competition Archives | News 24 Tass Marathi

मुचंडी आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील अजिंक्य
इराणच्या इरफानला ‘बॅक थ्रो’ डावावर केले चितपट

बेळगाव : मुचंडी येथील श्री महालक्ष्मी – श्री मरगाई यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) याने इराणच्या बलदंड पैलवान इरफान इराणला थरारक लढतीत ‘बॅक थ्रो’ डावावर चितपट करत ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल ३२ मिनिटे रंगलेल्या या रोमहर्षक लढतीने हजारो कुस्तीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील सिद्धेश्वर मंदिर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला प्रचंड गर्दी झाली होती. अंतिम फेरीतील पृथ्वीराज आणि इरफान यांच्यातील लढत विशेष आकर्षण ठरली. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी एकमेकांना जोरदार झुंज दिली. निर्धारित वेळेत निकाल न लागल्याने नवीन नियमानुसार नाणेफेक करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन मिनिटांच्या नियंत्रणाच्या संधीमध्ये पृथ्वीराज पाटीलने अफलातून ‘बॅक थ्रो’ डाव टाकत इरफानला चितपट केले आणि मैदानात जल्लोष उसळला.

दुसऱ्या प्रमुख कुस्तीमध्ये पैलवान प्रशांत शिंदे याने ‘एकलांगी’ व ‘एकेरी हात’ या प्रभावी डावांच्या जोरावर अवघ्या आठव्या मिनिटाला विरेंद्र कुमारचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कर्नाटकचा कंठीरवा केसरी कामेश पाटील (कंग्राळी) याने कोल्हापूरच्या सूरज मुंडेला ‘घुटणाचित’ करत १६व्या मिनिटाला विजय मिळवला.

चौथ्या सामन्यात कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी याने सांगलीच्या मनोज पाटीलवर ‘नाकपट्टी’ डावावर मात केली. प्रेम जाधव आणि अक्षय चौगुले यांच्यातील सामना रंगतदार झाला; मात्र अक्षयला दुखापत झाल्याने ही कुस्ती अनिर्णित राहिली.

याशिवाय सचिन शिरगुप्पी, साताप्पा कोल्हापूर, कार्तिक इंगळगी, बाबू नरळे, विनायक येळ्ळूर, संभाजी परमोजी (काकती), पिल्ल्या कोल्हापूर, रामदास मोळेराखी (काकती), महांतेश (संतीबस्तवाड), सुफियान सय्यद, प्रणव (उचगाव), मंथन तिप्पानाचे, संग्राम गावडा, अफान (माजगाव), सिद्धार्थ काकतकर (मजगाव), स्वराज (सावगाव), प्रथमेश वकुंद, प्रतीक वकुंद (गणेशपूर), ओंकार पुजारी आणि प्रवीण गंदिगवाड आदी मल्लांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मैदान गाजवले.

आखाड्याचे पंच म्हणून विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, अतुल शिरोळे, बाळाराम पाटील, गणपत बन्नोशी, बाहुबली बस्तवाड, राजू माजगाव, परशुराम मोदगेकर, पिराजी मुचंडीकर, गंगाराम बाळेकुंद्री आणि बाबू कल्लेहोळ यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत राशिवडे यांनी केले. तर अमोल निपाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणहलगीच्या ठेक्यावर वातावरण भारावून टाकले.

The post मुचंडी आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील अजिंक्य appeared first on News 24 Tass Marathi.

दक्षिण भारत कुस्ती स्पर्धेत साईराम आठवणीला सुवर्णपदक
बेळगाव : २०२६ च्या दक्षिण भारत कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील कुस्तीपटू साईराम मोहन आठवणी याने सुवर्णपदक पटकावत खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

बिडी (ता. खानापूर) येथील साईरामने फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन व महिला गटांच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत विजय मिळवला. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साईरामच्या सुवर्ण विजयामुळे कर्नाटक राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

The post दक्षिण भारत कुस्ती स्पर्धेत साईराम आठवणीला सुवर्णपदक appeared first on News 24 Tass Marathi.

मुचंडी येथे १८ मे रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
बेळगाव : मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रेनिमित्त येत्या सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकाक रोड, मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हे कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आणि वर्ल्ड चॅम्पियन पै. इरफान इराण यांच्यात खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे २ ते ५ क्रमांकापर्यंतच्या कुस्त्या अनुक्रमे भोसले व्यायाम शाळा सांगलीचा पै. प्रशांत शिंदे विरुद्ध हरियाणा केसरी पै. वीरेंद्र कुमार, लहान कंग्राळीचा कर्नाटक केसरी पै. कामेश पाटील विरुद्ध भोसले व्यायाम शाळा सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाळू अपराध, मुधोळचा कर्नाटक केसरी पै. सदाशिव नलवडे विरुद्ध तालीम गंगावेस कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. विश्वचरण सोलनकर आणि लहान कंग्राळीचा डबल कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम जाधव विरुद्ध कोल्हापूरचा पै. दादू चौगुले यांचा नातू पै. अक्षय चौगुले अशा होणार आहेत.

वरील कुस्त्यांव्यतिरिक्त सदर कुस्ती मैदानात लहान – मोठ्या ५० हून अधिक चटकदार कुस्त्या लावल्या जाणार आहेत. मेंढ्याच्या बक्षीसासाठी ४ कुस्त्या होणार असून त्यामध्ये पै. बलराज चौगुले विरुद्ध पै. विक्रम हुबळी, पै. प्रल्हाद हुलीकोतली विरुद्ध पै. तुषार शिंदे, पै. श्रेयस खाडली विरुद्ध पै. विनायक गौंडवाड आणि पै. स्वराज पाखरे विरुद्ध पै. तन्मय मो. कंग्राळी या कुस्त्यांचा समावेश आहे. कुस्ती आखाडा व तालमीच्या वस्तादांसह हौशी पैलवानांनी सदर कुस्ती मैदानासंदर्भात अधिक माहितीसाठी पै. अतुल सुरेश शिरोले (मो. क्र. ८८६११६९२१७) अथवा पै. परशुराम पुंडलिक मोदगेकर (मो. क्र. ९७३९१८४९३३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कुस्ती शौकिनांनी बहुसंख्येने या कुस्ती मैदानाला हजेरी लावून कुस्त्यांचा आनंद लुटण्याबरोबरच मैदान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post मुचंडी येथे १८ मे रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान
गुणांच्या आधारावर विजय

पंजाब केसरी भूपेंद्र अजनालाने दिली कडवी झुंज

बी. के. कंग्राळी : तब्बल ४३ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचा पैलवान मिर्झा याने गुणांच्या आधारावर विजय मिळवत मैदान गाजवले.

ग्रामदेवी जत्रेच्या निमित्ताने आयोजित या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले होते. पहिल्याच फेरीतील सर्वाधिक उत्कंठावर्धक लढतीत इराणचा मिर्झा आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाला आमनेसामने आले. अनुभवी दोन्ही पैलवानांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. भूपेंद्रने कडवी झुंज दिली असली, तरी निर्धारित वेळेत निकाल स्पष्ट न झाल्याने अखेरीस गुणांच्या आधारे मिर्झाला विजेता घोषित करण्यात आले.

सुमारे चार दशकांनंतर कंग्राळी गावात आयोजित करण्यात आलेल्या या महालक्ष्मी जत्रेमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला क्रीडा स्पर्धेची जोड मिळाली. कुस्ती सामने पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी दाखल झाले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवानांची कामगिरी पाहून उपस्थितांनी दाद दिली. धार्मिक विधींसह पार पडणाऱ्या या महोत्सवात कुस्ती स्पर्धेमुळे विशेष रंगत निर्माण झाली असून गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

The post इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा उत्साहात संपन्न
भैरू नाईक ठरला राजहंस गडाचा राजा, तर अक्षरा मजुकर ठरली राजहंस गडाची राणी

बेळगाव : बेळगाव परिसरात पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेला यावर्षी शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

विशेष म्हणजे अवघ्या सहा वर्षांच्या बालस्पर्धकांपासून ते पंच्याहत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेत स्पर्धेची शोभा वाढवली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता सर्व वयोगटांना प्रेरणा देणारा उत्सव ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते भगवा झेंडा उंचावून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानी अंकुश केसरकर होते. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, परशराम मोटराचे, प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, नागेश बोभाटे, राजू पावले, राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री, दत्ता उघाडे, शिवराज पाटील, विकास कलघटगी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, आजपर्यंत हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला असून, येथील अनेक विजेत्यांनी देशपातळीवर आपला नावलौकिक मिळविला आहे.

प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले की, गेली साठ वर्षे ही ऐतिहासिक स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात येत असून, यात मुले, मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी यावर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे आभार मानले व विजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावर्षी भैरू नाईक याने उत्कृष्ट कामगिरी करत राजहंस गडाचा राजा हा किताब पटकावला, तर अक्षरा मजुकर हिने राजहंस गडाची राणी हा मान मिळविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास कलघटगी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत कदम, रणजीत हावळण्णाचे, आकाश भेकणे, सचिन केळवेकर, विनोद आंबेवाडीकर, सुनिल आनंदाचे, सुहास हुद्दार, उमेश पाटील, सूरज कुडूचकर,सुरज चव्हाण, विकास भेकणे, साईनाथ शिरोडकर, प्रकाश गडकरी यांनी विशेष सहकार्य केले. ही स्पर्धा बेळगावच्या शिवभक्तांसाठी परंपरा, शौर्य, आरोग्य आणि शिवप्रेम यांचे प्रतीक ठरत असून यंदाही मोठ्या उत्साहात पार पडल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

आठ वर्षाखालील (मुले)

१) वंश बिर्जे

२) अक्षद मारिहाळकर

३) ऋतुराज गोरल

आठ वर्षाखालील (मुली)

१) स्वराली कुडतरकर

बारा वर्षाखालील (मुले)

१)कृष्णकुमार पूजेरी

२) शुभम कुलगोड

३) श्रीकेत दळवी

बारा वर्षाखालील (मुली)

१) प्रेरणा पाटील

२)निरवी कलकुप्पी

३) स्वराणी गोरल

सोळा वर्षाखालील (मुले)

१) अथर्व नाईक

२) सुशांत कांबळे

३) साईनाथ पाटील

सोळा वर्षाखालील (मुली)

१) शिवानी शेलार

२) नम्रता सुतार

३) प्रियांका दौलतकर

खुला गट (महिला)

१) अक्षरा मजुकर गडाची राणी

२) नकुशा मंगनाकर

३) प्रतीक्षा घाडी

खुला गट (पुरुष)

१) भैरू नाईक गडाचा राजा

२) भूषण गुरव

३) दक्ष पाटील

खास सन्मान

ज्येष्ठ स्पर्धक सुरेश सांगावकर सुरेश देवरमनी

The post ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा येथे उद्या जंगी कुस्ती मैदान
‘मल्लविद्येचा महासंग्राम’ रंगणार

सांबरा : बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे रविवारी (दि. २६ एप्रिल) दुपारी ३ वाजता ‘मल्लविद्येचा महासंग्राम’ या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कमल (कम्मार) तलाव परिसरात रंगणाऱ्या या मैदानासाठी आयोजकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची मुख्य कुस्ती पुण्याचा ‘हिंदू गर्जना केसरी’ पै. शुभम सिधनाळे आणि हरियाणातील सोनीपतचा ‘भारत केसरी’ पै. अजय वरण यांच्यात होणार असून, ही लढत विशेष आकर्षण ठरणार आहे.

तसेच अन्य प्रमुख कुस्त्यांमध्ये दसरा कंठीरवा केसरी पै. कामेश विरुद्ध दिल्लीचा पै. करण, उत्तर कर्नाटक केसरी पै. शिवा दड्डी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. सत्पाल, कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम विरुद्ध इस्लामपूरचा पै. शिवकुमार जंगम, तसेच शिरगुप्पीचा पै. सचिन विरुद्ध सांगलीचा पै. सौरभ मरकड यांच्या कुस्त्या रंगणार आहेत. याशिवाय ५० हून अधिक लहान-मोठ्या चुरशीच्या कुस्त्यांची मेजवानी कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

सांबरा कुस्तीगीर कमिटीचे पदाधिकारी यल्लाप्पा हरजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानासाठी नव्याने आखाडा उभारण्यात आला असून गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post सांबरा येथे उद्या जंगी कुस्ती मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लावणार ‘बेळगाव हिंदकेसरी’ शर्यतीला हजेरी
बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ आयोजित ‘बेळगाव हिंदकेसरी’ तिसऱ्या पर्वातील जंगी बैलगाडा शर्यतीला कालपासून श्री मरगाई देवी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव या ठिकाणी प्रारंभ झाला असून उद्या रविवारी होणाऱ्या शर्यतींसह समारोप समारंभाला देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ आयोजित “बेळगाव हिंदकेसरी” या दि. २४, २५ व २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस चालणाऱ्या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून 250हून अधिक प्रसिद्ध बैलजोड्या सहभागी झालेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर व उत्कृष्ट नियोजन यासाठी ही शर्यत प्रसिद्ध आहे. श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ विभाग प्रमुख उमेश कुऱ्याळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल या शर्यतीचा उद्घाटन समारंभ पारंपारिक पद्धतीने पार पडला. शेतकरी बांधवांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून शर्यतीला सुरुवात करण्यात आली. आता उद्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या शर्यतींसह समारोप समारंभाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उपस्थित असणार आहेत. दोन वेळा महाराष्ट्र केसरी जिंकून कुस्ती आखाडा गाजवलेले चंद्रहार पाटील आता त्यांच्या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहेत.

The post डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लावणार ‘बेळगाव हिंदकेसरी’ शर्यतीला हजेरी appeared first on News 24 Tass Marathi.

राजहंस गडावर रंगणार थरारक गड चढणे–उतरणे स्पर्धा
‘गडाचा राजा’ व ‘गडाची राणी’ किताबासाठी स्पर्धकांमध्ये चुरस

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंसगड (येळ्ळूरगड) येथे भव्य गड चढणे–उतरणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, यंदाही स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चुरस निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून,स्पर्धेला सुरुवात परमेश्वर नगर, इंदिरा कॉलनी येळ्ळूर येथून होणार आहे.

या स्पर्धेत लहान गटांपासून ते खुल्या गटापर्यंत विविध वयोगटांमध्ये स्पर्धा होणार असून, वय वर्षे ८, १२ व १६ खालील गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटात मुले व मुलींसाठी वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ८ वर्षांखालील गटात प्रथम १००० रुपये, द्वितीय ८०० रुपये व तृतीय ५०० रुपये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. १२ वर्षांखालील गटात प्रथम १५०० रुपये, द्वितीय १००० रुपये व तृतीय ५०० रुपये, तर १६ वर्षांखालील गटात प्रथम २००० रुपये, द्वितीय १५०० रुपये व तृतीय १००० रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे खुल्या पुरुष व महिला गटातील विजेत्यांना ‘गडाचा राजा’ आणि ‘गडाची राणी’ हा मानाचा किताब बहाल करण्यात येणार आहे. या गटात प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १००० रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नोंदणी स्पर्धा स्थळीच, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन या ऐतिहासिक गडावर आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर (मो. 9739963229), स्पर्धा प्रमुख राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री किंवा श्रीकांत कदम(9611756529) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

The post राजहंस गडावर रंगणार थरारक गड चढणे–उतरणे स्पर्धा appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा कुस्ती कमिटीचा गतवर्षीच्या आखाड्याचा अहवाल सादर
२६ एप्रिलच्या जंगी मैदानासाठी तयारी सुरू

सांबरा : सांबरा कुस्ती कमिटीच्या वतीने गतवर्षी यशस्वीरीत्या पार पडलेल्या कुस्ती आखाड्याचा जमा-खर्च अहवाल हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आला. या प्रसंगी अहवालाचे वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ इराप्पा जोई, शिवाजी जत्राटी, नागो यड्डी, सिद्राई यड्डी आणि लक्ष्मण यड्डी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षीच्या आखाड्याचा आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने मांडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रविवार दि. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती मैदानाच्या आयोजनासाठी तयारीला वेग देण्यात आला असून, हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आखाडा उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच नवीन तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या आखाड्याबाबत यल्लाप्पा हरजी यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास लक्ष्मण सुळेभावी, मोहन हरजी, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, भुजंग धर्मोजी, भुजंग गिरमल, शिवानंद पाटील, कृष्णा जोई, शीतल तिप्पाण्णाचे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जोई, सिद्राई तिप्पाण्णाचे, परशराम हरजी, आप्पानी यड्डी, विनायक चिंगळी, प्रकाश बसरीकट्टी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

The post सांबरा कुस्ती कमिटीचा गतवर्षीच्या आखाड्याचा अहवाल सादर appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथे महाराष्ट्र कुस्ती मैदानाला प्रारंभ
येळ्ळूर : येथील कलमेश्वर, चांगळेश्वरीदेवी यात्रोत्सव व महालक्ष्मीदेवी वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी येळळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी यांच्याहस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, अध्यक्ष अजित गोरल, प्रदीप देसाई, भोला पाखरे, राजू पावले, मोहन कुजी, दुदाप्पा बागेवाडी, हणमंत पाटील, सतिश कुगजी, यलुप्पा पाटील, विलास नंदी, तानाजी हलगेकर, पिंटु चौगले, मधु मुचंडी, राजु डोण्याण्णावर, परशराम घाडी, राहुल कुगजी, मधु पाटील, नंदू पाटील, नारायण कंग्राळकर, श्रीधर कानशिडे यांच्यासह कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उतम दर्जाचा आखाडा तयार केला आहे. प्रेक्षकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल मिर्झा इराण वि. हिंदकेसरी साहिल कोहली पंजाब यांच्यात प्रथम क्रमाकांची कुस्ती होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध सोनीपत हरियाणाचा मल्ल निरु गुर्जर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्रकेसरी पृथ्वीराज पाटील व पंजाब केसरी मुसा पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची लढत राहुल सुळ पुणे वि. राघू ठोंबरे कोल्हापूर, पाचव्या क्रमांकाची लढत हितू ठाकूर मथुरा व महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील यांच्यात होणार आहे. सहावी कुस्ती बाळू अपराध वि. अनुजकुमार दिल्ली, सातवी कुस्ती शिवा दड्डी वि. उदयकुमार दिल्ली अशा कुस्त्या रंगणार आहेत. नवहिंद कुमार केसरीसाठी प्रथमेश हट्टीकर व अक्षय तांबे शाहुपुरी यांच्यात लढत होणार आहे.  या मैदानात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, सांगली, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक परिसरातील मल्लांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत.

The post येळ्ळूर येथे महाराष्ट्र कुस्ती मैदानाला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.