digital arrest Archives | News 24 Tass Marathi

‘डिजिटल अरेस्ट’द्वारे बेळगावातील उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक
दोघांना अटक : सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

बेळगाव : बेळगावमधील एका प्रसिद्ध उद्योजकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सायबर क्राईम पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हैदराबाद येथील श्रीपाद नाईक आणि शरद नाईक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून उद्योजकाला भीती दाखवली आणि त्यांच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपये देशातील सहा राज्यांतील १० वेगवेगळ्या मुख्य खात्यांमध्ये वळवले.

तपासात समोर आले की, लुटलेली रक्कम सुमारे ३९० उप-खात्यांद्वारे फिरवण्यात आली. एका बनावट कंपनीच्या खात्यात २ कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी १ कोटी रुपये पोलिसांनी तात्काळ गोठवले आहेत.

हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील बँक खात्यांचा या मोठ्या फसवणुकीसाठी वापर करण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.

या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

The post ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे बेळगावातील उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली उद्योजकाला कोटींचा गंडा
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये एका वृद्ध उद्योजकाला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. त्यांनी त्याला मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकण्याची भीती दाखवून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपये उकळवले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून दाखवून व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी दिली आणि उद्योजकाकडून रक्कम हप्त्यांमध्ये घेतली.

बेळगाव सायबर क्राईम पोलिसांच्या तपासात समोर आले की, या लुटीची रक्कम देशभरातील सुमारे ३९० बँक खात्यांमध्ये काही मिनिटांतच वळवण्यात आली होती. शेकडो ‘म्युचुअल अकाउंट्स’चा वापर करून चोरट्यांनी आधीच ९५ टक्के रक्कम काढून घेतली होती.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडीकडे याची तक्रार केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ९० लाख रुपये जप्त करण्यात यश मिळवले असून, उर्वरित रकमेसाठी ३९० खात्यांची माहिती संकलित केली जात आहे. कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, अशा प्रकारचे फोन आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे भूषण बोरसे यांनी नागरिकांना सुचवले आहे. हायटेक चोरट्यांच्या या फसवणुकीमुळे सध्या सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे.

The post बेळगावात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली उद्योजकाला कोटींचा गंडा appeared first on News 24 Tass Marathi.