crop loss Archives | News 24 Tass Marathi

बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींची फसवणूक
११ जणांवर गुन्हा ; चौघांना अटक

निनावी पत्रामुळे घोटाळा उघडकीस

बागलकोट : जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात पंतप्रधान फसल विमा योजनेच्या नावाखाली तब्बल ३० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि फोटो वापरून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा उलगडा एका निनावी पत्रामुळे झाला. आपली ओळख गुप्त ठेवत संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रशासन सतर्क झाले आणि सखोल चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. २०२०-२१ पासून शेतकऱ्यांच्या नावाने बनावट फोटो तयार करून, प्रत्यक्षात पीक नसतानाही विमा रक्कम काढण्यात आली. या मार्गाने सुमारे ३०,२८,५१,५८० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी मुधोळ कृषी विभागाचे सहायक संचालक सिद्धलिंगेश दोडामणी यांनी तक्रार दाखल केली असून, मेटागुड्डा गावातील सात जणांसह युनिव्हर्सल सोमपू विमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, विमा कंपनीचे कर्मचारी यशवंत, राकेश, प्रकाश आणि अनिल यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घोटाळ्यात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनेचा गैरवापर करून कोट्यवधींची लूट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

The post बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींची फसवणूक appeared first on News 24 Tass Marathi.

कोबीच्या दरात घट ; शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील कोबी पिकावर फिरवला ट्रॅक्टर
बेळगाव : बाजारात कोबीच्या दरात झालेल्या अचानक घसरणीमुळे हतबल झालेल्या कडोली (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱ्याने स्वतःचे संपूर्ण पीक ट्रॅक्टरच्या सहाय्याने नष्ट केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थिती पुन्हा एकदा उजेडात आली आहे.

कडोली गावातील शेतकरी आप्पासाहेब देसाई यांनी कर्ज काढून दोन एकर जमिनीवर कोबीची लागवड केली होती. बियाणे, खते, सिंचन आणि मजुरीवर मोठा खर्च करून त्यांनी पीक उभे केले होते. पीकही चांगले आले होते; मात्र बाजारातील भाव कोसळल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उलट पीक बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पीक विकण्याऐवजी ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पिकाची नासधूस केली.

भाजीपाला पिकांना आधारभूत किंमत नसल्याने आणि बाजारातील दरातील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. “आमच्या कष्टाला काहीच किंमत उरलेली नाही; पीक आले तरी नुकसानच,” अशी व्यथा आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले असून, शेतमालाला हमीभाव, बाजारपेठेचे नियमन आणि तातडीच्या मदत उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

The post कोबीच्या दरात घट ; शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील कोबी पिकावर फिरवला ट्रॅक्टर appeared first on News 24 Tass Marathi.

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका
बेळगाव तालुक्याच्या विविध भागांत पिकांचे मोठे नुकसान

शेतकरी आर्थिक संकटात

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्याच्या उत्तर आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

या परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड केली जाते. मात्र अगसगे, हंदिगनूर, चलवेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी आदी गावांमध्ये बहरात असलेले ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पीक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अपेक्षित उत्पादन हातचे गेले आहे.

यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने ज्वारीचे पीक चांगले उभे राहिले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल आणि काही आर्थिक दिलासा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र अनपेक्षित पावसामुळे ही सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे.

The post अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका appeared first on News 24 Tass Marathi.