Diwali Archives | News 24 Tass Marathi

दिपावली २०२५ : भाऊबीज – यमद्वितीया जाणून घ्या कथा आणि महत्त्व !
भाऊबीज : दिपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

भाऊबीजेची कथा :

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात, यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

यमद्वितीयेचे महत्त्व :

या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असे केल्यास अपमृत्यु येत नाही, अशी मान्यता आहे.

भाऊबीजेचे महत्त्व :

भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

अशी साजरी करतात भाऊबीज :

कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. जेवणात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : भाऊबीज – यमद्वितीया जाणून घ्या कथा आणि महत्त्व ! appeared first on News 24 Tass Marathi.

पाडव्यानिमित्त म्हशी पळवण्याचा सोहळा साजरा
बेळगाव / प्रतिनिधी

दीपावली पाडव्या निमित्त गवळी बांधवांचा हा दिवस फार उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरामधून म्हशी पळवण्याचा सोहळा रंगला होता. विविध गवळी बांधव शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार जनावरांना सजवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. काही प्रमुख गल्ल्यांमध्ये म्हशी पळवून हा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः गवळी बांधवांनी शहराच्या मध्यवर्ती भागात चव्हाट गल्ली येथे आयोजित केलेली शर्यत बघण्यासाठी युवावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post पाडव्यानिमित्त म्हशी पळवण्याचा सोहळा साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

दिपावली २०२५ : बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस ,जाणून घ्या कथा आणि महत्त्व !
बलिप्रतिपदा : अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. याच निमित्ताने जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे महत्त्व…

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

बळीचे राज्य येवो

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.

व्यापारी वर्गाचे नववर्ष

अश्विन अमावास्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस ,जाणून घ्या कथा आणि महत्त्व ! appeared first on News 24 Tass Marathi.

दिपावली २०२५ : लक्ष्मीपूजन, जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त !
लक्ष्मीपूजन : भारतीय संस्कृतीत दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

लक्ष्मीपूजन मुहूर्त :

भारतीय पंचागात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. अमावस्येच्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. यंदा अमावस्या २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सुरू झाली असून २१ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी संपणार आहे. लक्ष्मी पूजनासाठी सर्वात शुभ वेळ प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) आणि वृषभ काल (स्थिर लक्ष्मीचा काळ) मानला जातो.  उद्या  मंगळवार दि.  २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३२ वाजल्यापासून ते रात्री ८.१६ वाजेपर्यंत (वेळेत स्थानिक पंचांगानुसार थोडा बदल असू शकतो) हा पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त आहे. याच काळात विधिवत पूजा केल्यास लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होते.

लक्ष्मीपूजा मंत्र खालीलप्रमाणे :

लक्ष्मीपूजा मंत्र : ‘नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।’

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे. लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : लक्ष्मीपूजन, जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त ! appeared first on News 24 Tass Marathi.

दिवाळी : नरकचतुर्दशी जाणून घ्या, अभ्यंगस्नानाचे महत्त्व !
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत कायम पाळली जाते ती म्हणजे अभ्यंगस्नान. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दरम्यान आज दि. ३१ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी निमित्त जाणून घेऊया अभ्यंगस्नानाचे महत्त्व…

अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केले जाते. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी 7 च्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात.

काय आहे आख्यायिका?

नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.

शरीराला उटणे लावण्याचे वैद्यकीय महत्त्व :

शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात. तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते. अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद,मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक – प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिवाळी : नरकचतुर्दशी जाणून घ्या, अभ्यंगस्नानाचे महत्त्व ! appeared first on News 24 Tass Marathi.

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी
सणासुदीच्या खरेदीने व्यापाऱ्यांमध्ये समाधान

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील मुख्य बाजारपेठ असलेल्या बेळगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेड्यांची एकमेव बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव बाजारपेठेत आता दिवाळीच्या खरेदीची गर्दी वाढू लागली आहे.

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाला यंदा शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसने प्रारंभ झाला आहे. आज शनिवारी आठवडी बाजारा दिवशी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मारुती गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली या भागात नागरिकांची गर्दी होती. दरम्यान महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाले होते.

आकाश कंदील, लायटिंगच्या माळा, फराळ, फराळाचे साहित्य, उटणे, मिठाई इ. मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी सणाचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवशी नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी आतापासूनच शोरूममध्ये ग्राहकांची बुकिंगसाठी गर्दी होती. याशिवाय सोन्याच्या दरात वाढ होऊनही सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफी पेढ्याही ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. दिवाळी नंतर लागलीच लग्नसराईला सुरुवात होते यानिमित्ताने दिवाळीचे औचित्य साधून नवीन कपडे खरेदीलाही नागरिकांनी प्राधान्य दिले.

साड्या आणि तयार कपड्यांच्या बाजारपेठांनी अलीकडे चांगलाच लौकिक मिळवला आहे. विविध ठिकाणाहून आलेल्या कापडाची खरेदी करण्यासाठी बेळगाव सह आसपासच्या परिसरातून नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत. परिणामी बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याने विक्रेत्यांमध्ये समाधान आहे. तसेच उद्या रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेतील खरेदीमुळे मोठी उलाढाल होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

The post दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी appeared first on News 24 Tass Marathi.

दिपावली २०२५ : जाणून घ्या धनत्रयोदशीचे महत्व आणि पूजेची पध्दत !
धनत्रयोदशी : वर्षभरातील महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणून दिवाळी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होऊन नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण एकामागे एक येतात. त्यामध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व राज्यभरात दिले जाते. या दिवशी सोने खरेदी केले जाते. धनलक्ष्मीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनतेरस आणि धनत्रयोदशी या दिवशी व्यापारी, सराफ आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या सणाला महत्त्व देतात.

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी आणि इतर कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत शस्त्रांची अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांची म्हणजेच चोपडी असे बोलल्या जाणाऱ्या वहीची या दिवशी पूजा केली जाते.

व्यापारी आणि शेतकरी वर्गात धनत्रयोदशीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मिठाई आणि गोडधोड पदार्थ तयार करून त्याचे वाटप करून आनंदाने दिवळी साजरी केली जाते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवताची आणि धन-धान्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले धान्यच हे संपत्ती तसेच लक्ष्मी प्रमाणे असल्याने शेतकरी वर्ग त्या धान्यांची पूजा करून धने, गुळ, खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसांपासून सर्वत्र पणत्या आणि विद्यूत रोषनाईने घराबाहेरचा परिसर उजळवण्यात येतो.

अशी करा धनत्रयोदशीची पूजा :

धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घ्या. त्यावर स्वस्तिक काढून त्यावर दिवा लावा. दिव्याला हळद – कुंक आणि तांदुळ लावून त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची पूजा करून नमस्कार करावा.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक – प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : जाणून घ्या धनत्रयोदशीचे महत्व आणि पूजेची पध्दत ! appeared first on News 24 Tass Marathi.

दिपावली २०२५ : जाणून घ्या धन्वंतरी दिवस आणि आयुर्वेदाचे महत्त्व !
धनत्रयोदशी : आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. असे म्हटले जाते की, आयुर्वेदात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार शक्य आहेत. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची जयंती धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी पृथ्वीवर येण्यापूर्वी आयुर्वेद गुप्त अवस्थेत होता. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भाग करून सर्व रोगांवर औषधोपचाराची पद्धत विकसित केली अशी अख्यायिका आहे.

धन्वंतरी कोण होते आणि धनत्रयोदशीला त्यांची पूजा का केली जाते?

आयुर्वेदाचे संस्थापक आणि वैद्यकीय शास्त्राचे देवता भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय आणि तेज यांची देवता आहेत. आरोग्यदेव धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या धन्वंतरीचा समुद्रमंथनाच्या वेळी पृथ्वीवर अवतार झाला होता. शरद पौर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला काली माता आणि अमावस्येला भगवती लक्ष्मी समुद्रातून अवतरली. दीपावलीच्या दोन दिवस अगोदर कार्तिक त्रयोदशी दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मानवी समाजाला दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

प्राचीन शास्त्रानुसार देवांचे वैद्य धन्वंतरी यांना चार हात आहेत. शंख आणि चक्र दोन्ही हातांच्या वरच्या भागात धरलेले असतात. इतर दोन भुजांपैकी एका हातात औषधी आणि दुसर्‍या हातात अमृत कलश आहेत. त्यांचा आवडता धातू पितळ मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीला पितळेसह अष्टधातूची भांडी खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. असे म्हटले जाते की धन्वंतरी हे आरोग्याची देवता, आयुर्वेदावर उपचार करणारे वैद्य होते. त्यांनी औषधांचा शोध लावला.

रामायण, महाभारत, विष्णु पुराण, अग्नि पुराण, श्रीमद भागवत महापुराण इत्यादी पुराण आणि अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरीचा उल्लेख आयुर्वेदाच्या संदर्भात उपलब्ध आहे. आयुर्वेद, सुश्रुत्र संहिता, चरक संहिता, कश्यप संहिता आणि अष्टांग हृदय या प्राचीन ग्रंथांमध्ये धन्वंतरीचा उल्लेख विविध रूपात आढळतो. याशिवाय इतर आयुर्वेदिक ग्रंथ, भाव प्रकाश, शारगधर आणि त्यांच्या समकालीन इतर ग्रंथांमध्येही धन्वंतरीचा संदर्भ आयुर्वेदाच्या उद्धृत संदर्भांमध्ये ठळकपणे आला आहे.

गरुड आणि मार्कंडेय पुराणानुसार त्यांना वैद्य म्हटले गेले. कारण ते वेदांनी ऊर्जावान होते. विष्णु पुराणात असे म्हटले आहे की, धन्वंतरी हे धृष्ट आणि धन्वंतरी यांचा पुत्र आहे. शरीर आणि इंद्रिये किरकोळ विकारांपासून मुक्त आहे आणि सर्व जन्मात सर्व शास्त्रांचा जाणकार आहे. भगवान नारायणांनी त्यांना पूर्वजन्मात हे वरदान दिले होते की काशीराजाच्या वंशात जन्म घेऊन तू आयुर्वेदाचे आठ भाग करशील व यज्ञ भागाचा उपभोग घेशील. अशा रीतीने धन्वंतरीचा उल्लेख तीन रूपांत आढळतो.

समुद्रमंथनातून प्रथम जन्मलेला धन्वंतरी, धन्वाचा मुलगा धन्वंतरी दुसरा आणि काशीराज दिवोदास धन्वंतरी तिसरा. महाभारत आणि पुराणात त्यांचा उल्लेख विष्णूचा भाग म्हणून आढळतो. समुद्रमंथनानंतर धन्वंतरी कलशातून अंड्याच्या रूपात प्रकट झाले. समुद्रातून बाहेर येताच त्यांनी भगवान विष्णूंना माझे स्थान आणि जगातील भाग निश्चित करण्यास सांगितले. यावर विष्णू म्हणाले की, देवतांमध्ये यज्ञ विभाग पूर्वीच झाला आहे, त्यामुळे आता ते शक्य नाही. तुम्ही देव नाही कारण तुम्ही देवांच्या मागे आला आहात. म्हणून पुढच्या जन्मात जेव्हा तुम्हाला सिद्धी मिळेल आणि तुम्ही जगात प्रसिद्ध व्हाल. त्या देहातून तुला देवत्व प्राप्त होईल आणि दोन्ही जाती तुझी सर्व प्रकारे पूजा करतील. तुम्ही आयुर्वेदाचा अष्टांग विभागही कराल. तुम्ही पुन्हा दुसऱ्या द्वापर युगात आहात. त्याचा जन्म होईल यात शंका नाही. या वरदानानुसार काशीराज धनवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन अब्जा देवाने त्याचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि धन्वंतरी हे नाव धारण केले. धन्वा हा काशी शहराचा संस्थापक काशचा पुत्र होते. सर्व रोग बरे करण्यात ते निष्णात होते. त्यांनी भारद्वाज यांच्याकडून आयुर्वेद घेतले आणि अष्टांगात विभागले व ते आपल्या शिष्यांमध्ये वाटले.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक – प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : जाणून घ्या धन्वंतरी दिवस आणि आयुर्वेदाचे महत्त्व ! appeared first on News 24 Tass Marathi.

साई कॉलनी सुळगा (हिं.) येथे वसुबारस निमित्त गाईची पूजा
शेतकरी कुटुंबीयांनी जपली परंपरा

सुळगा (हिं.) / वार्ताहर

हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस सणाने होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात वसुबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने वसुबारस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत अजूनही जोपासली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने साईकॉलनी सुळगा (हिं.) येथील सासू – सून ग्रुपच्या महिलांनी गाईची विधिवत पूजा करून तिला नैवेद्य दिला.

यावेळी प्रगतीशील शेतकरी ह. भ. प. श्री. बाळू शंकर कलखांबकर यांच्यासह सासू – सून ग्रुपच्या महिला सौ. विमल गुरूनाथ कलखांबकर, सौ. रेणुका मल्लाप्पा कलखांबकर, सौ. रमा परशराम पाटील, सौ. स्मिता बाळासाहेब पाटील, सौ. लक्ष्मी भरमा पाटील, सौ. श्वेता परशराम कदम, सौ. वनिता मल्लाप्पा कदम, सौ. रेखा अजित कलखांबकर, सौ. लक्ष्मी शिवाजी कलखांबकर उपस्थित होत्या.

The post साई कॉलनी सुळगा (हिं.) येथे वसुबारस निमित्त गाईची पूजा appeared first on News 24 Tass Marathi.

दीपावलीसाठी बेळगाव मार्गे म्हैसूर–जयपूर विशेष रेल्वे सेवेला प्रारंभ
बेळगाव / प्रतिनिधी

दीपावली सणादरम्यान प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने म्हैसूर–जयपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बेळगावसह महाराष्ट्र व गुजरातमधील प्रमुख स्थानकांवर थांबा असेल.

गाडी क्रमांक ०६२३१ म्हैसूर–जयपूर एक्सप्रेस स्पेशल ही विशेष गाडी १८ व २५ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हैसूरहून रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि सोमवारी सायं. ६:४० वाजता जयपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०६२३२ जयपूर–म्हैसूर एक्सप्रेस स्पेशल परतीच्या दिशेने ही गाडी २१ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूरहून पहाटे ४:०० वाजता सुटेल व गुरुवारी पहाटे ३:३० वाजता म्हैसूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे: मंड्या, केएसआर बेंगळुरू, तुमकुरू, अर्सिकेरे, कदूर, दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, वलसाड, सुरत, अहमदाबाद, बडोदा, मारवाड, अजमेर आणि किशनगड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

मात्र, या सेवेदरम्यान गाडी क्रमांक ०६२३१ जयपूरकडे जाताना साबरमती बीजी थांबा वगळेल, तर गाडी क्रमांक ०६२३२ म्हैसूरकडे परतताना अहमदाबाद थांबा वगळला जाईल.या विशेष गाडीमध्ये २ एसी टू-टायर, १२ एसी थ्री-टायर, २ स्लीपर क्लास तसेच २ लगेज-कम-ब्रेक व्हॅनसह एकूण १८ डबे असतील.

The post दीपावलीसाठी बेळगाव मार्गे म्हैसूर–जयपूर विशेष रेल्वे सेवेला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.