district administration Archives | News 24 Tass Marathi

सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन

बेळगाव : रेशन दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी आज मोर्चा काढून सर्व्हर डाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच रेशन दुकानांवरील सर्व्हर समस्या गंभीर बनली असून, सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. त्यामुळे अनेक गरीब नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांसमोर रांगेत थांबावे लागत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के तांदळाचे वाटप झाले असून उर्वरित ६० टक्के वितरण अद्याप बाकी आहे. अशातच अन्न नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीकडून दोनदा अंगठ्याचा ठसा घेण्याचा नियम लागू केल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनल्याचा आरोप करण्यात आला.

“एकदाच अंगठ्याचा ठसा उमटवताना अडचणी येत असताना दोनदा ठसा घेण्याची सक्ती अन्यायकारक आहे. पुढील महिन्यापासून केवळ एकदाच ठसा घेण्याची परवानगी द्यावी आणि सर्व्हरची समस्या कायमची सोडवावी,” अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी राजशेखर तळवार यांनी केली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांचे निवेदन स्वीकारून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दुकानदार सहभागी झाले होते.

The post सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

‘संडे मार्केट’ वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक
व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने

बेळगाव : एपीएमसी परिसरातील संडे मार्केटमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. खासगी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि एपीएमसीतील गाळे वाटपाच्या मुद्द्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, जय किसान प्रायव्हेट मार्केटने एपीएमसी परिसरात उपबाजार सुरू करण्याबाबत अधिकृत प्रस्ताव दिल्यास तो सरकारकडे पाठवला जाईल. अन्यथा एपीएमसीमधील उपलब्ध गाळ्यांचे वाटप करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संडे मार्केटमधील खासगी व्यापाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, नियमानुसार गाळ्यांचे वाटप झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

यावेळी खासगी बाजाराचे प्रतिनिधी अब्दुल करीम बागवान यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. खासगी बाजाराचे परवाने रद्द झाल्यापासून अनेक व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगत व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

व्यापाऱ्यांनी कायदेशीर चौकटीत खासगी जय किसान बाजार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच या बाजारावर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एपीएमसी परिसरात सुमारे ७० ते ८० दुकाने रिक्त असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी ही दुकाने कार्यान्वित करावीत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडून कोणतीही तक्रार नसताना काही एपीएमसी व्यापाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांवर बाजार व्यवस्थेवर अवलंबून राहण्याचा आरोपही केला.

बैठकीला आसिफ सेठ, मोहम्मद रोशन, राहुल शिंदे, भूषण बोरसे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी मोहन मन्नोळकर आणि मुज्जम्मिल डोणी उपस्थित होते.

The post ‘संडे मार्केट’ वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

शिवम असोसिएट्सच्या कार्यालयावर छापा
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

विविध योजनांच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा संशय

बेळगाव : विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे जमा केल्याच्या आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने शिवम असोसिएट्स प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित कार्यालयावर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक ठेवीदार हित संरक्षण कायदा २००४ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, नागरिकांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून निधी गोळा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. १३ मे रोजी पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालात आर्थिक व्यवहारांबाबत काही अनियमिततेचे मुद्दे नमूद करण्यात आले होते. तसेच छापील, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामधील जाहिराती प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांना विविध ठेव योजना, आर्थिक व्यवहार, बँक खाती, मालमत्ता, करारपत्रे आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासोबतच शोधमोहीम राबविणे, आवश्यक कागदपत्रे जप्त करणे, बँक खाती गोठविणे तसेच गरज भासल्यास मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही तपास पथकाला देण्यात आले आहेत. तपासासाठी पोलीस आणि तांत्रिक यंत्रणांची मदत घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

नागरिकांना निश्चित परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते का, ठेवीदारांना रक्कम परत करण्यात आली आहे का आणि संबंधित उपक्रम जनहिताला बाधक ठरत आहेत का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल 24 तासांत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील कारवाईबाबत शिफारसी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांसह सर्व संबंधित विभागांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

The post शिवम असोसिएट्सच्या कार्यालयावर छापा appeared first on News 24 Tass Marathi.

ह्यूम पार्क येथे ‘आंबा महोत्सवाला’ प्रारंभ
शेतकऱ्यांकडून थेट सेंद्रिय आंबा खरेदीची सुविधा

२४ स्टॉल्सवर विविध जातींच्या आंब्यांची विक्री

बेळगाव : शहरात आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय आंबा महोत्सवात विविध जातींच्या सेंद्रिय आंब्यांची रेलचेल पाहायला मिळत असून, ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि फलोत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा हमी योजना समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आयजीपी चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

मेळाव्यात बेळगाव, धारवाड, देवगड आणि कोल्हापूर येथील आंबा उत्पादकांनी २४ स्टॉल्स उभारले असून, विविध प्रकारचे सेंद्रिय आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून आंबे खरेदी करता येत असल्याने या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. मागणी वाढल्यास मेळाव्याचा कालावधी वाढवण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संतीबस्तवाड येथील आंबा उत्पादक राईफ बागवान यांनी आपल्या बागेतील विविध प्रकारच्या आंब्यांची माहिती देत हे आंबे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात असल्याचे सांगितले. ३५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत विविध दरांमध्ये आंब्यांची विक्री सुरू आहे.

खानापूर तालुक्यातील उत्पादक राजेश सावलेकर यांनी विशेष पद्धतीने आंब्यांचे संवर्धन आणि पिकवणी केली जात असल्याचे सांगितले. या आंब्यांना देशासह परदेशातूनही मागणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळाव्यात ग्राहकांनी विविध प्रकारच्या आंब्यांची खरेदी करत उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

The post ह्यूम पार्क येथे ‘आंबा महोत्सवाला’ प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा
राणी चन्नम्मा चौकात जिल्हा प्रशासनाकडून सावलीची सोय

बेळगाव : सिग्नलवर उभे राहून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राणी चन्नम्मा चौकात उभारलेले ‘कुलिंग शेड’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्येही नागरिकांना थोडासा थंडावा देणारा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त आय. ए. कार्तिक यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाअंतर्गत सिग्नलजवळ हिरव्या नेटची सावली निर्माण करण्यात आली आहे. सिग्नलची वाट पाहणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी ही सोय विशेषतः उपयुक्त ठरत असून, उन्हाचा थेट तडाखा कमी करण्यास मदत होत आहे.

महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेले हे शेड विजापूरमधील प्रयोगाच्या धर्तीवर उभे करण्यात आले आहे. लहानसा वाटणारा हा उपाय प्रत्यक्षात मोठा दिलासा देणारा ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

या ‘कुलिंग शेड’मुळे सिग्नलवर उभे राहण्याचा अनुभव काहीसा सुसह्य झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सुविधा शहरातील इतर चौकांमध्येही सुरू कराव्यात, अशी मागणी व्यक्त केली आहे.

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन राबवलेला हा उपक्रम प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे. भविष्यात अशा आणखी उपाययोजना राबवून शहरवासीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा appeared first on News 24 Tass Marathi.

एलपीजी गॅस टंचाईवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
बेळगाव : शहरातील रिक्षाचालकांना काही दिवसांपासून भेडसावणारी एलपीजी गॅसची टंचाई लवकरच दूर होणार आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या शहरात ७ सीएनजी पंपांवर पुरवठा सुरळीत चालू आहे, मात्र ६ एलपीजी पंपांपैकी काही खासगी पंपांवर पुरवठ्याची तात्पुरती अडचण जाणवत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मल्लिकार्जुन कलादगी यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच संबंधित घटकांची बैठक घेऊन ही अडचण दूर करतील.

व्यावसायिक वापराच्या एलपीजीबाबत रोज सुमारे ७०० सिलिंडर पुरवठा केला जात आहे. लहान व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हॉटेल असोसिएशनशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था केली असल्यामुळे सध्या मोठी समस्या उद्भवत नाही, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाच्या या तातडीच्या पावलांमुळे रिक्षाचालक आणि लहान व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे, अशी अपेक्षा आहे.

The post एलपीजी गॅस टंचाईवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना appeared first on News 24 Tass Marathi.

अनधिकृत डीजे सिस्टीमवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांसह ५ अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

बेळगाव / प्रतिनिधी

उत्तर कर्नाटक भागात ट्रॅक्टर व इतर वाहनांवर बसवण्यात येणाऱ्या अनाधिकृत डीजे साऊंड सिस्टीमविरोधात कारवाई न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौड बा. पाटील यांनी थेट कर्नाटक लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गेल्या चार महिन्यांपासून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डीजे सिस्टीममधून होणाऱ्या तीव्र आवाजामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे शांततेचा भंग होत असून काही अपघातांनाही या प्रचंड आवाजामुळे कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनाधिकृत डीजे सिस्टीमवर तातडीने बंदी घालून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

The post अनधिकृत डीजे सिस्टीमवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on News 24 Tass Marathi.

मतदार याद्यांच्या मॅपिंगची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रशासनाला सूचना

बेळगाव / प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मॅपिंग प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून उर्वरित कामे एका आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. पुढील रविवारी पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने किमान ७५ टक्के मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवावा, अशीही सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, कँटोन्मेंट बोर्ड, जेएनएमसी आणि वनविभागाच्या वसाहतींमधील मतदान केंद्रांच्या मॅपिंगसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅपिंग प्रक्रियेतून कोणताही मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून एक टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. या बैठकीस पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

The post मतदार याद्यांच्या मॅपिंगची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा appeared first on News 24 Tass Marathi.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी दलित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी

सामाजिक न्यायाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचत संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधून घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

अंतर्गत आरक्षणातील रोस्टर पॉईंटच्या गोंधळामुळे अनुसूचित घटकांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे समितीने स्पष्ट केले. नागरी हक्क संरक्षण कायदा व अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने पीडितांना योग्य संरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

गुन्ह्यांची योग्य तपासणी व जलद सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, प्रत्येक गावात दलितांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची जागा राखीव ठेवावी, तसेच खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याचीही मागणी करण्यात आली.

फॉर्म ५७ भरलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ वहिवाट प्रमाणपत्र व हक्कपत्र द्यावे आणि नव्या अर्जदारांसाठी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असा आग्रहही यावेळी धरण्यात आला. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

The post विविध प्रलंबित मागण्यांसाठी दलित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या ; प्रलंबित समस्यांचे तातडीने निवारण करा
पालकमंत्री जारकीहोळींचे निर्देश

सुवर्ण विधानसौध येथे घेतली आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने पूर्ण करून प्रलंबित समस्यांचे त्वरित निवारण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला ठोस सूचना दिल्या.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान रस्ते विकास, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रलंबित कामांबाबत विभागांमध्ये समन्वय वाढवून ती तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने कार्य करावे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोकाकहून हेलिकॉप्टरने थेट सुवर्ण विधानसौध येथे दाखल झाल्यानंतर बैठक आटोपून पालकमंत्री जारकीहोळी यांनी बेळगावचे आमदार असिफ शेठ आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासोबत बळ्ळारीकडे प्रयाण केले.

The post बेळगाव जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या ; प्रलंबित समस्यांचे तातडीने निवारण करा appeared first on News 24 Tass Marathi.