Deepawali Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव शहरात पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन
रांगोळी – फुलांची सजावट ; फटाक्यांची आतिषबाजी

बेळगाव / प्रतिनिधी

आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाईने खुललेली सजावट, केळीचे खांब आणि झेंडूच्या माळांनी सजलेली दुकाने अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी लक्ष्मी-कुबेर पूजन झाले. पूजनानंतर व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सायंकाळी पाचपासून नऊपर्यंत लक्ष्मीपूजनाची धामधूम होती. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होत असल्याने कीर्दचे पूजनही करण्यात आले.

सायंकाळी सहानंतर शहर उपनगरातील विविध गल्लीत पूजा व आरतीची लगबग होती. पण सायंकाळी सातच्या सुमारास काहीवेळ हजेरी लावलेल्या पावसाने नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले. दिवसभर लक्ष्मीपूजनाच्या तयारीची धांदल सुरु होती. ऊस, केळीचे खांब, झेंडूच्या माळा खरेदी करुन पूजेची मांडणी आणि दुकानांची सजावट करण्यात येत होती. केळी, ऊस व झेंडू विक्रेत्यांकडे मंगळवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी होती.

व्यापारीवर्ग दिवसभर लक्ष्मी पूजनाच्या तयारीत गुंतले होते. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यात आले होते. पूजापाठ सभोवती केळी उभारून लक्ष्मीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. झेंडूच्या माळांनी दुकाने सुशोभित करण्यात आली होती. दुकानांसमोर रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांच्या उपस्थितीत लक्ष्मीची पूजा, आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. कुटुंबातील सदस्य आणि नातलगांची लक्ष्मीपूजनाला उपस्थिती असल्याने कौटुंबिक वातावरण होते. आरतीनंतर ऐश्वर्य, संपत्ती, समृध्दी व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रसाद म्हणून खोबरे, लाह्या, फुटाणे, बत्तासे, चुरमुरे, पेढे वाटप करण्यात आले. कुटुंब व नातलगांसमवेत सामूहिक फोटो काढण्याचा आनंद घेतला जात होता. लक्ष्मी पूजनानिमित्त विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन घेण्यात येत होते. फराळाचे पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जात होते.

पावसामुळे हिरमोड :

लक्ष्मीपूजनानिमित्त शहर उपनगरातील परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. पणत्या आणि विद्युत माळांचे तेज लक्षवेधी होते. मात्र, सायंकाळी हजेरी लावलेल्या पावसामुळे व्यापारीवर्गाचा हिरमोड झाला. अर्ध्या तासात पाऊस थांबताच गल्लीगल्लीत रोषणाई आणि फटाक्यांचे आवाज घुमू लागले. दुकानचालकांकडून मित्र, नातलग यांना मिठाई व भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.

The post बेळगाव शहरात पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन appeared first on News 24 Tass Marathi.

दिपावली २०२५ : जाणून घ्या वसूबारस म्हणजे काय? पूजा करण्याची पद्धत आणि कथा…
वसूबारस : नवरात्रौत्सवाची सांगता दसरा सणाने होते. हा दसऱ्याचा सण संपन्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. या दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची दिवाळी ही १७ ऑक्टोबरला सुरू होणार असून २३ ऑक्टोबरला संपणार आहे. दिवाळीची सुरूवात ही वसुबारसच्या सणाने होणार आहे. या निमित्ताने वसूबारसची पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त आणि पौराणिक कथा याबद्दलआपण जाणून घेऊया.

वसूबारस म्हणजे काय ?

दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा आज शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी हा सण साजरा केला जात आहे. गाई वासरांची दिवाळी म्हणून वसुबारस या सणाचे महत्त्व आहे. हा सण धनत्रयोदशीच्या एक दिवसआधी साजरा केला जातो. या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. गावा खेड्यात या सणाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी कष्टकरी वर्ग या सणाला मोठ्या उत्साहात साजरे करतात. हिंदू कॅलेंडरनुसार वसुबारस हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो, हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान,पूजा करण्यासाठी ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे. वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो. येथे, दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हटले जाते. गुजरातमध्ये याला ‘बाग बारस’ म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक ‘नंदिनी व्रत’ म्हणून हा दिवस साजरा करतात.

वसूबारस पूजेची पद्धत :

आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आहे. वसूबारसच्य दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाय आणि वासराची पूजा करताना घरातील सुवासिनी गाईच्या पायांवर पाणी घालतात, हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. शिवाय, ज्यांच्या घरी गुरे, गायी – वासरू आहेत, त्यांच्या घरी वसूबारसच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गाईला कुंकू-हळद आणि अक्षता वाहिल्यानंतर तिला निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाय आणि वासराला खायला दिला जातो.

या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरूवात केली जाते. रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो. तसेच, या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. हे पदार्थ गाई-वासराला खाऊ घातले जातात. हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरूवात केली जाते.

वसूबारस पौराणिक कथा :

या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे. ज्या काळात देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत शोधण्यासाठी धडपडत होते. या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे. दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी संबंधित आहे.

पुराणानुसार गाईच्या प्रत्येक अंगात देवी – देवतांच्या स्थानाचे विस्तृत वर्णन आहे. पद्मपुराणानुसार चारही वेद गाईच्या मुखात वास करतात. तीच्या शिंगांमध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करतात. गाईच्या पोटात कार्तिकेय, डोक्यात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगाच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात अश्विनीकुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेत सरस्वती, सर्व गुदद्वारातील तीर्थक्षेत्रे, मूत्रमार्गात गंगाजी केसांच्या कूपांमध्ये, ऋषी पाठीमागे, यमराज, उजव्या बाजूला वरुण आणि कुबेर, डाव्या बाजूला पराक्रमी यक्ष, तोंडात गंधर्व, नाग. नाकाच्या पुढच्या भागात आणि खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा वास करतात अशी धार्मिक मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक – प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)

The post दिपावली २०२५ : जाणून घ्या वसूबारस म्हणजे काय? पूजा करण्याची पद्धत आणि कथा… appeared first on News 24 Tass Marathi.

भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी उटण्याचे मोफत वितरण
बेळगाव / प्रतिनिधी

दीपावलीच्या आधी, भारतीय जनता पार्टी, बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव महानगर विधानसभा मतदारसंघतर्फे सर्व हिंदू बांधवांसाठी आज गुरुवारी सकाळी २५,००० सुगंधी उटण्याची पाकिटे मोफत वितरीत केली गेली. भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

दीपावली हा ‘अंधारातून प्रकाशाकडे’ नेणारा सण असून, अभ्यंग स्नानाशिवाय सण पूर्ण होत नाही. घरातील माता-भगिनी खोबरेल तेल किंवा सुगंधी तेलात उटणे मिसळून लहान-मोठ्यांना लावत आरती करून स्नान घालतात. उटण्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला गेला, तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

The post भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी उटण्याचे मोफत वितरण appeared first on News 24 Tass Marathi.