सलग १९ दिवसांची सुटी मिळणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुटी लागू असणार आहे. शिक्षण विभागाच्या वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकानुसार, दसरा सुटीला ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरुवात होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी (बुधवारी) विजयादशमीच्या दिवशी सुटीचा शेवट होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.

दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग सुट्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दसरा सण साजरा करण्यासह सहलीचे नियोजन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

शैक्षणिक वेळापत्रकानुसार, दुसरे सत्र २२ ऑक्टोबर २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत असेल. त्यानंतर ११ एप्रिल २०२७ पासून उन्हाळी सुटी सुरू होणार आहे. दरम्यान स्थानिक हवामान परिस्थिती किंवा अन्य आवश्यकतेनुसार सुटीच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांना देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या या घोषणेमुळे दसरा सण आणि पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

The post कर्नाटकातील शाळांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांना १८ ऑक्टोबरपर्यंत वाढीव सुट्टी
सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारचा निर्णय

शिक्षक संघाच्या मागणीला प्रतिसाद

बेंगळूर : राज्यात सुरू असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय आणि अनुदानित शाळांना आता १८ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी देण्यात आली असून, शिक्षकांना सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. शिक्षक संघटना आणि विधान परिषद सदस्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री यांनी हा निर्णय जाहीर केला.

राज्यातील घराघरातील सर्वेक्षणाची प्रक्रिया २ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये काम अपेक्षित गतीने न झाल्याने मुदतवाढ आवश्यक ठरली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत कोप्पल जिल्ह्यात ९७ टक्के तर दक्षिण कन्नडमध्ये केवळ ६७ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या सुमारे १ लाख ६० हजार कर्मचारी या मोहिमेत सहभागी असून, त्यापैकी १ लाख २० हजार शिक्षक कार्यरत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आणखी आठ दिवस सर्वेक्षणासाठी देण्यात आले आहेत. याचबरोबर, १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या द्वितीय पीयूसी परीक्षांमुळे संबंधित प्राध्यापकांना सर्वेक्षणातून वगळण्यात आले आहे. आता हे प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करतील.

दरम्यान, सर्वेक्षणाच्या कामात गुंतलेल्या तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा परिहार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. तसेच, जाणूनबुजून टाळाटाळ करणाऱ्या किंवा कामात हलगर्जी दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. जीबीए परिसरात निवडणुकीमुळे सर्वेक्षणात विलंब झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

The post राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांना १८ ऑक्टोबरपर्यंत वाढीव सुट्टी appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटकातील शालेय दसरा सुट्टीचे वेळापत्रक जाहीर
दि. २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व शाळांना दसऱ्याची सुट्टी

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य शिक्षण विभागाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी दसऱ्याच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांना २० सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुट्टी राहणार आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकूण १८ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शिक्षण विभागाने सांगितले की, शैक्षणिक वर्ष सुरू होताना नेहमीप्रमाणेच उपक्रम आणि सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक निश्चित करून सर्व शाळांना कळवले गेले होते.

घोषणेनुसार, दसऱ्याच्या सुट्ट्या २० सप्टेंबरपासून सुरू होऊन ७ ऑक्टोबरपर्यंत चालतील. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून शाळांचा दुसरा शैक्षणिक टप्पा सुरु होईल आणि तो १० एप्रिल २०२६ पर्यंत राहणार आहे.सुट्टींचे हे वेळापत्रक आधीच सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यात आले असल्याचेही शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.

The post कर्नाटकातील शालेय दसरा सुट्टीचे वेळापत्रक जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.