Delhi Archives | News 24 Tass Marathi

मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात ; लवकरच निर्णय
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ; कावेरी पाणीप्रश्नी न्यायालयीन लढाईची भूमिका

जंतरमंतर एफआयआरवर केंद्राकडे स्पष्टीकरणाची मागणी

दिल्ली : कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, पक्षश्रेष्ठींसोबतची चर्चा पूर्ण झाली आहे. आता मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि नव्या समावेशाबाबत हायकमांडच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासह कावेरी पाणीवाटप आणि जंतरमंतर एफआयआर प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत बोलताना, राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या कावेरी जल नियमन समितीच्या आदेशाला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अपील करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जलसाठ्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगत, दोन्ही राज्यांच्या हिताचा तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जंतरमंतर आंदोलनाशी संबंधित एफआयआर प्रकरणावरही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देत, या प्रकरणी केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तसेच या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

The post मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात ; लवकरच निर्णय appeared first on News 24 Tass Marathi.

उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल – मंत्री सतीश जारकीहोळी
अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आठवड्याअखेरीस बैठक होण्याची शक्यता

नवी दिल्ली : कर्नाटकातील अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला वेग आला असताना, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी आपण कोणतीही मागणी केलेली नसून, काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले की, अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदांची निर्मिती करायची की नाही, हा पूर्णपणे पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. या संदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेणार असून, पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचे आपण पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मी स्वतः उपमुख्यमंत्री पदासाठी कोणतीही मागणी केलेली नाही. हा पक्षाचा धोरणात्मक विषय असून, हायकमांड जो निर्णय घेईल त्याच्याशी मी पूर्णपणे बांधील असेन,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी माहिती दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सध्या ‘नीट’ गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनात व्यस्त असल्यामुळे नियोजित बैठक होऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.

देशपातळीवरील या आंदोलनाला प्राधान्य दिल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील चर्चा पुढे ढकलण्यात आली असून, येत्या शनिवारी किंवा रविवारी पक्षाचे वरिष्ठ नेते बैठक घेण्याची शक्यता असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल – मंत्री सतीश जारकीहोळी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – दिल्ली विमान सेवा आठवड्यातून फक्त तीन दिवस
प्रवाशांमध्ये नाराजी ; प्रवास नियोजनावर परिणाम

बेळगाव : बेळगाव – दिल्ली दरम्यानची दैनंदिन विमान सेवा १ जुलैपासून बंद करण्यात आली असून, आता ही सेवा आठवड्यातून केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी उपलब्ध राहणार आहे. ऑक्टोबरपर्यंत लागू राहणाऱ्या या नव्या वेळापत्रकामुळे व्यावसायिक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि नियमित प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

इंधनाचे वाढते दर आणि इतर आर्थिक कारणांमुळे विमान कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नव्या वेळापत्रकानुसार विमानाच्या येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी फेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम होणार आहे.

बेळगाव- दिल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि पर्यटक प्रवास करतात. दैनंदिन सेवा बंद झाल्याने अनेकांना जोड-विमान सेवा (कनेक्टिंग फ्लाईट्स) किंवा इतर पर्यायांचा अवलंब करावा लागणार असून, तिकीटांचे दर वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी १५ जूनपासून बेळगाव- बेंगळुरू मार्गावरील दोन दैनंदिन विमानांपैकी एक सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली मार्गावरील फेऱ्यांमध्ये कपात झाल्याने नियमित विमान प्रवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे.

सध्या बेळगावहून मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीसाठी थेट विमान सेवा उपलब्ध आहे. मात्र, यापूर्वी बंद करण्यात आलेले इतर अनेक मार्ग अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. विमान सेवांचे जाळे हळूहळू कमी होत असल्याने भविष्यात आणखी काही मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

यामुळे संबंधित विमान कंपन्या आणि प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून बेळगाव- दिल्लीसह अन्य मार्गांवरील नियमित विमान सेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

The post बेळगाव – दिल्ली विमान सेवा आठवड्यातून फक्त तीन दिवस appeared first on News 24 Tass Marathi.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची घेतली भेट

दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची भेट घेऊन राज्याच्या विकासासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तसेच उपराष्ट्रपती निवासस्थानी जाऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्याशीही सौजन्य भेट घेत विविध चालू घडामोडी आणि कर्नाटकच्या विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा केली.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा असून, या दौऱ्यात ते देशातील प्रमुख नेते आणि मान्यवरांची भेट घेत आहेत. राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत विविध विषयांवर संवाद साधला.

यापूर्वी दिल्लीत आगमनानंतर शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी देशाच्या घटनात्मक प्रमुखांची भेट घेत आपला दिल्ली दौरा पुढे सुरू ठेवला आहे.

The post मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा appeared first on News 24 Tass Marathi.

पेट्रोल – डिझेलच्या दरात ५ दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ
नवी दिल्ली : ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

आज, मंगळवारी (१९ मे) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा ९० पैशांची वाढ झाल्याने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The post पेट्रोल – डिझेलच्या दरात ५ दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ appeared first on News 24 Tass Marathi.

पेट्रोल – डिझेलचे दर वाढले
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

नवी दिल्ली : देशात महागाईचा दबाव वाढत असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. सीएनजी, सोने-चांदी, दूध आणि गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरांनंतर इंधन दरवाढीची भर पडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत असून, शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये १४ पैशांची तर डिझेलच्या दरात ३ रुपये ११ पैशांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने मौल्यवान धातूंचे दरही चढले आहेत. घरगुती वापरातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा फटका अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन ही इंधन दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत. तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्री पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे नव्या दरांची माहिती दिली होती.

The post पेट्रोल – डिझेलचे दर वाढले appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यातील महामार्ग विकासासाठी प्रभाकर कोरे यांचे मंत्री नितीन गडकरींना आवाहन
नवी दिल्ली : केएलईचे मानद अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईचे संचालक श्री. विजय मेटगुड यांच्यासमवेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत कर्नाटकातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत सौंदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्ग ७४८ए वर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच बेळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८बी च्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.

एनएच-७४८ए संदर्भात नवीन महामार्गाच्या संरेखनामुळे पारंपरिक बैलगाडी मार्गांना आणि कृषी वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी सौंदत्ती तालुक्यातील मुरकुंबी आणि हिरेकोप्प गावांजवळ नवीन वाहन भुयारी मार्ग (व्हीयूपी) उभारण्याची विनंती डॉ. कोरे यांनी केली.

तसेच अथणी तालुक्यातील मुरगुंडी ते हुक्केरी तालुक्यातील गोतुर दरम्यान असलेल्या एनएच-५४८बी रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी मंत्र्यांना केले.

हा रस्ता प्रादेशिक आर्थिक विकासासाठी तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

The post बेळगाव जिल्ह्यातील महामार्ग विकासासाठी प्रभाकर कोरे यांचे मंत्री नितीन गडकरींना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक
बेंगळूर : बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीच्या प्रश्नावर कर्नाटक सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. या संदर्भात मंगळवारी दिल्लीतील कर्नाटक भवनात राज्यातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

बागलकोट येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारवर दबाव आणून अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. सध्या महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी कर्नाटकाविरोधात केंद्राकडे तक्रार केली असून या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्रालयातील मंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्याच्या वाट्याचे पाणी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना होणार असून खासदारांसोबत चर्चा करून पुढील पावले निश्चित केली जाणार आहेत.

The post आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळूर-बेळगाव-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश करा
खासदार जगदीश शेट्टर यांची संसदेत मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

देशातील सात प्रमुख शहरांचा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पात समावेश केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करतानाच बेंगळूर–बेळगाव–मुंबई असा आठवा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तातडीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी संसदेत केली. या मार्गामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी संसदेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना शेट्टर बोलत होते. केंद्र सरकारने पाच वर्षांत सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून टू आणि थ्री टायर शहरांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बेंगळूर–मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर बेळगावचा समावेश असलेला स्वतंत्र हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारल्यास औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये लष्करी केंद्रासाठी सुमारे एक हजार एकर मोकळी जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी संरक्षण क्लस्टर स्थापन करावे, अशीही त्यांनी मागणी केली. संरक्षण उपकरण निर्मिती युनिट उभारल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

कळसा–भांडुरा प्रकल्पाच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचा आग्रहही त्यांनी धरला. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी केंद्राने हजारो कोटी रुपयांचा निधी जाहीर करूनही राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी निधी न दिल्याने कामे रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध झाली होती. मात्र तीन वर्षांनंतर योजनेची मुदत संपल्याने काही ठिकाणी सेवा बंद पडल्या आहेत. त्यामुळे उडान योजनेचा कालावधी किमान पाच ते दहा वर्षांनी वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचे त्यांनी स्वागत करत विकासाभिमुख धोरणांचे कौतुक केले.

The post बेंगळूर-बेळगाव-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश करा appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटकातील ६१ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी २११० कोटींची गुंतवणूक
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती

नवी दिल्ली : कर्नाटकातील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी तरतूद करण्यात आली असून राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी २११० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली.

याअंतर्गत गोकाक रोड, बागलकोट, धारवाड आणि मुनीराबाद या रेल्वे स्थानकांचे विकासकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तर अळणावर, बदामी, कोप्पळ आणि बंटावाला या रेल्वे स्थानकांचे काम सध्या प्रलंबित असून लवकरच ते सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात सध्या १२ वंदे भारत एक्स्प्रेस आणि ३ अमृत भारत एक्स्प्रेस धावत असून त्यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यातील रेल्वेमार्गांचे ९७ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतूक अधिक सक्षम झाली आहे.

गोव्यात नैऋत्य रेल्वेच्या वतीने विविध विकासकामे सुरू असून तेथील तीन रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण ६५ कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. तसेच गोव्यातून दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमास नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. आनंद, विभागीय व्यवस्थापक आशुतोषकुमार, हुबळी विभागाच्या बेला मीना यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post कर्नाटकातील ६१ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी २११० कोटींची गुंतवणूक appeared first on News 24 Tass Marathi.