college Archives | News 24 Tass Marathi

श्री शिवबसव ज्योतीतर्फे तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती
बेळगाव : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त सह्याद्रीनगर येथील श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखू निषेधाच्या निमित्ताने निषेधाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर आणि बॅनरचे प्रदर्शन मांडले होते. यामधून जनजागृती करण्यात आली. तसेच आसपासच्या परिसरात जागृती फेरी काढून नागरिकांना तंबाखू निषेधाचे आवाहन करण्यात आले. तंबाखू, गुटखा तसेच सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आधार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी. टी. बामणे यांच्याहस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रम संयोजनासाठी डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. पी. जयमोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्गाने परिश्रम घेतले.

The post श्री शिवबसव ज्योतीतर्फे तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती appeared first on News 24 Tass Marathi.

शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांसह परिसरातून फेरी काढली. या फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आर. आलगोंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या समस्यांमागे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर वाय., एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

The post शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

कावेरी उमेश नायक (वय २१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती. कावेरी बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती आणि बेळगावातील आझम नगर परिसरातील एका वसतिगृहात राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि परिचितांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात होत्या. दिवसभर ती वसतिगृहातच होती आणि काही जणांशी संवादही साधत होती. मात्र दुपारनंतर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

रात्री जेवणासाठी बोलविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजा उघडून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस, संबंधित अधिकारी आणि तिचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयात पाठविला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कावेरीचा एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत साखरपुडा झाला होता. तिच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.

The post वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

शिवबसवज्योती मध्ये आगळ्या उपक्रमाने हॅनेमन जयंती साजरी
बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे देहदानाचा संकल्प केलेल्या दोन ज्येष्ठ महिला सदस्यांचा गौरव करण्यात आला. हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.टी. बामणे होते. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पूजा बामणे आणि उपप्राचार्य डॉ. महांतेश साणिकोप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अस्मिता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. तसेच डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. पी. जयमोहन आणि डॉ. सॅबेस्टीयन डिसोजा यांनी होमिओपॅथी शास्त्राबद्दल विशेष माहिती दिली. विद्यार्थिनी दिव्या हिनेदेखील आपले विचार मांडले. देह दानाचा संकल्प केलेल्या घरकुल वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्य पद्मावती भावे आणि गीता मुनवळी यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्याबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांचा परिचय डॉ. स्वप्ना चौलीगेर आणि सहना यांनी करून दिला. डॉ. मानसी चिंचणीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. श्रीदेवी यांनी केले. विद्यार्थिनी प्रतिनिधी गायत्री रेवणकर यांच्यासह इतर सदस्यांनी संयोजन केले.

The post शिवबसवज्योती मध्ये आगळ्या उपक्रमाने हॅनेमन जयंती साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची आजही समाजपरिवर्तनासाठी गरज – प्रा. बी. डी. दामन्नवर
शिवानंद महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

कागवाड : एका वर्तुळात अडकलेले शिक्षण महात्मा फुल्यांनी सर्वांसाठी खुले करून बहुजन आणि स्त्रियांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळे आज समाजातील विविध घटकांचा शिक्षणात सहभाग वाढला असून समाज अधिक एकजिनसी बनला आहे. शिक्षणामुळेच विकास साधता येतो, ही जाणीव आज दलित, आदिवासी, भटके आणि तळागाळातील समाजघटकांमध्ये निर्माण झाली आहे. तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलनांचा उदय हे सर्व फुल्यांच्या विचारांवर आधारलेले परिवर्तनाचे टप्पे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विचार पुन्हा एकदा जनमानसात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. बी. डी. दामन्नवर यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या द्वीशताब्दी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. दामन्नवर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी फुल्यांच्या कार्याचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल रिस्थितीतही फुल्यांनी शिक्षण घेऊन समतेचा, सत्यशोधाचा, स्त्री सन्मानाचा आणि शिक्षणाचा वस्तुपाठ घालून दिला. स्त्री-पुरुष समानता हा फुलेंच्या विचाराचा केंद्रीभूत मुद्दा आहे. ज्योतिबांनी सामाजिक-धार्मिक रितीरिवाजांसह कुटुंबपद्धतीची पुनर्रचना करण्याचे ठरवले. सुरुवातीला फुले यांनी पर्यायी विवाहपद्धतीविषयी विचार करायला सुरुवात केली व सत्यशोधक विवाहपद्धती मांडली. असे ते म्हणाले.

यावेळी मराठी विभागाच्या वतीने महात्मा फुलेंच्या द्वीशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम, व्याख्यान आयोजित करण्याचा संकल्प केला गेला. कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमोल पाटील यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची आजही समाजपरिवर्तनासाठी गरज – प्रा. बी. डी. दामन्नवर appeared first on News 24 Tass Marathi.

श्रीशिवबसव ज्योती कॉलेजतर्फे स्वच्छता विषयक जागृती अभियान
बेळगाव / प्रतिनिधी

आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्य जागृती विषयक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना कचरा निर्मूलन योग्य रीतीने करावे तसेच कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

याकरिता विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. आश्रय कॉलनी, सारथीनगर, सह्याद्रीनगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कचरा साचून राहिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यामधून आजार उद्भवतात. अशावेळी नागरिकांनी प्रारंभापासून कचऱ्याच्या संकटापासून मुक्त रहावे असे मार्गदर्शन करण्यात आले. या जागृती मोहिमेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फलक हाती घेऊन जागृती केली. हॉस्पिटल मधील ऑर्गेनॉन आणि कम्युनिटी मेडिसिन विभागाने संयुक्तरीत्या हा उपक्रम राबविला. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे संयोजन डॉ.सेबेस्टियन डिसोजा यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन मुजावर, डॉ. सबिहा रंगरेज डॉ. मनीषा यांनी केले होते.

The post श्रीशिवबसव ज्योती कॉलेजतर्फे स्वच्छता विषयक जागृती अभियान appeared first on News 24 Tass Marathi.

जीआयटी कॉलेजच्या ‘ऑरा’ फेस्टची सुरेल सांगता
पार्श्वगायक मोहित चौहानच्या मैफलीने तरुणाई रंगली

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक लॉ सोसायटीच्या जीआयटी कॉलेजमध्ये आयोजित ‘ऑरा’ या नॅशनल फेस्टचा समारोप प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहानने यांच्या सुरेल मैफलीने रंगतदार वातावरणात पार पडला. कॉलेजच्या मैदानावर जमलेल्या तरुणाईने मोहित चौहान यांच्या गाण्यांवर ठेका धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या सुरेल आवाजामुळे संपूर्ण परिसर संगीताच्या लयीत न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात जब वुई मेट या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘जो भी मै’ सादर करून करण्यात आली. त्यानंतर ‘ये दूरियां, ये राहों की दूरियां’ यांसारखी गाणी गात त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. काही गाणी सादर करताना त्यांनी प्रेक्षकांनाही साथ देत गायला लावले, त्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’ या सादरीकरणातून जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे मुखडे सादर करून त्यांनी प्रेक्षकांना वेगळाच आनंद दिला.

उत्कृष्ट वाद्यवृंद, दर्जेदार साउंड सिस्टीम आणि रंगमंचावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मैफलीला भव्यता लाभली होती. कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना मोहित चौहान यांनी बेळगावला पहिल्यांदाच भेट दिल्याचे सांगत शहराच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले. त्यांच्या या सुरेल कार्यक्रमाने ‘ऑरा’ फेस्टची सांगता अविस्मरणीय ठरली.

The post जीआयटी कॉलेजच्या ‘ऑरा’ फेस्टची सुरेल सांगता appeared first on News 24 Tass Marathi.

पाचवी आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा उत्साहात
अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न पूर्ण करणार : खासदार जगदीश शेट्टर

बेळगाव : बेळगावमधून हॉकी खेळात देशाला अनेक ऑलिम्पिकवीर मिळाले आहेत. त्यामुळे शहरात अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्याचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत नक्की पूर्ण करणार, असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले.

हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित ५ व्या आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमणी होते. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

स्पर्धेतील मुलांच्या गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने २-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर आरपीडी महाविद्यालय उपविजेता ठरले. मुलींच्या गटात आरपीडी महाविद्यालयाने १-० ने विजय मिळवत विजेतेपद मिळवले, तर संगोळी रायण्णा महाविद्यालय उपविजेता ठरले.

स्पर्धेत शुभम नाईक (संगोळी रायण्णा) आणि नेत्रा गुरव (आरपीडी) यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच सायली पाटील आणि सावनी गोडबोले यांची उगवते खेळाडू म्हणून निवड झाली.

विजयी संघांना प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक अधिकारी हरिविजय मच्छलवार, तसेच कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत स्पर्धेची माहिती दिली. विजयी संघांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ चषके प्रदान करण्यात आले.

यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश चाळके, सुरेश पोटे, दयानंद कारेकर, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, डॉ. मल्लिकार्जुन थाल्ला, संतोष दरेकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मनकाळे आदी उपस्थित होते.

The post पाचवी आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड
शिवानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा

मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे आयोजन

कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. परंतु त्या दुःखाला केवळ कवटाळून बसण्याला काही अर्थ नाही. सुखाचा त्याग आणि दुःखाचा भोग ही कोणत्याही प्रतिभेची प्रेरणा ठरायला हवी. मराठी भाषा गौरव दिवस हा प्रतिभा जागवायचा दिवस आहे. कुसुमाग्रजानी ज्या अंतप्रेरणेने प्रगल्भ असे साहित्य लिहून मराठी भाषेची सेवा केली; तशी आजच्या पिढीने, विद्यार्थ्याने लिहिले पाहिजे. सगळे पुन्हा मिळू शकेल पण वेळ गेलेली कधीच पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही चांगले वाचा, चांगले लिहा. हे काम इथल्या मराठी विभागात होतं आहे याचे मला प्रचंड समाधान वाटते आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विनोद गायकवाड बोलत होते.

बोलताना पुढे डॉ. गायकवाड म्हणाले, तारुण्याचा काळ हा फार महत्वाचा आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणायचे सगळ्यात विषेश काळ आयुष्यातला कोणता तर तो तारुण्याचा काळ असतो. तो काळ तरुणांकडे असतो पण दुर्दैवाने ते त्यांनाच माहीत नसते. शिरवाडकर यांनी अशा तारुण्यात कितीतरी कविता लिहिल्या. विनायक सावरकरांनी याच वयेत मराठीला असंख्य नवीन शब्द देऊन मराठी भाषेची समृध्दी वाढविली. असे काहीतरी आपल्याला करता आले पाहिजे. बहिणाबाई चौधरी तर निरक्षर असतानाही किती प्रतिभावान काव्य लेखन त्यांनी केलं. चांगलं वाचलं की चांगलं लिहिता येते. रोजची वर्तमानपत्रे मासिके वाचा. तूम्ही समृध्द व्हाल. असे ते म्हणाले.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सभामांचावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर गोंधळी, महाविद्यालयातील गुणवत्ता मानांकन केंद्राचे समन्वय अधिकारी प्रा. बी. डी. दामन्नवर, मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मनोज कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. एस. पी. तळवार यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोणतीही भाषा माणूस जोडण्याचे काम करते. भाषेच्या विकासात साहित्यिक योगदान देत असतात. शिरवाडकर यांनी मराठी भाषेला फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. गायकवाड यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आपला सृजनात्मक आविष्कार साहित्य लेखनातून करावा.

उपस्थितांचे स्वागत प्रा. मनोज कोरे यांनी केले तर प्रास्ताविक आणि परिचय प्रा. अशोक आलगोंडी यांनी करून दिला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कविता लेखन, निबंध लेखन व पोस्टर बनवणे स्पर्धा घेतल्या होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु शुभम बोरगावे, व्दितीय क्रमांक श्वेता बाबर, तृतीय क्रमांक अनन्या कुलकर्णी आणि उत्तेजनार्थ प्रतीक्षा पाटील, अश्विनी माळी, प्रीती मुळीक यांना मिळाला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम स्नेहा करव, व्दितीय वैष्णवी माळी, तृतीय महेक अपराज आणि उत्तेजनार्थ पूजा भगत, निर्जरा पाटील, अक्काताई पाटील यांना मिळाले. पोस्टर बनवणे स्पर्धेत प्रथम सानिया गायकवाड, व्दितीय माधुरी माने, तृतीय शुभम बोरगावे आणि उत्तेजनार्थ वैष्णवी माळी, साक्षी पाटील, स्नेहल पाटील यांनी मिळवले.

यावेळी डॉ. अमोल पाटील, प्रा. साजिद इनामदार, प्रा. शिवानंद आवटी, प्रा. अशोक पाटील, प्रा. सोनाली फडतरे, मराठी पत्रकार संघाचे पत्रकार लक्ष्मण सुर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु शुभम बोरगावे व सानिया बिलगी यांनी केले तर आभार गणित विषयाच्या प्रा. जास्मिन राजापूरे यांनी केले.

The post वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड appeared first on News 24 Tass Marathi.

पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी यांनी हॉकी गोल पोस्टमध्ये चेंडू मारून उद्घाटन केले. यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.

हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय देऊन हॉकी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत मुलांच्या संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, आरपीडी कॉलेज, पीपल ट्री कॉलेज, जीएसएस कॉलेज गोगटे कॉलेज व व्हीटीयू तर मुलींचा संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, जी एस एस कॉलेज, आरपीडी कॉलेज संघांनी सहभाग घेतला होता.

विजयी स्पर्धकांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी मण्णूरच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व.आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात येत आहेत. यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे रामकृष्ण गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, सविता वेसणे, सविता हेब्बार,आशा होसमणी, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे उपस्थित होते. पंच म्हणून प्रफुल्ल, श्लोक, प्राजक्ता, विजयलक्ष्मी यांनी काम पाहिले.संगोळी रायण्णा कॉलेज विरुद्ध आरपीडी कॉलेज मुलींच्या संघाचा आज अंतिम सामना होणार आहे.

आज बक्षिस समारंभ :

बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक मच्छलवार हरिविजय, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मार्कंडेय सोसायटी मण्णूरचे चेअरमन प्रसाद चौगुले, संचालक व भाजप नेते विनय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

The post पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.