drown Archives | News 24 Tass Marathi

कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
कक्केरी परिसरात हळहळ ; शेतातील काम करताना पाय घसरला

कुटुंबावर आर्थिक संकट

कक्केरी :  येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शेतातील काम सुरू असताना पाय घसरून ते पाण्यात पडल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. कृषी तलावाच्या परिसरात वाढलेले गवत आणि कचरा साफ करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते तलावात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मल्लय्या हिरेमठ यांच्या पश्चात पत्नी भारती (वय ४५), बी.एस्सी. नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी मुलगी ऐश्वर्या (वय २०) आणि डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा मुलगा अक्षय (वय १७) असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या नावावर सरकारी बँक तसेच कृषी पतसंस्थेचे लाखो रुपयांचे पीककर्ज असल्याने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

योगायोगाने ही घटना ‘शेतकरी हुतात्मा दिना’च्या दिवशीच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते यल्लप्पा गुपीत, रमेश वीरापूर, अश्पाक अहमद पटेल, महांतय्या हिरेमठ, चेन्नवीरय्या हिरेमठ, अलेक्झांडर डिसोजा, मारुती पाटील, यल्लेशी कुंभारकोप, शिवाजी अंबडगट्टी आणि यल्लप्पा चन्नापूर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

The post कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

गोकाकमध्ये पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश
सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाची संयुक्त मोहीम

गोकाक : गोकाक परिसरात सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव येथील सोशल वर्कर रेस्क्यू टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि गोकाक अग्निशमन दलाने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेत मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.

घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा सोशल वर्कर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह समन्वय साधत शोधकार्य सुरू करण्यात आले. अंधार, पाण्याचा वेग आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही सर्व यंत्रणांनी अथक प्रयत्न करत युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

या बचाव मोहिमेत सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, निलेश हिरेहोळी आणि मायकेल पिंटो यांनी धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. त्यांच्या कार्याचे स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही कौतुक केले.

या दुर्दैवी घटनेनंतर बचाव पथकाने नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात जलाशय परिसरात विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धबधबे, नद्या, तलाव किंवा इतर पाणवठ्यांच्या परिसरात अनावश्यक धाडस टाळावे, पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज नसल्यास पाण्यात उतरू नये तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post गोकाकमध्ये पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश appeared first on News 24 Tass Marathi.

सुरल (सुर्ल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह सापडला
बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश

खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुरल (सुर्ल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र बेळगावच्या रेस्क्यू पथकाने स्थानिक यंत्रणांच्या मदतीने राबविलेल्या अथक शोधमोहीमेला अखेर यश मिळाले.

मृत तरुणाची ओळख आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) अशी झाली आहे. तो मित्रांसमवेत सहलीसाठी सुरल धबधब्यावर गेला होता. म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यात पाण्यात उतरल्यावर खोली आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे रात्री शोधकार्य स्थगित करण्यात आले.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि रेस्क्यू पथकातील अवधूत तुडवेकर, पदमप्रसाद हुली, विक्की मेहता, शुभम हुली, मायकल पिंटो, रोशन तनावडे आणि आकाश यांनी स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने अथक प्रयत्न करत अखेर आदित्यचा मृतदेह बाहेर काढला. अनेक तास पाण्यात राहिल्यामुळे तसेच माशांमुळे मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे बेळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. आदित्यच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे.

The post सुरल (सुर्ल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह सापडला appeared first on News 24 Tass Marathi.

सुरल धबधब्यात बेळगावातील तरुण बुडाला
मुसळधार पावसामुळे शोधमोहीमेत अडथळे

आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू

खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २८ जून) घडली. आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मित्रांसमवेत सहलीसाठी गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या आदित्यला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत धबधब्याच्या कोंडीत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र घाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे निर्माण झाल्याने रात्री शोधमोहीम स्थगित करण्यात आली.

आज, सोमवार (दि. २९ जून) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असून बचाव पथके तरुणाचा शोध घेत आहेत. आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पावसाळ्यात म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यांवर बेळगाव, खानापूर आणि गोवा परिसरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन विभागाने वारंवार इशारे देऊनही काही पर्यटक धोकादायक ठिकाणी प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

The post सुरल धबधब्यात बेळगावातील तरुण बुडाला appeared first on News 24 Tass Marathi.

पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना ; परिसरात हळहळ

मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी घडली. एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोघे भाऊ गावाजवळील ओढ्याकडे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी धाकटा भाऊ पाण्यात उतरला असता तो अचानक बुडू लागला.

भावाला संकटात पाहून मोठ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाले. काही वेळातच दोघेही पाण्याखाली गेल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

The post पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

भटकळ समुद्रकिनारी एकाच कुटुंबातील आठ जणांना जलसमाधी
शिंपले काढताना बुडून मृत्यू

सात महिलांचा समावेश ; तिघे बेपत्ता

कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तट्टेहक्कल समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले गोळा करत असताना अचानक समुद्राच्या पाण्याचा वेग वाढल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.

मृतांमध्ये सात महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून तिघेजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर कापेचिप्पू शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक समुद्राच्या लाटा उंचावल्याने काही जण खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर सदस्यही पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने आठ जणांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या दुर्घटनेबद्दल उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

The post भटकळ समुद्रकिनारी एकाच कुटुंबातील आठ जणांना जलसमाधी appeared first on News 24 Tass Marathi.

दगडखाणीत बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
अथणी परिसरातील घटना

अथणी : शहराबाहेरील सुनगार भाटीजवळील दगडखाणीत पोहताना १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. समर्थ पानलकर असे मृत मुलाचे नाव असून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ आपल्या मित्रांसह दगडखाणीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

शोधमोहीमेदरम्यान घटनास्थळी समर्थची चप्पल आणि कपडे आढळून आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोधकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून समर्थच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची नोंद अथणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

The post दगडखाणीत बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील विहिरीत रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून पोहत असलेल्या मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोन्ही मुले पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत मुलांची ओळख शिवम परशुराम सुंडीकर (वय ७) आणि परशुराम राजू निलजकर (वय ११) अशी झाली असून दोघेही शिवाजीनगर व शहापूर येथील जेड गल्ली परिसरातील रहिवासी होते. सुट्टीचा दिवस असल्याने दोघे पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा आक्रोश पाहून वातावरण भारावून गेले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून विहिरीतील पाण्यात कॅमेरे टाकून तपास केला जात आहे. तसेच पाणी उपसण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खडेबाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारी धरणात बुडालेल्या तरुण दंतवैद्याचा मृतदेह सापडला
चंदगड : तिलारी धरण परिसरात पाण्यात बुडालेल्या युवा दंतवैद्याचा मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सापडला. विविध यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

आझमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये व्यवसायाने दंतवैद्य असलेले डॉ. मोहम्मद शेहजान (वय २६) हे पोहण्यासाठी अडक्याचा वझर परिसरात पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी संध्याकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.

रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एसडीआरएफ पथक, बेळगाव ग्रामीण पोलीस, वन विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, मुदस्सर तरनीकर, राजू टक्केकर यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. अखेर समन्वित कारवाईतून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

The post तिलारी धरणात बुडालेल्या तरुण दंतवैद्याचा मृतदेह सापडला appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचा तरुण ‘तिलारी’ धरणात बुडाला
चंदगड : बेळगाव शहरातील शाहूनगरच्या एका तरुणाचा तिलारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय २६) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद अमीरशा हा दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मित्रांसमवेत तिलारी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो धरणात पोहण्यासाठी उतरला असता अचानक बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम राबवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

The post बेळगावचा तरुण ‘तिलारी’ धरणात बुडाला appeared first on News 24 Tass Marathi.